Friday, 12 September 2014

चेहरा हरवलेलं गाव

भानुदास परमानंद 
कोणत्याही समाजाला चेहरा नसतोच, असते ती फक्त एक भावना आणि त्याच भावनेतुन समाजासमोर जे व्यक्त केलेला विचार असतात, त्यालाच आपण त्या समाजाचा प्रतिकात्मक चेहरा समजत असतो. अगदी अश्मयुगातील गोष्टींचा विचार केला तर त्यावेळची माणसं देखील कळपानेच राहायची कारण काहिही असो, म्हणजे जंगलीप्राण्यांपासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी वा आबालवॄध्दांच्या संरक्षणासाठी पण ते देखील समुहानेच राहत आजजंगलात राहणारा अदिमानव जंगलातुनबाहेर आला, बाहेर येताना परिवर्तनाचं झुल त्याने अंगावर चढवलं, तो परिवर्तनाला कंटाळला नाही तर आपलसं म्हणून स्वीकारलं परिवर्तन करता करता त्याला दुसऱ्यावर शासन करण्यची बुध्दी (दुर्बुध्दी) सुचली आणि यातुनच संघर्षाची बिजे पेरली गेली एकमेकांच्या ताब्यातील प्रदेश जिंकण्यासाठीदोन टोळयामध्ये युध्दे होऊ लागली. आपलं वर्चस्व सिध्द् करण्यासाठी माणूस पराकोटीला जावू लागला, आणि यातुन द्वेषाचे विषाणू हवेत फिरू लागले. एकोप्यात राहणाऱ्या लोकांना त्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला. जिवाला जिव देणारे सवंगडी आज या वॄत्तीचे (द्वेषाचे) बळी पडले व एकमेकांच्या उरावर बसुन जिव घेण्यास आतुर झाले. वैचारिक पातळीवरील युद्धे आता शक्ती प्रदर्शनापर्यंत आणि यातुन आपण आता भुकंप केंद्राजवळ आलोययाची जाणिव काहिंना होऊ लागली.


कोहिंडे गाव तसं सर्वसाधारण असणारं खेड, बैलगाडीचा मातीचा रस्ता, कौलारू घरं, घराच्या बाजुला असणारे पाळीव प्राण्यांनचे गोठे (गाय, बैल, म्हैस. इ. बांधण्याची जागा) बैलांच्या साहाय्यानेच शेती करण्याचा प्रघात गावातील जत्रा, उरूस, सणसूद अगदी पारंपारिक पध्दतीने करण्याची पध्दत, भजन, पुजन, किर्तन यामुळे या गावाला एकजुटीचा आणि आध्यात्मीकतेचा असा एक चेहरा होता. भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथीहाणू काठी या उक्तीप्रमाणे चालणारं हे गावं म्हणून पंचक्रोषीत प्रसिध्द होतं. गाव तसं तीन विभागात विभागलंगेललं होतं (रौंधळवाडी, नदीच्या पलिकडील कानिफनाथ वस्ती व गावठाण). एकमेकांत असणारी धुसमूस कधी कधी चव्हाटयावर येतं होती तरीही ती विकोपाला कधी गेली नाही याचं कारण म्हणजे ‘आगीत तेल ओतणार्यांपेक्षा पाण्याने आग विझवणार्यांची संख्या जास्तच होती.


आतुन तीन विभागात विभागलं गेलेलं गाव बाहेरच्यांनी काही केल्यास एका मुठीप्रमाणे एकत्रीत येऊन समोरच्यांवर प्रहारकरत असे त्यामुळे या गावाच्या नादी कोणीही लागण म्हणजे स्वत:चेच दात आपल्या घशात घालण्यासारखं आहे असं मानून पंचक्रोषीतील लोकं या गावाला वचकुन होती. असा हया गावाचा पारंपारिक आणि आध्यात्मिक वारसा असलेला चेहरा खर्रकन उतरला(फाटला) तो यावर्षीच्या ‘सरपंचकिच्या निवडणूकीत’. सरपंचकीची निवडणूक तशी गावाला नविन नव्हती, पण या वेळेस प्रत्येकानेच त्याला अहंकाराची केल्याने, त्यात नको तेवढया आहुत्या पडल्या होत्या. आजपर्यंतची निवडणूक म्हणजे गावातील ठराविक लोकांनी (सामाजिक संदर्भ असणारे,घरातील कोणत्याही कामाचे नसलेले) पंचायतीला उभं राहायचं आणि निवडूण यायचं वकोणाला सर्वांनी होकार द्यायचा म्हणजे तो ‘सरपंच’ झाला. मग सरपंचाची कामं काय? त्याने गावाचा काय आणि कसा विकास करायचा? असे प्रश्न पुढील पाच वर्षात ना कोणी त्याला विचारावेत ना त्याने त्याचा विचार करावा. आली एखादी सरकारी योजना तर त्याने ती राबवावी अन्यथा गप्प पणे आपले व्यवहार (शेती करावी, आपला दुध व्यवसाय करावा) करावेत.

‘सरपंच’ म्हणजे संध्याकाळी दारू पिऊन येणाऱ्यांसाठी ‘शिव्या’ देऊन आपला राग व्यक्त करण्यासाठीच आहे असा अर्थ घेऊन त्याला शिव्या द्याव्यात व त्यानेही त्या गप्पपणे ऐकून घ्याव्यात. मग त्या शिव्या कशासाठीहीअसो, माझी गाय गाभण राहत नाही, दुसऱ्याच्या शेळीला दोन दोन तीन तीन बकरं होतात माझीला एकच का? माझा बैल ऐन पाथत बसतो अश्या कितीतरी फालतू कारणांसाठी या सरपंचाने शिव्या खाल्ल्या असतील पण परतीची शिवी अथवा त्याला त्याचा जाब विचारण्याच्याही भानगडी तो कधी पडला नाही. अशी थोडी थिडकी नाही तर त्याने या गावाचा गावगाडा 20 वर्षे समर्थपणे सांभाळला. म्हणतातना ‘परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे’. परिवर्तनाची लाट 10 वर्षापुर्वी गावात आली. गावातील तरूणांनी यावेळेस सरपंचच्या पदाकरिता एखादा सुशिक्षितव गावाचा सर्वांगिक विकास करणारा सरपंच हवाय असा जणू हट्टच धरला आणि यातूनच हे द्वेषाचे विषाणूंनी लोकांची मने चावायला(पोखरायला) सुरवात केली.20 वर्षे गावकीवर सरपंच या पदावर विराजमान असणाऱ्या या सरपंचाला गावाच्या लोकांनी व नव्या विचारसरणीने भुर्इमुगाच्या शेंगेच्या टरफलाप्रमाणे बाजुला काढल अन् आजपर्यंत सांभाळलेलं राज्य दुसऱ्याच्या हातात सहजासहजी देर्इन तो राजकारणी कसला ‘तोडा फोडी करा, मग राज्य करा’ जाताना त्याने सर्वांच्याच मनात अश्याविषाची बिजं कालवली. नविन सरपंच झालेल्या तरूणाने जुन्या सरपंचाच्या विचारांच्या प्रवॄत्तीवर मात करत पुढील 5 वर्षे ते पद नेटाने सांभाळले कशालाही न डगमगता अन् येणाऱ्या संकटांना तोंड देत त्यानेच परिवर्तनाचीमुहुर्तमेढ या गावात रोवली. त्यानंतरची 5 वर्षे अनुसुचीत जातीजमातीचा सरपंच असल्याने प्रत्येकाने आपआपले फक्तपर्याय गावाला दिले.या 10 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गलं लहाने असणारे मोठे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा प्रगतीशि शेतकरी झाला. पारंपारीक पिकं सोडून आर्थिक पाठबळमिळून न देणाऱ्या बागा फुलल्या गेल्या. हातात पैसा मिळूलागला आणि माणसांची (रिकामटेकडया) बुध्दी चालू लागली. खिशात पैसा, ढुंगणाखाली वाहन (बार्इक) आल्याने गावाचा विकास हाच आपला ध्यास (मलार्इ खाण्याची आस) या विचारांने वयात आलेल्या तरूणांची डोकी भणभणायला लागली. कोणाचंही नेतॄत्व मान्य नसणारी ही पिढी आपलं नेतॄत्व आणि कर्तॄत्व इतरांवर थोपावायला लागली. कितीही पैसा खर्च करण्याची तयारी, वेळप्रसंगी कोणत्याही थराला जाण्याची तयारी यामुळे तर गावात गट पडू लागले. एकोप्याने नांदणारं गावं गटातटात होऊन त्याची शकले उडू लागली. एकमेकांच्या उरावर बसण्याची प्रत्येकालाच हौस वाटू लागली आणि गावाच्या या आध्यात्मीक चेहऱ्याची मांडणी ठिसूळ व्हायला सुरवात झाली. बेकारांना दिल्या होत्या. यापुढे असंच होणार असेल तर आपल्या मुली गावातील सामान्यांनाच काय पण सदनशीलांनाही द्यायच्या नाहीत अथवा त्यांच्या देखील करायच्या नाहीत असा निर्धारही काहिंनी केला. एकदोघांनी तर या सर्वांतुन दुर राहण्यासाठी ठरलेल्या सोयरिकी मोडल्या. यातुन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जे जे होर्इल ते तेपहावे व शेवटी जे घडेल त्यालाच सत्य मानून चालावे.आजपर्यंत निवडणूकीचा प्रचार हा फक्त उमेदवार आणि त्याच्या पाठी असणारे चार पाच टगे कार्यकर्ते (दारू आणि कोंबडीच्या सोर्इसाठी असणारे) असाच असायचा. यावेळेस मात्र घरातलं सरणावर जाणारंमढंसुदधा प्रचाराला निघालं होतं. अंधारात सूसू जायला घाबरणारं शेंबड आमच्या ‘नानाला’ मत द्या म्हणून सांगत होतं. दसरा दिवाळीला माहेराला येणाऱ्या सासुरवाशिणी ऐन उन्हाळ्यात माहेर पणासाठी (घरातील रांधी वाढा आणं उष्टी काढा) आणल्या होत्या, येताना त्यांची चिल्ली-पिल्लीही बरोबर होती, अर्थात घराचा जावर्इ कडक र्इस्त्रीच्या पोषाखात आला होता. आजपर्यंत डोकं हा भाग वापरायचा असतो हे खिजगणतीत नसलेला हा प्राणी आता खुशाल ‘सल्ले’ देत होता. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गावाच्या यात्रे अगोदरच गावाला जत्रेच वातावरण निर्माण झाल होतं. गावाच्या या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे गावात नव-नविन चेहरे दाखल झाले होते. आजपर्यंत विसर पडलेल्या बहिणी (चुलत-निलत) आत्या, मावश्या (यांचा मतदानाशी काहिही संबंध नव्हता)
यांना आणण्यासाठी भावकीतील दूत निघाले तर काही घेऊनही आले होते. गावात नव्याचं नुसतं पिकंच आलं होतं. 25-25 वर्ष एकमेकींपासून लांब राहिलेल्या मैत्रिणी पाणवठयावर भेटत होत्या, एकमेकींशी भरभरून
बोलत होत्या, पण तुमचा उमेदवार आणि आमचा उमेदवार हा विषय निघाल्यावर एकमेकींना पाण्यात पाहून घरीपरतत होत्या| कोण कोणाच्या बाजुचं आहे हे बाजूवाल्यालाही माहीत नव्हतं. ही जवळकीची माणसं चुलत बहिणीचा मुलगा म्हणजे आपला चुलत भाचा, दुरच्या आत्याचा मुलगा म्हणजे आतेभाऊ आज पहिल्यांदा पहातहोते आणि अश्या ओलखी होत होत्या.


दोन दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या, उघड प्रचार करणं बंद झालं (अचार संहिता) आणि रात्रीला डोळे व पाय फुटले. अंधार पडला की ‘मधमाश्या मोहोळातुन मध गोळा करण्यासाठी जश्या बाहेर पडतात’ तशी माणसं मत गोळा करण्यासाठीबाहेरं पडू लागली. या युध्दाला निघताना घ्यायला लागणारी शस्त्रे प्रत्यकाने बरोबर घेतली. दारूच्या बाटल्या, पैश्याची बंडले हे या लढार्इतील तिर-कमाण होते. गावात दोन आणि चार चाकी वाहनांची नुसती रिघ लागली कोणत्याही आळीत जा 15-20 दोन चाकी तर 4-5 चार चाकी उभ्याच होत्या. गावात ही धुसमुसणारी होळी आता आपल्यात काय-काय घेऊन त्यांची राख रांगोळी करणार हे कोणालाच माहीत नव्हत. जो-तो उंडरलेल्या बैलासारखा एकमेकांकडे नुसता पहात होता. कोणात किती दम आहे हे जरी प्रत्येकाला माहित होतं, तरिही आपण कोणालाच घाबरत नाही हे प्रत्येकजण मनाशी म्हणत होता.आपल्यापाठी असणाऱ्या लोकांच्या गर्दीला पाहुन प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचं मांडे मनाशीच खात होता. अंधारात हात दाबले जात होते, दाबणाऱ्या हातात एखादी दारूची बाटली, पैश्याची गड्डी सरकवली जात होती. देणारा देत होता घेणारा घेत होता.शेवटची रात्र ही भुताची रात्र असते असं म्हणतातन् अगदी तसंच घडतं होतं. पंचक्रेाषीतही निवडणूका होत्या तरिहीआजुबाजुच्या गावाचे डोळे या गावाच्या वाटेला लागले होते. लग्नाचं आवताण (आमंत्रण) विसरलेल्यांना सुध्दा आधल्या रात्री का होर्इना पण वस्तीला या, नाहीच जमलं तर एैन मतदानाच्या दिवशी नुसती धावती भेट द्यायला तरी या, पण याच अशी आमंत्रण गेल्याने, गावाचा रस्ता नुसता जागा झाला होता. प्रत्येकाचा मागे राहिलेला पै-पाहुणा गावात येऊ लागला होता. गांव नुसतं फुललं होतं, आभाळात चांदणं आणि गावात पै-पाहुणं दोघंही मोजता येण्यासारखचं नव्हतं. आलेल्या पै-पाहुण्यांमध्ये सुध्दा सरळ सरळ दोन गट पडले होते. रात्रीचा दिवस करून प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्येकते महार-मागांची घरं, राना-वनात राहणारी ठाकरं वस्ती सारख्या दुर्गम भागात जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेत होते. अंधारात चिकन बिर्याण्यांनी भरलेली पातेली त्यांच्या घरात सरकवली जात होती. कधी समजावून तर कधी उघड-उघड धमकी दिली जात होती.
अश्या सर्व देवाणघेवाणीत पहाटेचा कोंबडा आरवला व बाहेर पडलेले सैनिक आपआपल्या गोटाकडे परतु लागले. रात्रीचा दिवस करून सर्वांनीच एक सुटकेचा श्वास सोडला होत, या शहरात असलेले मतदारांना आणण्यास गेलल्या गाडया देखील गावच्या वाटेला लागल्या होत्या. आपल्या गाडीतील मतदाराने आपल्यालाच मतदान केलं पाहिजे म्हणून त्यांना लवकर गावात न आणता एकदम मतदानालाच आणायचे असल्याने व मुद्दामहुन उशीर करण्यासाठी गाडया वाटेत येणाऱ्या तिर्थश्रेत्राकडेन् (जशी तुकोबांचा भंडारा डेांगर, देहू, माउलींची समाधी असलेलं आळंदी) वळवल्या होत्या. मुंबर्इ ते कोहिंडे हा जेमतेम 4 - 5 तासांचा रस्ता आज 8-9 तास झाले तरी उरकत नव्हता, कारण वाटेत येणारी अशी ही वळण मोबार्इल वरून गाडीतील प्रतिनीधी आपल्या गावातील प्रतिनीधीशी संपर्क साधून पुढील नियोजन करत होते. काही गाडया देव-दर्शन घेऊन आडमार्गांच्या ढाब्यावर नाष्टापाण्यासाठी थांबल्या होत्या (येथे होणारा खर्चदेखील उमेदवाराच्या खिशातील असल्याने खाण्यास कोणीही कचुरार्इ करत नव्हते). येथुन गाडया हलणार होत्या त्या पुढील आदेश मिळाल्यानंतरच तोपर्यंत टार्इमपास.


सकाळी सुर्योदायाबरोबर आपल्या उमेदवाराचा बुथ लावण्यासाठी कार्यकत्र्यांची आणि पाहुण्यांची तारांबळ चालू झाली. गावात शिरणाऱ्या रस्त्याच्या टोकावरच प्रत्येकाचा बुथ (शामियाना) उभारला जात होता तसेच टेबलाच्या बाजुलाच खान-पान व्यवस्थाही केली जात होती मतदान केंद्रांच्या आतिल प्रतिनिधी हा सर्वात महत्वाचा घटक असल्याने तेथे उमेदवाराचा भाउबंद अथवा निकटवर्तीय देण्यात आला होता त्यांच कारण येवढंच की शेवटच्या क्षणाला देखील एखादं मत फोडता येर्इल तसेच आपलंही मतदान दुसरीकडे जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी.


सकाळी 8 वाजता मतदान सुरू झाल्याची अधिकॄत घोषणा केली. गावातुन क्रांतीवीर बाहेर पडावेत तशी एक-एक फळी मतदान केंद्राकडे सरकू लागली. यातली पहिली आघाडी महिलांची होती, प्रत्येकानेच आपआपल्या भावकीतील स्त्रीयांच मतदान सर्वप्रथम करून घेतलं कारण 10 नंतर पाहुण्यांची आणि बाहेरील मतदारांची वर्दळ वाढणारं तेव्हा घरातील कामासाठी त्या मोकळ्या हव्यात हाच दूर-दॄष्टिकोन होता. शाळेपुधील मोकळया मैदानात पांढऱ्या बगळ्यांच नुसतं पिकं उगवलं होतं. गावात येणऱ्या प्रत्येक वाहन कोणत्या उमेदवाराची असेल यावर सर्वांचच लक्ष होतं. अनोळखी वाहन कुठे जाऊन थांबतंय यावरून तो कोणासाठी आला आहे याची खात्री पटत होती. दोनचाकी वाहनांची तर नुसती रेलचेल चालू होती, रानात राहणाऱ्या मतदाराला आणण्यासाठी गाडया पाठवल्या जात होत्या, रस्ता असेल तर चारचाकी नाहीतर दोनचाकी त्यामुळे आज कोणताही माणूस पायाने चालताना दिसतच नव्हता. मतदाराला घेऊन आलेल्या गाडया आपल्या टेबलापाशी आणून उभ्या केल्या जात होत्या आणि तिथेच मतदाराला त्याच्या नावाची पावती व नेमकं कोणतं बटणं दाबायचं याचं प्रात्यक्षिक दिलं जायचं सोबत चहा-नाष्टा होताच. तेथुन तो मतदार चार-चौघांच्या देखरेखीखाली मतदान केंद्रापर्यंत पोहचवला जात होता, र्इतर उमेदवारांच्या लोकांना त्याच्याशी बोलूही दिलं जात नव्हतं, केंद्राच्या हद्दितुन आतिल प्रतिनिधीत्याच्यावर लक्ष ठेऊनच त्याला आत नेत असे. एवढं संरक्षण यासाठीच की मतदान फुटता कामा नये.

सकाळी 10 नंतर गावात शहरातुन मतदारांना घेऊन निघालेल्या गाडयांनी गावात प्रवेश करायला सुरवात केली. आपला टेबल जिथे असेल तेथेच गाडया उभ्या करत प्रवासातुन कंटाळलेला हा मतदारराजा तेथेच गुळणा करून, तोंड धुवून चहापाणी आणि नाष्टा घेऊन मतदानाला संरक्षण कवचातुन केंद्रापर्यंत जावू लागला. याचाच फायदा करून घेण्यासाठी गावातील काहिंनी तर बुथच्या समोरच चहा, वडापाव, विडी-काढी, थंड पााणी आणि थंडपेयाच्या गाडया चालू केल्या होत्या, वाढती माणसांची वर्दळ आणि प्रत्येकाचा र्इतरांना होणारा पाहुणचाराचा आग्रह त्यामुळेत्यांना मिनिटाभराची पण फुरसत मिळत नव्हती. बिसलेरीच्या बाटल्या व थंडपेयाच्या बाटल्यांचा तर नुसता खचपडला होता. लहान मोठे सर्वच जण या कार्याला झटून लागले होते त्यामुळे गावाला नुसता उत आला होता. आज प्रत्येकानेच ठेवणीतील कपडे काढले होते. काहिंनी खास यासाठी एकसारखा पोषाख शिवून घेतले होते. गावातीलच पण गावात राहत नसलेला सुशिक्षित वर्ग जसे डॉक्टर ,प्रोफेसर, वकिल, सरकारी कर्मचारी, व्यावसायिक या भुमीपुत्रांना गाव पहिल्यांदाच पहात होतं तस त्यांच्यामुळे गावाला शोभा यायला हवी होती पण प्रसंग वेगळा असल्याने कोणीही कोणाशी बोलत नव्हते. एकमेकांचे लंगोटी मित्र पण आज तो आपल्या उमेदवाराचा माणुस नाही म्हणून बोलणं तर बाजुलाच राहिलं पण साधे हायहेलो करून ओळख दाखवायलाही तयार नव्हते. 
दुपारी 3 च्या ठोक्याला निवडणुक अधिकाऱ्याने कोण कोणत्या मतदार संघातुन किती मतदान झालंय व किती बाकी राहिलयं, याचा अकडा येऊन सांगितला आणि पुन्हा धावपळीला सुरवात झाली. दुपारच्या उन्हाने आणि जेवणाने ढेपाळलेली मंडळींनी राहिलेल्या मतदारांचा शोध मतदार याद्यातुन घेतला व नव्या जोमाने राहिलेल्या मतदारांना आणण्यास हे टोळभैरव बाहेर पडले. आजारी व्यक्तिंना त्यांच्या घरातुन चलुन आणले जात होते. म्हताऱ्या कोताऱ्या यांना पाठखुळीशी घालून मतदान केन्द्रात नेऊन त्यांच्या वतीने मतदान केले जात होते. मतदानापासुन आपल्यार्इकडचा कोणीही वंचित राहणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेत होता.


एक मतदान जरी चुकले तर न सांगावा की तेच मतदान आपल्याला भारी पडेल म्हणून प्रत्येक उमेदवार ही दक्षता घेतली होती. बहुतेक प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता आता राहता राहिले फक्त उमेदवार आणि त्यांचे खास पंटर संध्याकाळी चार वाजता अधिकाऱ्याने शेवटचा एक तास शिल्लक असल्याचं सांगितलं, तसे मागे राहिलेले हे निष्ठावान कार्येकर्ते आपल्या उमेदवाराची विजयी पताका झळकवण्यासाठी लवाजम्यासह केंद्रावर येऊन धडकू लागले. आता पर्यंत सुरळीत चालू असलेल्या मतदानाला गालबोट लागण्याच्या शक्यता निर्माण झाली. माजलेल्या बैलासारखा प्रत्येकजण समोरच्याकडे पाहू लागला तसतशी विद्यार्थी शब्दांच्या फुलझडया झडू लागल्या व वातावरण बिघडण्यास सुरवात झाली, तसा पोलिसांनी आपला पवित्रा घेतला आणि मतदान केंद्रावर एका-एका गटाला सोडण्यास सुरवात केली. प्रत्येकालच आनंदाच्या उकळया फुटू लागल्या, विजयाची खात्री देण्यास सुरवात झाली. संध्याकाळी बरोबर पाचला मतदान संपल्याची अधिकॄत घोषणा निवडणूक अधिकाऱ्याने केली, तशी सर्वांनीच ‚वेताळबुवाच्या नावनं चांगभलं अश्या ग्रामदेवतेच्या नावाचाजयघोष केला व आपआपल्या उमेदवाच्या नावाने आरोळ्या ठोकण्यास, ढोल-ताशे बडवण्यास सुरवात केली.


मतदानाच्या पेटया पोलिस बंदोबस्तात सिलबंद करून गावातुन निघून गेल्या तशी ही मंडळी आपआपल्या गडावरपरतू लागली. आलेलं पै-पाहुणे, नातेवार्इक मंडळी शहरातील मतदार यांनी उमेदवाराचे गड नुसते गजबजुन गेले. कार्यकर्ते आपण केलेल्या कार्याची माहिती पाहुणे मंडळींना देऊन लागले. आपण समोरच्याला कसं चकवलं आणित्याचं मतदान आपल्याकडं कसं वळवल याचे किस्से जरा मिठ- मिरची लावून सांगून आपल्या पाठीवर कौतुकाच्या थापा घेऊ लागले. या सर्वांपासून दूर होता तो गावातील बुजुर्गांचा व आध्यात्माची ओढ असणाऱ्या जेष्ठांचा तांडा, या निवडणूकीने जशी ‘भावकी’ जशी जवळ आणली तशी ‘गावकी’ मात्र दुरावल्याची खंत या भाबडया जिवांना पडली होती. गावकीच्या भरल्या ताटाचे हे खरे साक्षिदार होते कारण याच गावकीच्या जोरावर त्यांनी भल्या थोरल्या लढाया खेळल्या हात्या. या निवडणूकीने फक्त माणसचं दुरावली नव्हती तर त्यांची मनंही विखुरली होती. हीच या कलियुगाची नांदी आणि यादवीची सुरवात, अशी ग्वाहीच जणू त्यांच्या मुखावर झळकत होती.गावात येणारा रस्ता आता गावकुसापासून दूर चालला होता. या दिवसासाठी आलेला प्रत्येकजण आता उलटया पावली परतू लागला होता. येताना संगती आणलेला गरूर येथेच ठेऊन तो स्वताच्या घरटयांकडे धाव घेत होता, काही चांगल्या तर बऱ्याच वार्इट आठवणी उराशी बांधून. कुठं गेला या गावाचा ‘एकजुटीचा’ आणि ‘आध्यात्मिकतेचा’ खरा चेहरा, या सर्व धावपळीत आणि चढाओढीत हा चेहरा हरवला तर नाही ना! हाच विचार आज गावातील प्रत्येक खऱ्या नागरिकाच्या मनात घोळत आहे.

शितल-भानबा (गावकी-भावकीचा एक मतदार)

No comments:

Post a comment