Saturday, 30 August 2014

स्वामी

एके दिवशी सायंकाळी माधवराव डेNयात बसले होते. समया तेवत होत्या. चौरंगावर लिहिण्याचे साहित्य होते. माधवराव चौरंगाजवळ गेले. ते लेखनसाहित्य पाहून त्यांना गोपिकाबार्इंची तीव्रतेने आठवण झाली. आपल्या आईला पत्र लिहिण्यास ते अनेक वेळा बसले होते; पण काय लिहावे, हे न कळून त्यांनी ती पत्रे तशीच अर्धवट सोडून दिली होती. मनाचा हिय्या करून ते चौरंगाजवळ बसले. त्यांनी कलम शाईत बुडविले आणि कागद समोर घेतला. डेNयाच्या दाराशी श्रीपती पहारा करीत उभा होता. माधवरावांनी आपल्या अंगावर शालजोडी घेतली होती. ते आपल्या वळणदार अक्षरात गोपिकाबार्इंना पत्र लिहीत होते :

‘‘वडिलीं बालकाच्या निरंतर पत्रीं संभाळ करावा. यानंतर इकडील प्रसंग. एक प्रकार जहाला, म्हणोन वडिलीं चित्तीं उदासवृत्ति धरली म्हणून ऐकिलें. त्यास सदैव काळ सारखा असतो असा अर्थ नाही. ज्या समयीं जें होणार तें होतें त्यास इलाज काय? प्रस्तुत वडिलीं समय प्राप्त झाला आहे. त्यांस बरें म्हणून गोड दिसे तें करावें. वाईट न दाखवावें, उदास न व्हावें. आम्हीहि कालावर दृष्टी ठेवून उत्तम दिसेसारखा डौल धरीला आहे. वडिलीं कोणे गोष्टीविषयीं उदासवृत्ति धरून लौकिकांत वाईट न दिसे तें करावें. आम्ही ऐंकतो की, आपण एखादे स्थलीं चार दिवस जाऊन राहणार, त्यास ही गोष्ट वडिलीं एवंâदर न करावी, असे झालियासी येथील प्रसंगास ठीक पडणार नाही. सखारामपंत आबा येत असतांना आम्हांशीहि बरेच असतात; परंतु गुंतले आहेत.’’

माधवरावांनी कपाळीचा घाम पुसला. पुन्हा कलम उचलले, तोच बाहेर पावले वाजली. त्यांनी वर पाहिले. श्रीपती गडबडीने धावत आत आला आणि म्हणाला,

‘‘सरकार!’’
‘‘काय आहे?’’ माधवरावांनी विचारले.
‘‘सरकार, घात झाला! चारी बाजूंनी गारदी येत आहे.’
‘‘गारदी?’’ माधवरावांनी पाहिले. श्रीपती हातात नंगी तलवार घेऊन उभा होता. तो पुरा भेदरला होता.

माधवराव हसले आणि म्हणाले, ‘‘श्रीपती, प्रथम ती तलवार म्यान कर आणि स्वस्थपणे दाराशी उभा राहा! काही जरी झालं, तरी पुन्हा तलवार म्यानाबाहेर काढू नकोस, ही माझी तुला सक्त ताकीद आहे!’’

श्रीपतीने हताशपणे तलवार म्यान केली. गोंधळलेल्या अवस्थेत तो दरवाज्यापाशी जाऊन उभा राहिला. माधवरावांच्या डेNयाच्या आजूबाजूला गारद्यांच्या चौक्या उभारल्या जात होत्या. त्यांचा गोंगाट कानी पडत होता.

माधवरावांनी कलम उचलले आणि अर्धवट राहिलेले पत्र पुरे करायला प्रारंभ केला :

‘‘...कारभारी यांचे पेचामुळे आमचे दौलतेच्या तणावा तुटत चालल्या. पहिल्यापासून राखिले असते तर सर्वहि आपापला कारभार करून लगामीं राहते. ते नसल्यामुळें सर्व मुलूख बुडाला. लोक फितूर बहुत झाले. धन्याचें वजन राहिलें नाही. शत्रू बलवत्तर झाले; तरी पैसा असता तरी सर्वहि गोष्टी इतकेहि पेच संभाळून नीट होत्या. त्यास पैसा नाही. फौज कशावर ठेवावी? फौज नाहीं तर दौलत कशी राहणार? असें बारीक बारीक पाहतां सारें अवघड आहे. आतां गोष्टी जहाल्या आहेत त्याच गोष्टी दृष्टीस असाव्या. येणेंकरून पार लागेल तो लागेल. नासलेल्यास दुसरे झाले तरी अगदीच नासेल. यास्तव झालें तें उत्तम आहे. एक विचार असावा. तो आहेच. परिणाम लावणार ईश्वर समर्थ आहेच. वडिलांचें पुण्य आहे.’’ 

पत्र पुरे होताच पत्रावर वाळू टावूâन त्यांनी ती झटकली. पत्र व्यवस्थित सुरळी करून ठेवले आणि ते उठले. पलंगाकडे जाता जाता ते म्हणाले, ‘‘श्रीपती, अरे वेड्या, गारद्यांचे पहारे बसले, म्हणून एवढा भितोस?
किती आहेत गारदी?’’

श्रीपती म्हणाला, ‘‘सरकार, बाहेर येऊन तर पाहा! डेNयाच्या चारी बाजूंना गारद्यांची गर्दी झाली आहे. सहज हजाराच्यावर असतील!’’

‘‘मग त्यात एवढी चिंता करायचं कारण काय? आम्ही सामान्य नसून आम्हांला फार महत्त्व आहे, याचे ते द्योतक आहे.’’ अंगावर पांघरूण ओढून घेत असता माधवराव म्हणाले, ‘‘आणि, श्रीपती, जेथे शेकडो गारद्यांचे पहारे बसले, तेथे एकटा श्रीपती कसा पुरा पडणार? आम्ही झोपतो. 

तूही झोप!’’

रात्र वाढत होती. तळावर गस्तकNयांच्या जागेखेरीज जाग नव्हती. माधवराव मात्र जागे होते. नस्तापाबरोबर अंगात ज्वर चढत होता. 

No comments:

Post a comment