Thursday, 21 August 2014

इट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ

तूर द फ्रान्स 

‘तूर द फ्रान्स’ ही जगातली सर्वांत महत्त्वाची व प्रसिद्ध सायकल-स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेची सुरुवात १९०३ मध्ये झाली. स्पर्धा २३ दिवसांची असते, तिचे २१ टप्पे केलेले असतात व तेवढ्या दिवसांमध्ये ३५०० कि. मी. (२२००मैल) पेक्षा जरा जास्तच अंतर कापायचे असते. स्पर्धेचा एवूâण मार्ग फ्रान्समधून विंâवा कधी कधी थोडासा शेजारच्या देशांमधूनही जातो, पण दरवर्षी मार्ग बदलण्यात येतो. प्रत्येक टप्प्यात स्पर्धकाला मिळणाNया गुणांची बेरीज करून संपूर्ण शर्यत संपते तेव्हा टूरचा विजेता ठरतो, त्यामुळे शर्यत जिंकण्यास प्रत्येक टप्पा जिंकलाच पाहिजे असे नसते. 
बहुतेक सर्व सायकलशर्यतींप्रमाणेच प्रत्येक स्पर्धक हा एखाद्या टीमचा सभासद असतो. स्पर्धेत साधारणपणे २० ते २२ टीम्स असतात, प्रत्येक टीममध्ये ९ लोक असतात. परंपरा अशी आहे, की व्यावसायिक टीम्सपैकी (प्रोफेशनल टीम्स) ज्या उत्तम असतात, त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रित केले जाते. प्रत्येक टीम त्यांच्या आश्रयदात्यांच्या (स्पॉन्सर्स) नावाने ओळखली जाते. उदा. ‘सुबारु माँटगॉमेरी’, ‘यू.एस.नॅशनल टीम’ इ. अ‍ॅमॅच्युअर टीम्स आहेत तर ‘मोटरोला’, ‘कॉनाफिडिस’, ‘यू.एस.पोस्टल’ / ‘डिस्कव्हरी चॅनेल’ इ. प्रोफ्रशनल टीम्स आहेत. प्रत्येक टीमची वेगळी ओळख येईल अशी जर्सी असते. टीममधील स्पर्धक एकमेकांना मदत करतात. टीममधील सर्वांच्या मदतीसाठी बरोबर येणारी एक गाडी असते. ह्या सर्व टीम्सच्या एकत्र ग्रुपला ‘पेलोटोन’ म्हणतात, त्यांचा ‘व्यावसायिक सायकलस्पर्धंकांचा ग्रुप’ असाही अर्थ आता रुढ झाला आहे. 

स्पर्धेचे मुख्य टप्पे असे असतात– 

साधा टप्पा - सर्व स्पर्धक बरोबर निघतात. एकमेकांना स्पर्श झाला तर, विंâवा ठरवून मागेपुढे राहून मदत केलेली चालते. टीममधले लोक लहान लहान ग्रुप्स करुन इतर टीम्सच्या स्पर्धकांबरोबर, युक्त्या प्रयुक्त्या करत आपापसात आळीपाळीने पेलोटेनच्या आघाडीला राहण्याचे अवघड काम करत राहतात. स्पर्धेच्या शेवटी प्रत्येक टीमपैकी जो स्पर्धक प्रथम पोहचेल, त्याच्याइतकेच गुण सहा त्या टीममधील प्रत्येकाला मिळतात. एखादा स्पर्धक शेवटच्या किलोमीटरमध्ये पडला तरी त्याचे गुण तेवढ्यासाठी जात नाहीत. कारण बNयाच टीम्समधले स्पर्धक एकाच वेळी एकावर एक असेही पडू शकतात.

दुसरा टप्पा - ह्या टप्प्यामध्ये दोन भागही पडू शकतात– ज्यात खूप वेगाने धावावे लागते असा टप्पा आणि जेथे डोंगर चढावे लागतात असा टप्पा. प्रत्येक टीममध्ये खूप वेगाने स्पर्धेच्या शेवटच्या भागात सायकल चालवू शकणारा एकजण असतो, त्याला संरक्षण देत बाकीचे त्याच्याभोवती व मागे सायकल चालवत राहतात आणि शेवटचे सुमारे २०० मीटर अंतर राहिले, की हे वेगवान स्पर्धक ७२ कि.मी. (सुमारे ४५ मैल) गतीनेही जाऊ शकतात, अशांना अर्थातच त्या त्या टीममधील लोक संपूर्ण पेलोटोनच्या पुढच्या भागातच ठेवतात. 

डोंगराळ भागाचा टप्पा - ह्या टप्प्यात जिंकणारे संपूर्ण शर्यत जिंकण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. ह्या टप्प्यात टीमचे सर्व लोक एकत्र राहू शकणे अवघड असते, पण प्रत्येक टीमचा जो जिंवूâ शकेल असा स्पर्धक असतो, त्याच्याबरोबर दोघे तिघे तरी राहतात, जे प्रतिस्पर्धी टीमच्या माणसाला पुढे जाऊ न देण्याचे व त्यांच्या स्पर्धकाला उत्तेजन देण्याचे काम करतात. शेवटचे काही किलोमीटर अत्यंत महत्त्वाचे असतात व तेव्हा पडू शकणारा एक दोन मिनिटांचा फरकही अतिशय महत्त्वाचा ठरतो. ह्या टप्प्यातील स्पर्धा बघायला हजारो लोक रस्त्याच्या कडेला उभे असतात.

टेकडयांचे टप्पे - संपूर्ण स्पर्धेत विजयी होऊ शकण्याची ज्यांच्यात क्षमता असते, असे स्पर्धक ह्या टप्प्यात आपले सर्व कौशल्य दाखवू शकतात, कारण ते स्प्रिंटर्स– वेगाने जाणारेही असतात व क्लाइम्बर्स– डोंगर चढू उतरु शकणारेही असतात. सर्व स्पर्धकांमध्ये ह्या दोन्हीत पारंगत असणारे फार थोडे असतात. 

‘तूर द फ्रान्स’ च्या संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक दिवसाच्या शेवटी ज्याचे गुण सर्वांत जास्त त्याला ‘यलो जर्सी’ घालायला मिळते व शेवटी संपूर्ण स्पर्धा जिंकणाNयाला ती मिळते. लान्स आर्मस्ट्रॉन्ग सलग सात वर्षे ही स्पर्धा जिंकले व स्पर्धा चालू असतानाही बNयाच दिवसांच्या शेवटी ती त्यांनाच मिळे, त्यामुळे त्यांचे टोपणनाव ‘यलो जर्सी’ पडून गेले होते! 

No comments:

Post a comment