Tuesday, 26 August 2014

बंदा रुपाया!

सदाबहार वसंत पवार

आज बाजीराव आणि मस्तानीच्या जीवनावरील एकही मराठी नाटक यशस्वी ठरलेले नाही, अशी कबुली अनेक नाट्यपंडित नेहमी देत असतात. तशा या विषयावरच्या कादंबऱ्याही बेताच्याच निघाल्या. संजय लीला भन्साळीने याच विषयावरचा चित्रपट घोषित करूनही अजून प्रत्यक्ष चित्रीकरणाचे धाडस दाखविलेले नाही. पण, आमच्या ग. दि. माडगूळकरांनी त्या एका लावणीत बाजीराव-मस्तानीच्या जीवनाचे केवढे तरी रसायन भरून ठेविले आहे. 

`तुम्ही माझे बाजीराव!
मी मस्तानी हिंदुस्तानी 
बुंदेली पेहराव झिरझिरवाणी निळी ओढणी, 
वाळ्यांचा शिडकाव काल दुपारी भर दरबारी उरी लागला घाव, 
तुम्ही  मऱ्हाटे नव्हे छाकटे, 
अगदी सरळ स्वभाव' 

या बहारदार लावणीसाठी वसंतरावांनी बांधलेले ठेके आणि आशाबार्इंच्या आवाजातून घरंगळत सांडलेले चंदेरी शब्द – सारे प्रकरणच लाजबाब बनून गेले आहे!

वसंतरावांचे मूळ घराणे मध्य प्रदेशातील धारचे. त्यांचे वडील शंकरराव हे तेथील राजे उदाजीरावांचे आप्तेष्ट. शंकरराव दिसायला राजिंबडे होते. संगीतामध्ये तर त्यांना कमालीची गती होती. ते एकदा सपत्नीक रात्रीचा प्रवास करत होते. त्यांचा वाटेत एके ठिकाणी मुक्काम पडला होता. उजाडल्यावर आपण एका स्मशानाजवळ रात्र वंâठल्याचे त्यांच्या ध्यानी आले. तिथे भेटलेल्या फकिराने त्यांना भविष्यकथन केले, `‘पहिला मुलगा खूप र्कीितमान होईल. पण निष्कांचन असेल, अल्पायुषी ठरेल.'’ पुढे उदाजीरावांच्या पत्नीने म्हणजेच आपल्या चुलतीने आपला मुलगा दत्तक घ्यावा, असे शंकररावांनी सुचविले. परंतु वाड्यात मलठणच्या एका नातेवाइकाचे पोर दत्तक घ्यायचे आधीच ठरले होते. त्या दत्तक प्रस्तावाला शंकररावांचा विरोध असल्याची आवई कोणा हितशत्रूंनी उठवली. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी शंकररावांना कोल्हापूरला सपत्नीक पळून यावे लागले. तेव्हाचे कोल्हापूर म्हणजे कलावंतांची पेठ होती. तमिळसह दक्षिणेकडील अनेक भाषांतील चित्रपटांचे चित्रीकरणही कोल्हापुरात होत असे. तेथे रसायनशाळाही होत्या. शंकरराव मराठी संगीतकारांकडे
वादक म्हणून राबत होते. शाहीर लहरी हैदरांसारख्या अवलिया तेव्हा हयात होता.

ते तर शंकररावांचे मित्र. लहरी हैदरांकडेच वसंतरावांनी सवाल-जवाब, भेदिकांचे सामने, कलगी आणि तुNयातला झगडा, गीत-संगीताचे नानाविध प्रकार अभ्यासले. तेव्हा ग. दि. माडगूळकरही कोल्हापुरात पहिले पाठ गिरवीत होते. ते वसंतरावांना ‘वशा’ या लाडक्या नावाने हाक मारायचे. त्याच दरम्यान पठ्ठे बापूरावांचा तमाशा कोल्हापुरात आला होता. तेव्हा नऊ वर्षांच्या छोट्या वसंताला त्या तमाशात झिलकारी बनून टाळ वाजवायचे भाग्य लाभले होते. लहानपणी वसंतराव खूप छान सतार वाजवायला शिकले. संगीतामध्ये त्यांचे
गुरू शंकररावच होते. पण आपल्या मुलाला योग्य शिक्षण मिळावे, म्हणून त्यांनी इंदूरच्या गुरू रहीमतखाँ यांचा गंडा वसंतरावांना बांधला. कोल्हापूरच्या त्या झपाटलेल्या दिवसांतच परंपरागत गीत-संगीताचा वसा वसंत पवारांना लाभला. त्यांनी तिथे ऐकलेली एक सुंदर लावणी –

`होळकरी दंगा झाला काल माझ्या महाली....'

याचाच अर्थ होळकरांचे स्वार-सरदार काल माझ्या मैफलीत आले आणि त्यांनी दौलतजादेची लयलूट केली, नुस्ता दंगा घातला. याच चालीवर पुढे `सांगत्ये ऐका'साठी त्यांनी गदिमांकडून सुंदर शब्द लिहून घेऊन एक अवीट लावण्यगीत सादर केले.

`काल रात सारी मजसी झोप नाही आली,
पाच माळ्यावरती माझी कोपऱ्यात खोली' 

संगीतकार अण्णासाहेब माईणकर यांच्या एका बालचित्रपटाची तयारी १९३९मध्ये सुरू होती. तेव्हा त्यांनी अनेक गुणी बालकलाकारांचा मेळा आपल्याभोवती गोळा केला होता. त्यामध्ये सतारीवर होते, वसंत पवार, तर क्लेरोनेटवर होते, राम कदम. वसंतरावांचे अवघे आयुष्य म्हणजे एक कादंबरी आहे. जीवनाची इतकी परवड, इतके उन्हाळे-पावसाळे एखाद्या कलावंताने क्वचितच पाहिले असतील. त्यांच्या बालपणीच त्या काळातल्या प्लेगच्या भयंकर साथीमध्ये ते आपले आप्तजन हरवून बसले. एकाच दिवशी त्यांची माता आणि त्यांच्या दोन लहान बहिणींची प्रेते त्यांना पाहावी लागली. त्यांना अन्य तीन भावंडे होती. त्यामुळे शंकररावांनी वॉनलेस हॉाqस्पटलमधील एक नर्स कुमारी वनमाला रणपिसे हिच्याशी विवाह केला. वनमाला चार मुलांसह शंकररावांना स्वीकारायला तयार झाल्या, त्या फक्त एका अटीवर – 

विवाहापूर्वी शंकररावांनी खिस्तधर्म स्वीकारायला हवा!

No comments:

Post a comment