Thursday, 28 August 2014

प्रेममयी

इंग्रजी भाषेतील `लव्ह' या शब्दाला अत्यंत मर्यादित अर्थ आहे. इंग्रजी माणूस बायकोवर प्रेम करताना प्रेमच म्हणतो, तोच शब्द आईसाठी, देशासाठी, मुलासाठी आवडत्या सिगारेटसाठी आणि दाराशी उभ्या राहिलेल्या गाडीसाठीही प्रेम हाच शब्द वापरतो. आपलं आपल्या मुलावरचं जे प्रेम असतं, त्यात वात्सल्य असतं. प्रेम हा
शब्द त्याच अर्थानं तुम्ही पत्नीबद्दल वापरत नाही. आपलं आईवरचं प्रेम हे आदरयुक्त असतं. तुम्ही मित्रावरती करता, ते प्रेम वेगळं असतं. आपण खूप बारकाईनं अभ्यास केला, तर प्रेमातले हे सूक्ष्म भेद ज्याचे त्यालाच कमी-अधिक प्रमाणात समजतील. 

इथंसुद्धा दोन माणसं प्रेमातल्या सूक्ष्म भेदाबद्दल चर्चा करू शकणार नाहीत.

म्हणूनच बाऊल म्हणतो :

Only a connoisseur of the flavors of love can comprehend the language of lover's heart. Others have no clue.

हा जो कॉनोझियर (मर्मज्ञ) आहे, तो बंद डोळ्यांनीसुद्धा शेकहॅन्ड करताना त्यातला कोरडेपणा किंवा ममत्त्व जाणून घेऊ शकतो. 


No comments:

Post a comment