Tuesday, 19 August 2014

किरण बेदी

किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयआयटी, दिल्ली येथून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार (Domestic Violence) (सामाजिक शास्त्र विभाग) या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली.

त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनियर टेनिस चॅम्पियन होत्या.

आशियाई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले.

याशिवाय पोलीस क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्यासाठी गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर आणि द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्याकडून अनुक्रमे २००३ व २००५ साली त्यांना मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले.

किरण बेदी यांना न्यायनिष्ठ आणि सन्माननीय पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले असून त्यात प्रशासकीय सेवेसाठी देण्यात आलेला रेमन मॅगसेसेया महत्त्वाच्या पुरस्काराचा समावेश आहे.

त्यांचा आप की अदालतहा टीव्हीवरील कार्यक्रमही गाजला असून अनेक व्याख्यानांत, तसेच परिसंवादांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. त्यांना मिळणारे मानधन आणि त्यांचे उत्पन्न, त्या नवज्योतीआणि इंडिया व्हिजन फाउंडेशनया ना-नफा तत्त्वावर चालणा-या त्यांच्या संस्थांना देतात. 
त्या स्वत: या संस्थामध्ये जातीने लक्ष घालतात. त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या  येस, मॅडम सरया माहितीपटाच्या सादरीकरणालाही त्या उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधतात.

निवडक मानसन्मान

रेमन मॅगसेसे (१९९४)

जोसेफ बायस फाउंडेशनचा पुरस्कार (स्वित्झर्लंड)

`मॉरिसन टॉम गिशॉफ पुरस्कार' (युएसए)

`प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कार (युएसए)

भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते `पोलीस शौर्य पदक'


`मदर टेरेसा अ‍ॅवॉर्ड', २००५

No comments:

Post a comment