Tuesday, 9 September 2014

द पार्टनर

ब्राझिलमधील पॅराग्वे या सीमावर्ती भागातलं पोन्टा पोरा हे लहानसं टुमदार शहर. आजही तो भाग 'फ्रन्टिअर’ म्हणून ओळखला जातो. त्यांना तो तिथे सापडला. मध्यभागापर्यंत गर्द झाडीने वेढलेल्या रुआ तिरादेन्तेस या परिसरात विटांनी बांधलेल्या पक्क्या घरात तो राहत होता. घराच्या आसपास तापलेल्या पदपथावर मुलं नेहमीच अनवाणी पायांनी फुटबॉल खेळत असत. आठवडाभर त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्यांना वेळीअवेळी ये-जा करणाऱ्या मोलकरणीशिवाय तिथं कोणीच आढळलं नाही.

त्यामुळे तो एकटा असावा, असा त्यांनी अंदाज बांधला होता. अगदी ऐशारामात नसला, तरी आरामात, सुखाने तो राहत होता हे दिसून येत होतं. ते आटोपशीर घर कुणा स्थानिक व्यापाNयाचं असावं. त्याच्याकडेही चकचकीत लाल रंगाची १९८३ची फोक्सवॅगनची `बीटल' गाडी होती. याच गाडीतून जात असताना, त्याच्या पाळतीवर असलेल्या त्यांनी त्याचा पहिला फोटो घेतला.

या अगोदर शेवटचा जेव्हा त्यांनी त्याला पाहिला होता, तेव्हा तो जवळजवळ २५० पौंडांचा होता. आता मात्र तो फारच बारीक झाला होता. त्याचे केस आणि कांती अधिकच तरुण वाटत होती. त्याची हनुवटी पसरट व नाक थोडंसं टोकदार वाटत होतं. त्याच्या चेहNयातील हे बदल फारसे जाणवण्यासारखे नसले, तरी अडीच वर्षांपूर्वी रिओमधल्या ज्या सर्जनने हा बदल घडवला होता, त्याला भरपूर पैसे चारून त्यांनी त्याच्याकडून ही माहिती मिळवली होती.  सतत चार वर्षं कसून शोध घेतला, जिकिरीची मेहनत घेतली. शोधण्याचे सर्व मार्ग खुंटले. ओतलेला पैसा अक्षरश: पाण्यासारखा वाहून गेला, तरी हाती काही लागले नाही. मिळालेल्या खबरी फोल ठरल्या.

पण अखेरीस त्यांना तो सापडला. तरीही त्याला पकडण्याची त्यांनी घाई केली नाही, वाट पाहिली. एकदा त्यांना असंही वाटलं की, आपण हेरले गेलो आहोत हे त्याच्या लक्षात येण्यापूर्वीच, किंवा शेजाऱ्यापाजाऱ्याना काही संशय येण्यापूर्वीच, त्याला धरावं, गुंगीचं औषध देऊन बेहोश करून पॅराग्वेमध्ये एका सुरक्षित ठिकाणी डांबून ठेवावं. इतक्या वर्षांच्या शोध मोहिमेनंतर तो सापडला. त्यामुळे लगेचच काहीतरी कारवाई करावी, असा उत्साह त्यांच्यामध्ये सुरुवातीला होता, पण दोन दिवस थांबल्यावर ते स्वस्थ झाले. इथले स्थानिकच आहोत असं दर्शवीत, सावलीमध्ये कुठे चहा पीत, आईस्क्रीम खात एकीकडे त्याच्या घरावर नजर ठेवत, रुआ तिरादेन्तेस रस्त्यावर ते रेंगाळत राहिले. तो असाच बाजारपेठेत गेला असताना ते त्याच्या मागावर राहिले आणि एका औषधाच्या दुकानातून तो बाहेर पडताच, रस्त्याच्या पलीकडून त्यांनी त्याचे फोटो घेतले. एकदा तो फळविक्रेतेयांशी बोलत असताना, त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी ते थोडे त्याच्या जवळसुद्धा गेले. त्याच्या बोलण्यात अमेरिकन किंवा जर्मन ढब होती, पण तो पोर्तुगीज सफाईने बोलत होता. भराभर खरेदी करून तो लगेच माघारी फिरला, घराच्या आवारात शिरताच त्याने फाटकाला कुलूप घातलं. त्याच्या या लहानशा पेâरफटक्यात त्यांना त्याचे बरेच छान फोटो घेता आले.

जॉिंगग तो पूर्वीपासूनच करत होता; पण शरीर फुग्यासारखं फुगल्यामुळे त्याचं धावण्याचं अंतर मात्र कमी होतं. त्यामुळे आता रोडावलेला असूनही धावतो, याचं त्यांना आश्चर्य वाटलं नाही. बाहेर पडून, गेट व्यवस्थित बंद करून, तो रुआ तिरादेन्तेस रस्त्याच्या कडेने दुडक्या चालीने पळू लागला. रस्ता अगदी सरळ असल्याने पहिल्या मैलाला त्याला नऊ मिनिटं लागली. पुढे घराघरांमधलं अंतर वाढत जाऊन, शहराच्या टोकाला रस्ता रेताड झाला. दुसऱ्या मैलाच्या अध्र्यापर्यंत त्याचा वेग वाढून तो आठ मिनिटांवर आला, त्यामुळे डॅनिलो चांगलाच घामाघूम झाला. ऑक्टोबरची मध्यान्ह वेळ, तापमान जवळजवळ ऐंशी डिग्री होतं. शहराची हद्द संपली तसा त्याचा धावण्याचा वेग वाढला. मध्येच लागणारं छोटसं हॉस्पिटल , चर्च पार करून, तो डोंगराळ भागाकडे, धुळीच्या रस्त्यावरून मैलाला सात मिनिटं वेगाने दौडू लागला.

त्याच्या धावण्याच्या या उपक्रमाला त्यांच्या दृष्टीने एक वेगळंच महत्त्व होतं. त्यामुळे ते खूश होते. डॅनिलो अगदी सहज त्यांच्या हाती लागणार होता. तो नजरेला पडल्याच्या दुसNया दिवशी, पोन्टा पोरा शहराच्या टोकाला असलेलं एक झोपडीवजा घर ओस्मर या ब्राझिलीयन इसमाने भाड्यानं घेतलं आणि लगेच एक पाळत ठेवणारी टोळी तिथे येऊन धडकली. अमेरिकन व ब्राझिलीयन अशा मिश्र जणांची ती टोळी होती; ओस्मर पोर्तुगीजमधून हुकूम सोडत असे, तर गाय इंग्लिशमधून आरडाओरड करत असे. ओस्मरला दोन्ही भाषा अवगत होत्या, त्या टोळीचा तो अधिकृत दुभाषा झाला.

डॅनी बॉय (डॅनिलोचं टोपण नाव), याला पकडण्यासाठी गाय या वॉिंशग्टन मासियाला सुपारी देण्यात आली होती. काही बाबतीत तो फारच कल्पक होता. इतरांच्या तुलनेत हुशार तर होताच, पण तेवढाच तो कुप्रसिद्धही होता. डॅनी बॉयला पकडण्यासाठी केलेल्या एकेक वर्षाच्या कराराची त्याची ही पाचवी वेळ होती. भक्ष्य पकडल्यानंतर बोनसही दिला जाणार होता. डॅनी बॉय मिळत नसल्याने तो खचत मात्र होता. त्याने ते कधी दर्शवलं मात्र नाही.

पस्तीस लाख डॉलर्स आणि चार वर्षं, याचं काय चीज झालं हे दाखवून देण्यासारखं काहीच घडत नव्हतं आणि आज तो सापडला.

No comments:

Post a comment