Friday, 15 August 2014

फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट १९४७ ची मध्यरात्र. 

भारताच्या घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या बंगल्याच्या बागेत धूर निघताना दिसत होता. थांबा! कोणा एखाद्या आगलाव्याचे कृत्य नव्हते ते! तेथे चालले होते होमहवन! बाजूला बसलेल्या ब्राह्मणांच्या मंत्रघोषांच्या तालावर त्या होमात वेगवेगळ्या आहुती पडत होत्या. भारतीय स्वातंत्र्याच्या शुभघडीला अग्निदेवाला आवाहन करण्यात येत होते. भारताचे भावी मंत्रिगण होमकुंडाला प्रदक्षिणा घालून त्याचा आशीर्वाद मागत होते. दुसरा एक ब्राह्मण प्रत्येकाच्या अंगावर मंतरलेले पाणी शिंपडत होता. त्यानंतर प्रत्येक जण तेथे जवळच उभ्या असलेल्या एका ध्Eाीच्या हातातील तांब्याच्या कलशातील वुंâकुमतिलक तिच्याकडून आपल्या भालप्रदेशावर लावून घेत होता. हिंदु तत्त्वज्ञानानुसार त्यास `तिसरा डोळा' म्हणत. त्याच्या प्रभावाखाली कोणीही दुष्ट शक्ती त्या व्यक्तीकडे वर डोळा करून पाहू शकत नव्हती. अशा तNहेने दैवी शक्तींचा विधियुक्त सोपस्कार अंगीकारून ते ध्Eाी-पुरुष राष्ट्रीय ध्वजांनी सजवलेल्या घटना-समितीच्या सभागृहात जाऊन आपापल्या जागा धरून बसले. इकडे, व्हाईसरॉय लुई माऊन्टबॅटन आपल्या अभ्यासिकेत एकटेच बसून अखेरची निरवानिरव करत होते. समोर ठेवलेल्या सरकारी कागदपत्रांवर अखेरच्या सह्या, शिक्कामोर्तब पूर्ण होत होते. थोड्याच अवधीत त्यांना असलेला ऐतिहासिक दर्जा संपुष्टात येणार होता. जगातील सर्वांत मोठ्या अधिकारस्थानाला पूर्णविराम मिळण्याचा क्षण जवळ येत चालला. त्यांना स्वत:शीच बोलावेसे वाटले - `या पृथ्वीतलावरील सर्वांत शक्तिशाली माणूस थोड्याच अवधीत निर्माल्य होऊन जाणार! म्हणेन तो चमत्कार घडवून आणण्याचे माझे सामथ्र्य लुप्त होणार.' त्यांना एच. जी. वेल्सची एक कथा आठवली. कोणता चमत्कार घडवावा बरं या उरल्यासुरल्या वेळात? एकाएकी ते ताडकन उठून बसले. `हां, आठवले! पालनपूर संस्थानच्या बेगमेला `हर हायनेस'ची पदवी बहाल करून टावूâ!' एका वेगळ्याच तडपेâने त्यांनी आपल्या कार्यालयीन साहाय्यकाला बोलावून घेण्यासाठी भराभर घंटा वाजवली.

त्यांच्या या आकस्मिक निर्णयाच्या पाठीमागे एक सांगण्यासारखा इतिहास होता. मागे प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीत माऊन्टबॅटन व पालनपूरचे नबाब यांची चांगलीच गट्टी जमली होती. १९४५ मध्ये आशियाच्या सेनापतीपदावर असतांना त्यांनी पालनपूरला भेट दिली होती. त्यावेळी नबाबांची देखणी, कार्यक्षम ऑस्ट्रेलियन बेगम व त्यांचे रेसिडेंट सर विल्यम क्रॉफ्ट माऊन्टबॅटनकडे आले होते. नबाबांशी निका लावताना त्या ऑस्ट्रेलियन युवतीने मुसलमान धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यानुषंगाने पाळावे लागणारे सर्व संस्कार अंगीकारले होते. बेगमसाहेब संस्थानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्यही करून राहिल्या होत्या. त्यांना प्रजेचे प्रेमही मिळाले होते. पण नबाबसाहेबांना एका गोष्टीचे दु:ख सतत टोचत होते. त्या भारतीय
नसल्याने त्यांना `महाराणी' पदाची बिरुदावली वापरण्याचा अधिकार प्राप्त झालेला नव्हता. व्हाईसरॉय त्यांना `हर हायनेस' मानायला तयार नव्हते. आपली ही तक्रार त्यांनी माऊन्टबॅटन यांच्या कानांवर घातली. दिल्लीला परतल्यानंतर माऊन्टबॅटन यांनी व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेलना व्यक्तिश: त्याबद्दल गळ घातली पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण सरकारलाच ते नको होते. एकदा का तशी सवलत मिळाली की संस्थानिकांत विदेशी युवतींशी विवाह करण्याची लाटच उसळेल व त्यायोगे त्यांच्या `राजेशाही' थाटाच्या परंपरांना सुरुंग लागून त्या खाली कोसळतील अशी ब्रिटिश सरकारला भीती होती.

आपले मदतनीस आल्याबरोबर माऊन्टबॅटननी आपला नियोजित प्रस्ताव जाहीर केला. ``सर, आपण ते करू शकत नाही.'' एकाने सूर काढला. ``कोण म्हणतं असं? अजूनही मी हिंदुस्थानचा व्हाईसरॉय आहे ना? मग?''
माऊन्टबॅटन हसतहसत उत्तरले. ताबडतोब त्यांनी आपल्या शिक्क्याचा सरकारी कागद धुंडाळून आणण्याची सूचना आपल्या कार्यवाहाला दिली. त्यावर योग्य तो मजवूâर लिहून घेण्यास सांगितले. काही शेलक्या स्तुतिपर विशेषणांनी बेगमसाहेबांच्या कार्याचा गौरव करून त्याप्रीत्यर्थ `परमेश्वराच्या कृपेने' त्यांना `हायनेस' च्या उच्च पदावर नेऊन बसवले. हे सगळे सोपस्कार पूर्ण व्हायला रात्रीचे अकरा वाजून जग शांत झोपलेले! अठ्ठावन्न मिनिटे झाली. त्यांच्या डेस्कवर आलेला तो अंतिम आदेश पाहताना त्यांच्या चेहNयावर कर्तव्यपूर्तीचे, वचनपूर्तीचे सुरेख सुहास्य खुलले होते. पुन्हा एकदा त्यांनी तो आदेश तपासून पाहिला. बाजूस ठेवलेले पेन उचलले आणि हिंदुस्थानचा व्हाईसरॉय या नात्याने असलेल्या अमर्याद अधिकाराचा अंतिम अंमल
केला. व्हाईसरॉय म्हणून केलेल्या त्यांच्या सहीने पालनपूरच्या बेगमेला `हायनेस' पदवी प्राप्त झाली! जवळजवळ त्याच क्षणाला व्हाईसरॉय भवनावर फडकत असलेला युनियन जॅक खाली उतरत होता. 

माऊन्टबॅटन यांच्या या कृतीचे सर विल्यम क्रॉफ्टनी अत्यंत कृतज्ञतापूर्ण शब्दात स्वागत करून त्यांना हार्दिक धन्यवाद दिले. त्यांच्या या परोपकाराची परतपेâड केव्हाही करण्याची तयारी दाखवली. योगायोग असा की, पुढे १९५० मध्ये माऊन्टबॅटन नाविकदलात एका ज्येष्ठ स्थानावर काम करत असताना एक प्रकरण उद्भवले. नाविकदलाला असलेल्या काही जकातसवलती काढून घेण्याचा सरकारी जकात अधिकाNयांनी आदेश दिला होता. सरकारी खर्चात बचत करण्याचा उपाय म्हणून. ते हक्क परत मिळावेत म्हणून अनेकांनी खटपट करून पाहिली - अगदी नाविकदलाच्या सचिवांनी देखील. शेवटी माऊन्टबॅटननी प्रयत्न करून पाहायचे ठरवले. सचिवांनी त्यांना सल्ला दिला - ``त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कलेक्टर ऑफ कस्टम्स िंकचितही बधणार नाही. कारण, यात सरकारच्या आर्थिक धोरणाचा प्रश्न आहे व त्यामुळे मंत्रिमंडळाचा त्याला भक्कम पाठिंबा आहे.'' पण माऊन्टबॅटनही इरेलाच पडले. ते स्वत:च कलेक्टराच्या कार्यालयात भेटीसाठी गेले आणि काय आश्चर्य! कलेक्टर ऑफ कस्टम्स म्हणून सर विल्यम क्रॉफ्टच साक्षात उभे त्यांच्या पुढ्यात. ``तुम्ही भेटता आहात याचा मला अतिशय आनंद होत आहे. पालनपूरच्या बेगमेच्या बाबतीत तुम्ही जे काही केलंय त्याबद्दल मी तुमचा केव्हाच उतराई होऊ शकत नाही.''

``असं कसं! ती संधी तुम्हाला मिळू शकेल!'' माऊन्ट म्हणाले. आणि मग काय? नाविकदलाच्या सवलती अबाधित राहिल्या. सर विल्यम क्रॉफ्टनी परतपेâड केली होती.

अनादि कालापासून, दंतकथायुगातून अश्मयुगात पदार्पण केलेल्या जगाची माणसाला आठवण राहणाNया कालाच्याही पूर्वीपासून, भारताच्या भूमीवर शंखांचा नाद ऐवूâ येत असे. त्या शंखनादाच्या कर्वâश पण पवित्र अशा सुरांवर नाचत नाचत उष:कालाची किरणे भारतभूला प्रकाशित करायची. भारताला त्याच्या गाढ निद्रेतून
जागी करायची. आजही त्याच प्रकारचे पवित्र कार्य करायला एक माणूस सिद्ध झाला होता, आसुसलेल्या लक्षावधी मानवांच्या कानांवर एक शुभवार्ता घालण्यासाठी नव्या दिल्लीतील घटनासमितीच्या सज्जाच्या एका कडेला आपल्या काखेत एक गुलाबी-जांभळ्या रंगाची झगमग करणारी तुतारी घेऊन उभा होता. 

पांढNयाशुभ्र खादी टोप्या व सदरे घालून सिद्ध झालेल्या, भारतातील गल्लीबोळांत जमलेल्या काँग्रेस सैनिकांना आदेश देण्यासाठी सज्ज होता तो. त्याने दिलेल्या इशाNयासरशी साम्राज्याचे खांब उलथून टाकण्यासाठी सिद्ध झालेली भुतावळ पृथ्वीवरचे ते दीडशे वर्षांचे महान साम्राज्य खाली उतरून घेण्याच्या कामास आरंभ करणार होती. त्याच्याच खालील बाजूस एका व्यासपीठावर उभे होते जवाहरलाल नेहरू!
त्यांच्या खादीच्या सुती जाकिटाच्या बटनहोलमध्ये नेहमीप्रमाणे एक ताजा टवटवीत गुलाब खुलून दिसत होता, नेहरूंच्या तजेलदार व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व करत. सभागृहाच्या भिंतीवरील माजी व्हाईसरॉयांची तैलचित्रे जाऊन त्या जागी तिरंगी ध्वजांची सजावट करण्यात आलेली होती. त्यांच्या समोरच्या जागेत बसले होते त्या रात्री जन्म घेणाNया नवोदित राष्ट्राचे प्रतिनिधी. विविध वंशांचे, भाषांचे, संस्कृतीची प्रतीके असणारी ती माणसे जगात इतरत्र कोठेही न सापडणारी विभिन्नता साकार करत होती. त्यांचा देश म्हणजे विरोधाभासाचा वास्तवपूर्ण आदर्शच जणू! एकीकडे सर्वोच्च पारमार्थिक उन्नती, तर दुसरीकडे जगातील अत्यंत खालच्या पातळीवरचे दारिद्रय! त्या देशातील शेतजमिनीपेक्षा तेथील माणसंच अधिक फलदायी! परमेश्वरावर, दैवी चमत्कारांवर श्रद्धा असणारी अशी माणसे इतरत्र आढळणार नाहीत. जगातील इतर कोणत्याही देशासमोर नसतील एवढ्या समस्या या नव्या राष्ट्रासमोर खड्या राहणार होत्या. परंतु एक गोष्ट मात्र निर्विवाद होती. या देशाला लाभलेला सांस्कृतिक वारसा मानवतेच्या इतिहासात त्याला मानाचे स्थान मिळवून देत होता. असा हा नवा स्वतंत्र भारत आपल्या विशाल बाहूंत अठ्ठावीस कोटी हिंदू - त्यांत सात कोटी अस्पृश्य-, साडेतीन कोटी मुसलमान, सत्तर लाख खिश्चन, साठ लाख शीख, एक लाख पारशी आणि चोवीस हजार ज्यूंना सामावून घेणार होता. त्या सभागृहात बसलेल्या फारच थोड्यांना एकमेकांची मातृभाषा समजत होती. सर्वांना बोलता येत होते इंग्रजी. आता त्या देशात पंधरा प्रमुख भाषा व जवळजवळ आठशे पंचेचाळीस बोलीभाषांतून व्यवहार होणार होता. पंजाबमधील उर्दूभाषिक उजवीकडून डावीकडे वाचत जाणार तर त्यांच्याच शेजारचे उत्तर प्रदेशातील हिंदीभाषिक डावीकडून उजवीकडे. मद्रासमधील तामीळी तर कधीकधी वरून खाली, खालून वर. विशेष मौज म्हणजे त्यांच्या खाणाखुणांचा अर्थ एकदम विसंगत. दाक्षिणात्य मद्रासी माणसाने मान हलवली की समजावे `हो' आणि तीच मान उत्तर भारतीयाने हलवली की अर्थ घ्यायचा `ना'
या देशाच्या एवूâण लोकसंख्येपैकी तेथील नुसत्या महारोग्यांची संख्या स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येइतकी होती. पुजाNयांची बेल्जियमइतकी, भिकारी हॉलंडइतके, साधू जग शांत झोपलेले!

जवळजवळ एक कोट, आदिवासी दोन कोट - नागालँन्डमधील अजूनही नरबळी घेणारे! एक कोट फिरस्ते-गारुडी, जादूटोणा करणारे, जिप्सी, मांत्रिक, वैदू वगैरे नाना धंदे करणारे. या सुपीक भारतभूवर रोज अडतीस हजार नवीन जीव अवतार घेत. त्यांतले पंचवीस टक्के पाच वर्षांच्या आधीच जगाचा निरोप घेत. जवळजवळ
एक कोट लोक अपुरी वाढ, उपासमार, पटकी अशा तNहेच्या रोगांना बळी पडत. या उपखंडात पृथ्वीतलावर इतरत्र कोठेही न आढळणारी आध्यात्मिक उपासना चालत होती. या देशानेच जगातील एका महान धर्माला-बौद्धधर्माला-जन्म दिला होता. हा देश हिंदूंची मातृभूमी होता. याच देशावर इस्लामचाही प्रभाव भरपूर पडला
होता. या देशात नाना तNहेचे, नावांचे, रूपांचे देव वावरत होते. या देशात एकीकडे सर्वोच्च आत्मिक शक्तीच्या प्राप्तीसाठी योगसाधना आचरणात येत होती, तर दुसरीकडे त्याच दैवी शक्तीची पूजा करताना अनेक मुक्या प्राण्यांचे बलिदान विंâवा किळसवाण्या वैषयिक कृती यांचे गुपचूप पालन करण्यात येत होते. निरनिराळ्या
स्वरूपांत परमेश्वर या देशात वास करत होता. भारतीय हिंदूंना तो कधी वटवृक्षात, तर कधी या देशात वास्तव्य करणाNया दहा लाख माकडांत, तर कधी दोन कोटी पवित्र गायींत, तर कधी वर्षाकाठी वीस हजारांचा जीव घेणाNया सर्पराजांत आढळायचा. 

एकीकडे जगातील धनाढ्य माणसांत गणना करावी असे काही, तर दुसरीकडे तीन कोटी शेतकरी हातावर पोट भरणारे, गोळाभर अन्नाच्या विवंचनेत असणारे. लोकसंख्येच्या त्र्याएेंशी टक्के लोकांना अक्षरओळख नव्हती. दरडोई उत्पन्न फक्त चाळीस पैसे दिवसाचे. महानगरांमधील चौथा हिस्सा लोकांचे जीवन पूâटपाथवर सुरू व्हायचे व तेथेच संपायचेही! पाऊस सरासरी एकशे चौदा सेंटीमीटर; विविध प्रदेशांत विविध प्रमाणात पडायचा तो. जवळजवळ तीस लाख चौरस मीटर प्रदेशात पावसाचा थेंब नाही. त्याच्या उलट काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जमिनीतील क्षार वर येऊन जमीन शेतीसाठी निकामी होण्याची पाळी. देशाच्या आर्थिक व्यवहारांवर तीन कुटुंबांची हुकमत - टाटा, बिर्ला, दालमिया. प्रामुख्याने सर्व व्यवहार मूठभर जमीनदार व
भांडवलदार यांच्याच हातात. त्यांच्यावर राज्य करणाNया साम्राज्यवाद्यांनी देशाच्या औद्योगिकीकरणासाठी कसलीच खटपट केली नव्हती. त्यामुळे निर्यात करता येण्यासारख्या वस्तू चारच - ज्यूट, चहा, कापूस व तंबाखू. बरीचशी यंत्रसामग्री परदेशातून आयात व्हायची. भारतात होणारा विजेचा वापर अतिशय कमी-अमेरिकेच्या अर्धा टक्का. जगातील एक दशांश लोखंड सापडणाNया भूगर्भातून वर्षाला फक्त दहा लाख टनाच्या आसपास पोलाद निर्माण होत असे. अडतीसशे मैलांची किनारपट्टी असूनही लोकसंख्येच्या प्रमाणात दरडोई दरवर्षी एक पौंडही मासळी वाट्याला येत नव्हती. वास्तविक या सगळ्या दुर्दशेचे खापर त्याच्या वसाहतवादी राजकत्र्यांच्याच डोक्यावर पुâटणे शक्य असतानाही त्या दिवशी त्या सभागृहात एकत्र आलेल्या त्या ध्Eाी-पुरुषांच्या मनात इंग्रज राज्यकत्र्यांंविषयी द्वेषाची विंâवा विषादाची भावना निर्माण झालेली नव्हती. हा एक त्या देशाचा स्वभावविशेषच म्हणावा लागेल. असल्या उदासवाण्या विचारांना तेथे थारा नव्हता. तेथे होती एक भोळी आशा की सत्तांतर झाल्यावर आपल्या मायभूमीचे कष्टदायक दिवस सरतील, डोक्यावरचे ओझे हलके होईल. 

आपल्या राज्यकत्र्यांचे हे ओझे उचलण्याचे भाग्य असलेला तो माणूस सभागृहाला उद्देशून चार शब्द सांगण्यासाठी उभा राहिला. लाहोरहून आलेल्या दूरध्वनिसंदेशाने विचलित झालेल्या नेहरूंना आपले भाषण लिहून काढण्यास वेळ नव्हता मिळाला. त्यामुळे आता ते उत्स्पूâर्त, अंत:करणास जे जाणवेल ते बोलणार होते. त्यांनी सुरुवात केली—

``अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ती सर्वांशाने नसली, तरी बहुतांशाने- करत आहोत आपण. मध्यरात्रीचा टोला पडताच, सारे जग शांत झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात नवा जन्म घेत आहे...'' 

एकापेक्षा एक सरस अशी शब्दयोजना नेहरूंच्या ओठातून आकार घेत होती. त्यांचे शब्द लोकांना ऐकू येत असले तरी त्यांचे मन मात्र लाहोरच्या ज्वालांनी होरपळत होते. आपण काय बोलत आहोत याचे आपणाला भानच नव्हते, असे आपल्या भगिनीजवळ नेहरू नंतर म्हणाले. समारोप करताना नेहरूंनी सांगितले, 

``आज आपल्या दुर्दैवाची अखेर होत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध देश घेत आहे. ही वेळ क्षुद्र व विघातक टीकेला मूठमाती देण्याची आहे, एकमेकांविषयी दुष्ट हेतू विंâवा दोष ठेवण्याची नाही. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग असा प्रासाद उभारायचा आहे, ज्यामध्ये या देशाची लेकरे सुखाने नांदतील.'' 

बरोबर बाराच्या ठोक्याला नेहरूंनी सर्वांना उत्थापित होण्याची सूचना देऊन भारत व भारतीय जनता यांच्या सेवेस वाहून घेण्याची प्रतिज्ञा घेण्याचा आदेश दिला. बाहेरच्या बाजूस पावसाच्या सरी सभागृहाच्या आसपास गर्दी केलेल्या हजारोंना भिजवून चिंब करत होत्या. मध्येच ढगांचा गडगडाटही कानावर पडत होता. येत्या
क्षणाची विस्मयाने वाट पाहणाNया सर्वांना त्याची बिलवूâल क्षिती नव्हती. सभागृहातील घड्याळाचे काटे बाराच्या आकड्यावर सरकले. सभागृहात आसनस्थ असलेल्या प्रतिनिधींच्या माना त्या अद्वितीय क्षणाची प्रतीक्षा करताना लवल्या होत्या. त्यांची मने शांतपणे चिंतन करण्यात गढली होती. त्यांचे कान घड्याळाच्या
टोल्याकडेच लागले होते. सगळीकडे शांत, शांत झाले. घड्याळाचे काटे बारावर स्थिरावले. घणऽ घणऽ घणऽ नाद घुमू लागला. बसलेल्यांपैकी एकही जण हलला नाही. दहाऽ अकराऽ बाराऽऽऽ...! दिवस संपला. चौदा ऑगस्ट संपला. त्याबरोबरच एका युगाची समाप्ती झाली. बाराच्या ठोक्याचा नाद घुमत असतानाच सज्जात उभ्या जग शांत झोपलेले! राहिलेल्या वादकाने नव्या राष्ट्राच्या उदयाची ललकारी दिली. जगाच्या दृष्टीने एका
कालखंडांची ती अखेर होती. त्या कालखंडाचा आरंभ झाला होता १४९२ मध्ये. त्या काळी खिस्तोफर
कोलंबसने आपले जहाज हाकारले हिंदुस्थानच्या शोधार्थ आणि तो पोहोचला मात्र अमेरिकेला. त्या शोधाची सावली साडेचारशे वर्षांच्या मानवी इतिहासावर पडत गेली. युरोपीय शासकांकडून झालेल्या गौरेतर जनसामान्यांच्या आर्थिक, धार्मिक व शारीरिक शोषणात त्याचे पर्यवसान झाले. वसाहतवाद्यांच्या कारस्थानाला अनेक जातीजमाती बळी पडल्या. युरोपीयन राजसत्तांपैकी रोम, बॅबिलोन, कार्थेज व ग्रीस यांच्या तुलनेने विस्तार, लोकसंख्या व प्रतिष्ठा या सर्वांच्या बाबतीत वरचढ ठरणारे एक साम्राज्य ब्रिटिशांनी
स्थापन केले. त्यांच्या कब्जातून आज एक उपखंड स्वतंत्र झाला. साम्राज्यमुकुटातील हा कोहिनूर गळून पडल्यानंतर इतर छोटीमोठी रत्ने किती काळ टिकणार? भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्ताने मानवाच्या मुक्तिगाथेचा नवा अध्याय सुरू झाला. कालप्रवाहाच्या या लाटेला थोपवण्याची ताकद वसाहतवाल्यांपाशी शिल्लक नव्हती. त्या दिवशी ललकारलेल्या त्या ध्वनीत जगाच्या युद्धोत्तर इतिहासाची नांदी उमटत होती.
आता पाऊस थांबला होता. बाहेरच्या जमावात आनंदाची लहर उसळली. सभागृहातून बाहेर पडलेल्या नेहरूंच्या दिशेने हजारो लोक धावले; त्यांना आनंदतिशयाने आलिंगन देण्याची अहमहमिका बाळगून. भोवतालचे काही मोजके पोलीस त्यांना आवर घालण्याचे प्रयत्न करत होते. नेहरूंच्या चेहNयावर आनंदाने नवा पुâलोरा उमलला होता. आपल्या शेजारी उभ्या असलेल्या एका सहकाNयाला ते म्हणाले - ``बरोबर दहा वर्षे झाली त्या
प्रसंगाला. मी लंडनमध्ये होतो त्यावेळी. लॉर्ड लिन्लिथ्गो हिंदुस्थानचे व्हाईसरॉय होते. माझी व त्यांची चांगलीच जुंपली. मी इतका संतापलो होतो की बस्स! त्यांच्यावर ओरडत मी त्यांना म्हणालो - ``जर दहा वर्षांत आम्ही स्वातंत्र्य मिळवले नाही, तर आम्ही नालायक ठरू.'' त्यावर लिन्लिथ्गो उत्तरले - ``छे, ते जमणार नाही तुम्हाला, मिस्टर नेहरू! निदान मी जिवंत असेपर्यंत तरी अशक्यच. तुम्ही जिवंत असेपर्यंत देखील
नाही!'' हा किस्सा सांगून नेहरू खळाळून हसले. 

दिल्लीत सगळीकडे रोशणाई केलेली होती. सगळीकडे झगमगाट करणारे रंगीबेरंगी दिवे चमचमत होते. लाल किल्ला, बिर्ला मंदिर, कनॉट सर्कल सगळीकडे आतशबाजी चालू होती. लोक रस्त्यावर नाचत, गात एकमेकांचे अभिनंदन करत हिंडताना दिसत होते. इंपीरियल हॉटेलच्या बारमध्ये चिक्कार गर्दी झाली. मध्यरात्रीस त्यांच्यापैकी एक जण बारच्या काऊंटरवर चढला आणि जमलेल्या लोकांना त्याने आपल्याबरोबर
राष्ट्रगीत म्हणायला सांगितले. पण आश्चर्याची गोष्ट ही की, त्यांच्यापैकी बहुतेकांना आपल्या नव्या राष्ट्रगीताचे शब्दच आठवेनात. बिचारे खजील झाले पार! 

No comments:

Post a comment