Wednesday, 20 August 2014

शंकर पाटील

शंकर पाटील

जन्म        : ८ ऑगस्ट, १९२६ 
मृत्यू       : ३० जुलै, १९९४
जन्मगाव    : पट्टणकोडोली. तालुका – हातकणंगले
शिक्षण      : बी.ए., बी.टी. (गडहिंग्लज व कोल्हापूर येथे)
व्यवसाय       : रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून अध्यापन
आकाशवाणी पुणे केंद्रावर नियुक्ती (१९५७)
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन
मंडळात विशेष अधिकारी आणि विद्यासचिव म्हणून जबाबदारी
लेखन  : कथा, कादंबरी, वगनाट्ये, स्फुटलेखन, चित्रपट कथा
वळीव’, ‘भेटीगाठी’, ‘आभाळ’, ‘धिंड’, ‘ऊन’ या पाच
कथासंग्रहांना आणि ताजमहालमध्ये सरपंच’ या विनोदी
कथासंग्रहास राज्यशासनाची पारितोषिके
 
शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी! त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. या कथानिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते. कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं, त्यांच्यातील परस्परसंबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलले आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारंच बदललं आहेही जाणीव त्यांना तीव्रतेने होते.

कधी ते जुन्या-नव्यातील पडलेलं अंतर समजून घेतील, तर कधी आवतीभोवतीच्या माणसांशी गप्पा गोष्टी करण्यात रंगतील. आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अशा वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस – चार पाऊले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा’ असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करीत नेतो.

कथासंग्रह

·         वावरी शेंग
·         इल्लम
·         जुगलबंदी
·         ताजमहालमध्ये सरपंच
·         बंधारा
·         आभाळ
·         घालमेल
·         पाऊलवाटा
·         खुशखरेदी
·         धिंड
·         भेटीगाठी
·         वळीव
·         फक्कड गोष्टी
·         श्रीगणेशा
·         पाटलांची चंची
·         गारवेल
·         खुळ्याची चावडी
·         लवंगी मिरची कोल्हापूरची
·         टारफुला
·         कथा अकलेच्या कांद्याची
·         शापित वास्तूNo comments:

Post a comment