Monday, 22 September 2014

तो एक पाकिस्तानी

एक अपघातजन्य संधी

अ‍ॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी आपल्या देशाच्या अभेद्य आणि कडेकोट बंदोबस्तात असलेली आण्विक रहस्ये जगासमोर आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळेच अणू तंत्रज्ञानाची दारे सर्वांनाच सताड खुली करून मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून तथाकथित ‘शांततेसाठी अणुऊर्जा’ आणि त्याचे काळेकुट्ट दुष्परिणाम यांच्यात असलेली एक प्रकारची भ्रामक दरी नष्ट करण्याची संधी शेवटी काही जणांकडे आयतीच चालून आली. खान हा त्यापैकी एक.

शीतयुद्धाने गांभीर्याची परिसीमा गाठली होती आणि १९५०मध्ये अशा काही घटना घडल्या की, आयसेनहॉवर यांनी आपल्या अण्वस्त्रांच्या कोठारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय केला. सोव्हिएट रशियाकडून अण्वस्त्रांचा हल्ला झालाच त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी ही तयारी चालवली होती. रशियाने आपल्या पहिल्या अणूबॉम्बची चाचणी १९४९मध्येच केल्याचे उघडकीस आले होते आणि त्यामुळे अमेरिकेच्या या क्षेत्रातील मक्तेदारीला जबरदस्त धक्का बसला होता. ब्रिटिशांनी आपली पहिली अणू चाचणी १९५२मध्ये केली.

पुढच्याच वर्षी रशियाने आपल्या आणखी एका थर्मो-न्यूक्लियर बॉम्बची यशस्वी चाचणी करून सर्वांनाच आश्चर्याचा आणखी एक धक्का दिला. ब्रिटिश किंवा अमेरिकेच्या अण्वस्त्रांचा कोठारात अशा प्रकारचा बॉम्ब नाही, असा निष्कर्ष या क्षेत्रातील विश्लेषकांनी काढताच सर्वच जण चिंतातुर झाले. याचा परिणाम म्हणूनच आयसेनहॉवरनी अमेरिकेच्या आण्विक क्षमतेचा विस्तार करण्याचा निर्णय केला. पण अध्यक्षांपुढील खरे आव्हान वेगळेच होते. अमेरिकेच्या जनतेने प्रलयंकारी अशा आण्विक महायुद्धाचा धसका घेतला होता. त्यामुळे तिचा या निर्णयाला पािंठबा मिळणे दुरापास्तच होते. म्हणून आपल्या या निर्णयाची शब्दरचना जनतेला पटेल अशीच करणे आयसेनहॉवर यांना आवश्यक होते. त्यांनी आपला अणूकार्यक्रम ऊर्जा तयार करण्यासाठीच असल्याचे जाहीर करून प्रशासनाचा मार्ग सोपा करून टाकला. ८ डिसेंबर, १८५३ रोजी आयसेनहॉवर यांचे संयुक्त राष्ट्रसंघापुढे याच विषयावर भाषण होणार होते, त्यासाठी ते न्यू यॉर्ककडे रवानाही झाले, मात्र तोवर त्यांच्या या भाषणाच्या मसुद्याची प्रक्रिया सुरूच होती.

त्यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच अमेरिका आणि रशिया यांच्या अण्वस्त्रांचा कोठारांच्या संहारक क्षमतेवर भर दिला. संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात एकूण जेवढा दारूगोळा वापरण्यात आला होता; तेवढा साठा सध्या केवळ अमेरिकेकडे असल्याची आठवण त्यांनी उपस्थितीतांना करून दिली. अणूचा शांततापूर्ण कारणांसाठी वापर करण्यास बळकटी देणे; हाच दोन्ही परस्पर देशांतील विनाश थांबविण्याचा एकमेव उपाय असल्याचेही ते म्हणाले. नव्याने अस्तित्वात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा’ला (आयएईए) अमेरिका, रशिया आणि ब्रिटन हे विद्यमान अण्वस्त्रांचाधारी देश आपल्याकडील युरेनियम आणि फिसिल मटेरियल देण्यास तयार आहेत, असा प्रस्तावही त्यांनी मांडला. सदर आयोग ‘मार्शल प्लॅन’ म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणूकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल; असे जाहीर करून त्यांनी या आपल्या नव्या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणू’ असे नामाभिधानही केले. या त्यांच्या संकल्पनेचे आश्चर्यकारक उत्साहात स्वागत झाले, राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्याला दाद दिली आणि लागलीच संपूर्ण जगानेही त्याला पोहोच पावती दिली.

मात्र लवकरच अस्तित्वात येणाऱ्या आयएईएच्या स्थापनेचा प्रस्ताव काहीसा भ्रामक आणि संदिग्धच असणार आहे, याची तिथे हजर असलेल्यांपैकी फारच थोड्या जणांना कल्पना होती. संयुक्त राष्ट्रांना उद्देशून करायच्या आयसेनहॉवर यांच्या भाषणाचा अंतिम मसुदा तयार होत असतानाच अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाच्या एका भौतिकशास्त्राज्ञाने ‘व्हाइट हाउस’कडे एक मेमो रवाना केला. हा मेमो तयार करणाऱ्याचे नाव होते, रोनाल्ड आय. ‘स्पियर्स आयोगा’च्या परराष्ट्रविषयक घडामोडींचा तो एक तरुण विशेषज्ञ होता. अणुऊर्जेवर नियंत्रण ठेवून तिला नागरी उपयोगासाठी प्रोत्साहन देणारी एक एजन्सी संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर उभारण्यात यावी आणि ती संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असावी, असे त्यात सुचविण्यात आले होते. तसेच तिचे कामही अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाप्रमाणेच चालावे असेही त्यात नमूद करण्यात आले होते. आयसेनहॉवर यांच्या भाषणाच्या अंतिम मसुद्यात या संकल्पनेचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारच्या एजन्सीची स्थापना कशी करायची, तसेच ती आस्तित्वात आल्यावर तिचे नेमके परिणाम काय होतील, यावर काहीही विचार न करता तो मसुदा आयसेनहॉवर यांनी राष्ट्रसंघासमोर वाचून दाखविला. या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय पातळीवर उदंड प्रतिसाद मिळाला खरा, पण अशी एजन्सी प्रत्यक्षात कशी आqस्तत्वात आणायची याबाबत आयसेनहॉवर प्रशासनच बुचकळ्यात पडले. या प्रस्तावातील तरतुदींनुसार नागरी आणि लष्करी अणूकार्यक्रम समांतर चालणार होते आणि जवळपास ते परस्परांपासून वेगळे करता येणार नव्हते. याचाच अर्थ असा की, आयसेनहॉवर यांनी हा प्रस्ताव मांडून शांततेसाठी असलेली अणुऊर्जा आणि अण्वस्त्रांचासाठी वापरण्यात येणारी अणुऊर्जा यांच्यातील फरकच नाहीसा केला होता. या दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचा वापर करण्याची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे तयार नसताना, आयसेनहॉवर यांनी जणू एरवी बाटलीत बंद असलेल्या एका राक्षसाला मोकळे रान उपलब्ध करून दिले होते. 

No comments:

Post a comment