Saturday, 16 August 2014

युगंधर

गोकुळ!! कसं होतं हे माझं प्राणप्रिय गोकुळ ? तशी व्रजभूमीत आणखीही सतरा-अठरा गोकुळं होती. त्यातील माझं गोकुळ  प्रमुख होतं. सर्व-सर्व प्रकारच्या प्रदूषणांपासून दूर. निसर्गदत्त, टवटवीत. इथं नुसतेच गोपगोपी ध्Eाी-पुरुष नव्हते राहत. आर्यावर्ताच्या ब्रह्मावर्त या गंगा-यमुनेच्या खोNयातील ते एक नांदतं, छोटं
ग्रामच होतं. आर्यावर्ताचा घेरही चांगला दंडकारण्यापासून गांधारापर्यंत पसरला होता त्या वेळी. गोकुळांत कृषिवलांपासून, सुवर्णकार, काष्ठकार, उपलेपक, रजक, धीवर, वुंâभकार, लोहकार, चर्मकार अशा अठरापगड ज्ञातीही गुण्यागोिंवदानं नांदत होत्या. त्याही `गोप’च मानल्या जात होत्या.

असं हे गोवूâळ होतं, व्रजभूमीच्या गालावरच्या लाडिक खळीसारखं! निसर्गाला पडलेल्या गोड पहाटस्वप्नासारखं! माझं पहाटस्वप्न मात्र अनेक लहानथोर रसरशीत स्वभावाच्या जिवंत ध्Eाी-पुरुषांनी कसं खच्चून भरलेलं होतं. ही सर्व लहानथोर माणसं उत्क्रांतीच्या दुसNया टप्प्यातील प्रारंभीच्या काळातील होती, म्हणूनच तर ती अगदीच प्राकृतिक होती. त्यांचे राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सारे विकारही त्यांच्या रक्तासारखेच दाट होते. नैर्सिगक होते. आणि होय; त्यांचं निर्भेळ, निकोप, निर्लेप प्रेमही तसंच घनदाट होतं! निसर्गसुंदर होतं. त्यांच्या बोलण्या-वागण्याला कसलेही आतले-बाहेरचे म्हणून वेगवेगळे कप्पेच नव्हते. त्यांचा स्थायिभाव एकच होता. प्रेमासाठी प्रेम हा! प्रेमयोग हा!

येथील प्रत्येक माणूस हा प्रेमाचा एक निकोप व रसवंत वंâदच होता. भावमधानं शिगोशीग टिच्चून भरलेला. म्हणूनच गोकुळातील ही लहानथोर ध्Eाी-पुरुष माणसं मी विसरू म्हटल्यानं कधी विसरूच शकत नाही. किती माणसं – किती भाव, किती स्वभाव, किती विभाव!

माझे बाबा – नंदबाबा – गोपांचे मुखिया. वैश्य ज्ञातीचे. भरगच्च शरीरयष्टीचे, निमगौर, गोलचर्येचे, ठेंगणे. माझी माता – यशोदामाता – सशक्त, बाबांहून िंकचित उंच, गौर, चंद्रमुखी, सदा हसरी. माझे आठ काका – सुनंद, उपनंद, महानंद, नंदन, कुलनंदन, बंधुनंद, केलीनंद आणि प्राणनंद असे. दिसायला जवळ-जवळ सारेच
नंदबाबांसारखेच. एकजात सगळेच पुढच्या-मागच्या वयाचे. आणि त्यांच्या आठा qध्Eाया म्हणजे माझ्या आठ कावूâ. त्यांना त्यांच्या पतीच्या नावानंच आम्ही सुनंदकावूâ, नंदनकावूâ, केलीनंदकावूâ असे ओळखत व हाकारत असू. यातील प्रत्येक काका कशा ना कशाततरी निष्णात होता. कुणी गोधनाच्या ऋतुनुसार येणाNया विकारांवर अचूक गुणकारी औषधी वनस्पती देई. कुणी बाबांच्या अनुपाqस्थतीत त्यांची सर्व कामं त्यांच्या इतक्याच कौशल्यानं पार पाडी. कुणी सप्तसुरांच्या दावणीला बांधून संगीताचे नाना राग सहज आळवी. कुणी उपनिषदांचा आधार घेत सुंदर प्रवचनं देई. 

यातील केलीनंदकाका हे तर हुतुतू, हमामा, लगोरी, तळ्यात-मळ्यात, खो-खो, आट्यापाट्या, सुरपारंब्या, जलतरण, मल्लविद्या अशा कितीतरी क्रीडाप्रकारांत पारंगत होते. म्हणूनच माझे ते सर्वांत प्रिय काका होते. माझी दुसरी माता होती – रोहिणीमाता, यशोदामातेहून थोडीशी उंच, गौर, सडसडीत. माझ्या ज्येष्ठ बंधूची –
बलरामदादाची आई.

बलरामदादा! वयानं माझ्यापेक्षा थोडासाच मोठा. तांबूसगौर, बाळसेदार. दाट जावळाचा. पटकन संतापणारा, तसाच चटकन निवळणारा. आम्ही सावत्रबंधू होतो. यशोदामातेला आम्ही दोघंही आदरानं `थोरली' म्हणत असू. साहजिकच रोहिणीमातेची आपसूकच `धाकली' आई झाली होती! आम्हा दोघा भावांना नंतर लाभलेली आणखी एक बहीण होती. थोरलीला माझ्यानंतर काही वर्षांनी झालेली – एकानंगा. आमच्या लडिवाळ कौतुकानं झालेली `एका.' सर्वांचीच अत्यंत लाडकी एका!

या क्षणी मला सर्वाधिक डोळ्यांच्या समोर येत आहेत, ते माझे सर्वांत प्रिय वृद्ध आजोबा – नंदबाबांचे बाबा – चित्रसेन! आमची आजी मात्र फार पूर्वीच निर्वतली होती. तिचं प्रेम काही नाही मिळालं आम्हाला. चित्रसेन आजोबा होते, भरगच्च पांढNयाशुभ्र, भूछत्री मिश्यांचे. जाड भुवयाही पांढNयाशुभ्र झालेले. सदैव तांबूल खाणारे. तो रवंथ केल्यासारखा तोंडात सतत चघळत ठेवणारे. त्यांची घुंगुरवाली चंची बाळगणारे. थोर हाडापेराचे. मस्तकी पिळाचं, विटकरी वर्णाचं, गोपपागोटं गुंडाळणारे. कपाळी गोपीचंदनाचा ठसठशीत टिळा रेखणारे. अंगातील बाराबंदीवर घोंगडीचंच उपरणं दोन्ही खांदाभर वेढून पांघरणारे. कमरेला कावेत रंगविलेल्या
करवंदी काठधारी धोतराचा गुडघ्यापर्यंत करकचून आवळलेला बळकट `गोपकाष्टा' कसलेले. हातात वरखाली होणारं ठसठशीत कुलचिन्ह – चांदीचं कडं ल्यालेले. उजव्या कानपाळीत वरच्या बाजूला टोचलेलं, मोतीधारी लोंबतं सोनेरी कर्णभूषण असलेले. थकल्यानं नेहमी वाकलेले. हातात भक्कम, घुंगुरवाळ्या गवळकाठीचा
आधार घेतच `इडा आईऽऽ' म्हणत उठणारे.

या आजोबांनीच तर मला गोकुळात माझी ‘जीवनगीता’ कितीतरी ढंगांनी गोपभाषेत नीट समजावून दिली होती. कुठलाही माणूस जसा सावलीला सोडू शकत नाही; तसाच मी या चित्रसेन आजोबांना कधीच विसरू शकत नाही. काय-काय, कसं-कसं नि नाना ढंगांनी समजावून सांगितलं त्यांनी मला! तसं माझं बालपण हे त्रिकुटाचं होतं. भावत्रिकोणाचं होतं. मी बलरामदादा – नंतर तर नुसता दादा आणि आम्ही चांगले पाच-सहा वर्षांचे झाल्यानंतर आम्हाला लाभलेली एकुलती एक लाडकी बहीण एकानंगा – आमची प्रिय एका. आमचं हे त्रिवूâट वाड्यात असताना, अधिक ते आजोबांच्या भोवतीच घुटमळत, गरगरत राही. बाबा, थोरली, धाकली, सर्व काका-कावूâ, चुलत भावंडं यांनी कसं गजबजून गेलेलं होतं, ते आमचं अभिरभानूवंशीय गोपकुटुंब. बाहेर गोवूâळ नि वाड्यातही गोवूâळच!


No comments:

Post a comment