Saturday, 29 June 2019

द फुल कबर्ड ऑफ लाईफ


अ‍ॅलेक्झांडर स्मिथ लिखित आणि नीला चांदोरकर अनुवादित. 


दक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील गॅबोरोन हे शहर. त्या शहरात मॅडम रामोत्स्वे डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असते. वयाने प्रौढ असलेल्या रामोत्स्वेचं एक लग्न अयशस्वी झालेलं असतं.  गॅरेज मालक असलेल्या मातेकोनी यांच्याबरोबर तिचा वाङ्निश्चय झालेला असतो. मातेकोनी हे एक प्रेमळ पण भिडस्त सद्गृहस्थ असतात. रामोत्स्वेबरोबर वाङ्निश्चय झालेला असला तरी लग्न मात्र ते लांबणीवर टाकत असतात. अनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी ही एक कंजूस पण सुस्वभावी आणि धाडसी स्त्री असते. मातेकोनी यांच्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन ती मातेकोनींकडून तिची इतर कोणी करणार नाही, अशी काही कामे करून घेत असते. उदा. तिच्या अनाथालयातील जुनाट पंपाची वारंवार दुरुस्ती.  एकदा ती मोतेकोनींसमोर तिच्या अनाथालयासाठी निधी जमवण्यासठी विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे आव्हान ठेवते. भिडस्त स्वभावाचे मातेकोनी तिला ठामपणे विरोध करू शकत नाहीत. मातेकोनींचं विमानातून उडी मारणं कसं टळतं आणि त्यांचं रामोत्स्वेशी कसं लग्न होतं, याचं चित्रण द फुल कबर्ड ऑफ लाइफया कादंबरीत आहे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत अ‍ॅलेक्झांडर स्मिथ आणि अनुवादक आहेत नीला चांदोरकर.
       या कादंबरीच्या उपकथानकात वाचकांना परिचय होतो रामोत्स्वेची सहायक असलेली मॅडम माकुत्सी, रामोत्स्वेनं दत्तक घेतलेली अपंग मुलगी मोथेलेली आणि मुलगा पुसो, मातेकोनी यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे दोन तरुण - चार्ली आणि त्याचा सहकारी, स्त्रियांच्या केसांच्या आकर्षक पद्धतीनं वेण्या घालून त्यांच्या सौंदर्यात भर घालणारी एक यशस्वी केशरचनाकार मॅडम होलोंगा, होलोंगा ज्यांच्याशी लग्न करू इच्छित असते तो शिक्षक बोबोलोगो आणि रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, मांसमच्छीचं दुकान चालवणारा आणि रोव्हर ९०चा मालक लोबात्से, फस्र्टक्लास मोटर्सचा मालक मोलेफी यांच्याशी.       होलोंगाने प्रौढ वयात लग्न करायचा निर्णय घेतलेला असतो. तिने लग्नाचा प्रस्ताव मांडताच तिला बरेच फोन येतात. त्यातल्या चार पुरुषांची ती निवड करते; पण त्या चार जणांपैकी कुणा एकाची निवड करण्याआधी तिला त्या चौघांची चौकशी करायची असते. म्हणून ती डिटेक्टिव्ह रामोत्स्वेकडे येते आणि त्या चौघांविषयी माहिती सांगते. त्यात एक असतो शिक्षक बोबोलोगो आणि एक असतो चोवीस वर्षांचा रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, ज्यांची माहिती काढताना रामोत्स्वेला कळतं, की बोबोलोगो बारबालांसाठी आशा सदनचालवतो आणि त्याच्या विस्तारासाठी त्याला पैशांची गरज असते. बोबोलोगो आणि स्पोकेस स्पोकेसी निव्वळ पैशांसाठी होलोंगाशी लग्न करायला तयार आहेत, असं रामोत्स्वेला वाटतं; पण होलोंगाला तसं वाटत नाही. ती बोबोलोगोशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि त्याच्या समाजकार्यातही सहभागी होते.   
       मॅडम माकुत्सीचं भावविश्व तिच्या गावाकडच्या कुटुंबाबरोबरच रामोत्स्वे आणि मातेकोनी यांच्याबरोबर बांधलं गेलं आहे. या दोघांशी तिचे संबंध सौहार्दाचे आहेत. तिचा एक अपंग भाऊ रिचर्डला मृत्यूने तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. रामोत्स्वेला मदत करण्याबरोबरच ती फक्त पुरुषांसाठी टायपिंग क्लासही चालवते. लघुलिपी ती जाणते आणि बोट्स्वाना सेव्रेâटरिअल कॉलेजमधून ती ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेली असते. एका खोलीतून दुसNया प्रशस्त घरात राहायला जायची तिची तीव्र इच्छा असते आणि ती पूर्ण झाल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही.
       मातेकोनी मॅडम पातोक्वानींच्या सांगण्यावह्वन पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारणार आहेत, हे जेव्हा रामोत्स्वेला समजतं, तेव्हा तिला भीती वाटते. म्हणून ती चार्लीला सांगते, की पॅराशूटचं धाडस तू केलंस तर पेपरमध्ये तुझं नाव छापलं जाईल, तुला प्रसिद्धी मिळेल, सुंदर मुली आपणहून तुझ्या मागे येतील वगैरे. रामोत्स्वेचं हे म्हणणं चार्लीला पटतं आणि तो पॅराशूटचं धाडस करायला तयार होतो. दरम्यान, लोबात्सेच्या रोव्हर ९० या गाडीचं फस्र्ट क्लास मोटर्सचा मालक मोलेफी याने जाणीवपूर्वक नुकसान केलं आहे, हे मातेकोनीला समजतं आणि ते त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन त्याच्या माणसांकडे त्याची चौकशी करतात. मोलेफीला हे समजल्यावर तो मातेकोनींशी भांडायला येतो; त्यांच्या भांडणात तो मातेकोनींना मारहाण करेल या भीतीने रामोत्स्वे मॅडम पातोक्वानींना घेऊन येते. त्या मोलेफीला असा काही सज्जड दम भरतात, की तो पळच काढतो. त्याचवेळेला रामोत्स्वेला  त्या सुचवतात, की मातेकोनींना बेसावधपणे विवाहाच्या बंधनात अडकवता येईल. रामोत्स्वेची संमती मिळाल्यावर तिला त्याकामी मदत करायचं त्या आश्वासन देतात. चार्लीचं पॅराशूटचं धाडस यशस्वी होतं का आणि मॅडम पातोक्वानी रामोत्स्वे-मातेकोनींच्या विवाहासाठी कोणता मुहूर्त शोधतात, यातील रोचकता अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. 


No comments:

Post a comment