Thursday, 4 September 2014

द लॉस्ट सिम्बॉल

उपोद्घात

`हाउस ऑफ टेम्पल'ची वास्तू पवित्र मानलेली होती.

पंथाच्या लोकांचे ईश्वराला उद्देशून केले जाणारे विधी तिथे केले जायचे. पंथाची सर्व गंभीर कृत्ये तिथेच उरकली जायची. त्यांच्या मते ती साधी वास्तू नव्हती, तर देवाकडे जाण्यासाठी, देवाला काही देण्यासाठी, ते एक प्रवेशद्वार होते. त्या जागेला ते `हाउस ऑफ टेम्पल' म्हणत.

हाउस ऑफ टेम्पल

रात्रीचे ८ वाजून, ३३ मिनिटे

कसे मरावे किंवा मृत्यूला कसे कवटाळावे, यातच सारे रहस्य भरलेले असते. पृथ्वीवर मानवाचा जन्म झाला तेव्हापासून कसे मरावे, याचे गुपित जन्माला आले.

त्या पवित्र जागेत एक दीक्षार्थी उभा होता. त्याला पंथाची ‘खास दीक्षा’ हवी होती. दीक्षा देण्याचा विधी चालू झाला. त्याच्या हातात एक पात्र दिले गेले. मानवी कवटी कापून त्यापासून ते पात्र बनवले होते. कवटीच्या वाडग्यात लाल रंगाचा द्रव काठोकाठ भरला होता. ते रक्त नव्हते, ती वारुणी होती. 

त्याने खाली वाकून हातातील पात्राकडे पाहिले व स्वत:ला म्हटले – चल, पिऊन टाक. तू आता कशालाही घाबरू नकोस.

युरोपात मध्ययुगीन काळात पाखंडी ठरवल्या गेलेल्या व्यक्तीला वधस्तंभाकडे जसे नेत होते, तीच प्रथा इथे दीक्षा देताना पाळली जात होती. त्या प्रथेनुसार दीक्षार्थी व्यक्तीच्या अंगातील विजारीचा डावा पाय वर गुंडाळलेला होता, तर त्याच्या शर्टाची उजवी बाही तशीच गुंडाळून वर सारली होती. पाखंडी माणसाला विरूप करण्याचा तो एक भाग होता. त्या प्रथेच्या आवरणाखाली तो विधी चालू होता. दीक्षार्थीच्या अंगात एक ढगळ शर्ट होता. त्यातून त्याची फिकट छाती उघडी पडलेली होती. त्याच्या गळ्यात जाडजूड दोरखंडाचा एक फास अडकवलेला होता.

पंथातील सारे भाईबंद त्याचा हा दीक्षाविधी पाहण्यास हजर होते. त्याला `मास्टर'ची दीक्षा दिली जाणार होती.

त्याच्या भोवती जमलेल्या सर्वांनी एक अर्धवर्तुळाकृती कडे केले होते. त्यांनीही प्रथेनुसार या विधीच्या वेळचे कपडे आपल्या अंगात चढवले होते. प्रत्येकाच्या अंगावर मेंढीच्या कातड्याचा एप्रन चढवलेला होता, हातात पांढरे मोजे होते, कमरेला रेशमी पट्टे बांधले होते. प्रत्येकाच्या मानेभोवती ज्या माळा होत्या, त्यांतील रत्नांचे खडे असे चमकायचे की, जणूकाही या अंधूक प्रकाशात ते पिशाचांचे डोळे वाटायचे. जमलेल्या त्या लोकांमधील अनेक जण समाजात फार वरच्या स्थानावर होते. काही जण प्रशासनात उच्चपदस्थ होते. त्यांच्या हातात बरेचसे अधिकार, सत्ता एकवटली होती. जगात त्यांना बरीच मानमान्यता मिळाली होती. परंतु, त्या दीक्षार्थीला हे ठाऊक होते की, इथल्या चार भिंतींमध्ये त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. सर्व जण एकाच पातळीवरचे समान समजले जायचे. ते सर्व जण एका शपथेने बांधलेले होते. एका गूढ बंधनात ते सर्व जण एकत्र बांधले गेले होते.

त्या सर्वांना दीक्षार्थीने नीट न्याहाळले. बाहेरच्या जगात एकेका क्षेत्रात दिग्गज असलेले, हातात सत्ता एकवटलेले हे सर्व जण एका ठिकाणी एकत्र येतील, हे कोणाच्या स्वप्नातही आले नसते. निदान अशा गूढ जागी ते जमतील, अशी कल्पना नक्कीच कोणी करू शकणार नाही. ती भव्य खोली किंवा ते दालन आता प्राचीन जगातील एक पवित्र अभयस्थान बनले होते. तथापि, सत्य हे अधिक चमत्कारिक होते.

मी व्हाइट हाउसपासून आता केवळ काही अंतरावर आहे. अजून थोडी वाटचाल केली की, तिथे मी स्थानापन्न होईन. त्या भव्य वास्तूचा पत्ता हा वॉिंशग्टन डी.सी. शहरातील १७३३, सिक्स्टीन्थ स्ट्रीट असा होता. खिस्तपूर्व काळातील वास्तुरचनेनुसार तिचे बांधकाम झाले होते. प्राचीन मौसोलूस राजाच्या देवळासारखी... ती वास्तू होती... त्या काळी मृत्यूनंतर जिथे पोहोचवले जाई, अशी ती वास्तू होती. बाहेरच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर १७ टन वजनाचे दोन दगडी ‘स्फिन्क्स’ (अर्धमानव व अर्धिंसह) पहारा देत होते. या वास्तूमध्ये विविध विधी करण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या होत्या, चेंबर्स होते, हॉल होते. मधल्या मुख्य हॉलच्या दालनाभोवती ह्या रचना पसरलेल्या होत्या. त्या वास्तूत जेवढ्या खोल्या होत्या, त्या प्रत्येक खोलीत एकेक गुपित जतन करून ठेवले आहे, असे त्या दीक्षार्थीला सांगण्यात आले होते. परंतु त्या दीक्षार्थीच्या मते ते कवटीचे पात्र हातात घेऊन तो जे काही करत होता, त्यासारखे सर्वोच्च गुपित दुसरे कोणतेही नव्हते. त्या वास्तूमध्ये एक ग्रंथालय होते, अनेक भक्कम तिजोऱ्या होत्या व एका पोकळ भिंतीत दोन शवे जपून ठेवलेली होती. कुठेही नजर फिरवा, सर्वत्र जणूकाही गुप्त गोष्टींचा, गुपितांचा नुसता बुजबुजाट झाला होता.…………………

पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे ………………. 


No comments:

Post a comment