Saturday, 20 September 2014

शॅडो मॅन

मला स्वप्न पडलं. तशी मला तीनच स्वप्नं पडतात; त्यातली दोन सुंदर असतात; पण एक भयंकर असतं. पण कशीही असली तरी ही स्वप्नं पडून गेल्यावर मात्र मी भीतीने थरथरत असते आणि मला अगदी एकाकी वाटतं.
आज रात्री मला स्वप्न पडलं, ते माझ्या नवऱ्याचं होतं. ते काहीसं असं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यानं माझ्या मानेचं चुंबन घेतलं एवढ्याच शब्दात मी स्वप्नाचं वर्णन संपवू शकते. पण तसं करणं म्हणजे `खोटं’ हा शब्द जो अर्थ स्पष्टपणे सांगण्यासाठी निर्माण केला गेला, तितक्याच स्पष्टपणे खोटं बोलण्यासारखं होईल.

त्यानं माझ्या मानेचं चुंबन घ्यावं म्हणून माझ्या शरीराचा कणन्कण आतूर झाला होता, कधी एकदा त्याचे ओठ माझ्या मानेवर टेकतील, असा उद्घोष माझ्या रोमरंध्रांतून चालला होता. आणि खरोखरच जेव्हा त्याने आपले ओठ अलगद मानेवर टेकले, तेव्हा माझ्या सगळ्या आर्त आर्जवांचा प्रतिसाद म्हणून थेट स्वर्गातूनच आलेल्या देवदूताचाच स्पर्श झाल्याची अनुभूती मला झाली, असं सांगणंच खरं बोलण्यासारखं होईल.
मी तेव्हा सतरा वर्षांची होते, आणि तोदेखील. कसल्याही बाबतीत सौम्यपणािं कवा संदेह असण्याचं ते वयच नव्हतं. होत्या तीव्र, धारदार कंगोरे असलेल्या भावना आणि मनाचा खोल कोपरादेखील लखलखीतपणे उजळून टाकेल असा प्रखर प्रकाश.

थिएटरच्या अंधारात तो हळूच माझ्याकडे झुकला, आता तो चुंबन घेणार म्हणून माझं हृदय थुईथुई नाचायला लागलं, पण (अरे देवा!) तो उगाचच कसलातरी विचार करत तसाच थांबला. माझा जीव तर अगदी कासावीस झाला होता. वरवर जरी मी शांत असल्याचं नाटक करत होते, तरी चुंबनाच्या अपेक्षेनं मी रोमांचित झाले होते, पण (अरे देवा!) तो तर अध्र्यातच थांबला होता; पुन्हा एकदा धीर करून पुढे होत अखेर त्यानं माझ्या मानेवर आपले ओठ टेकले मात्र, त्या सुखद क्षणीच मला जाणवलं की, मी आता कायमची त्याची झाले होते. देवानं त्याला माझ्यासाठीच घडवलं होतं. असा जोडीदार मिळणं बऱ्याच लोकांच्या नशिबात नसतं हे मला माहीत होतं. असे लोक दुसNया कुणाला असा जोडीदार मिळाला त्याबद्दल फक्त वाचतात, तसं आपल्या बाबतीतही होईल अशी स्वप्नं पाहातात, नाही तर असं काही होतं, या कल्पनेलाच नाक मुरडतात. पण मला माझा जोडीदार मिळाला होता आणि तोदेखील वयाच्या सतराव्या वर्षीच. मग मी त्याला कधीच सोडलं नव्हतं. तो जेव्हा माझ्या मिठीतच शेवटच्या घटका मोजत होता, मृत्यू जेव्हा त्याला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करत होता तेव्हादेखील मी त्याला जिवाच्या आकांतानं धरून ठेवलं होतं. आत्तादेखील तो माझ्यापासून दूर गेलेला नाही.

पूर्वी अतीव सुखाच्या क्षणी मला देवाची आठवण होत असे; आता देवाचं नाव फक्त दु:खाच्या आठवणीच घेऊन येतं. का देवा, का तू त्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस? मला त्याची फार आठवण येते रे! सतराव्या वर्षीच्या कोवळ्या त्वचेवरच्या त्या अवीट चुंबनाच्या आठवणींच्या भुताचे स्पर्श अंगावर वागवत मी जागी होते. मग मला जाणवतं, स्पष्ट जाणवतं की; मी आता सतराची नाही, राहणार नाही; पण तो मात्र वाढायचा थांबला आहे.
मृत्यूनं त्याला पस्तिसाव्या वर्षीच बंदिवान करून टाकलं आहे - कायमचं. माझ्या आठवणीत मात्र तो नेहमीच सतरा वर्षांचा, नेहमी माझ्याजवळ हलकेच झुकत असलेला, आणि एका अचूक क्षणी हलकेच माझ्या मानेवर आपल्या ओठांनी स्पर्श करत असलेला असाच राहणार आहे.

अभावितपणे माझा हात पलंगावर जिथे तो झोपलेला असायला हवा होता तिथे जातो, एक असह्य वेदना माझं काळीज चिरून टाकते. थरथरत, अडखळत मी देवाची करुणा भाकते, मृत्यूची भीक मागते; माझ्यासह ही असह्य, काळीज फाडून टाकणारी वेदना संपवण्याची याचना करते. पण तरीही माझा श्वास चालतच राहतो
आणि माझ्या वेदनेची तीव्रता हळूहळू निवळल्यासारखी वाटते. आमच्या दोघांच्या एकत्र आयुष्यातला प्रत्येक क्षणन्क्षण मला हवाहवासा वाटतो. त्याच्या चांगल्या गोष्टी तर मला हव्याशा वाटतातच; पण त्याच्या
स्वभावातल्या काही त्रुटीदेखील मला तितक्याच हव्याशा वाटतात. त्याचा उतावळेपणा, रागीटपणा मला आठवतो. मी जेव्हा त्याच्यावर चिडत असे, तेव्हा ज्या समंजसपणे तो माझ्याकडे पाहायचा; ती त्याची नजर मला आठवते. या सगळ्याबरोबरच, मला स्वप्ने आणि सावल्या कुठेतरी घाईघाईनं जायचं असायचं, तेव्हाच नेमवंâ गाडीत पेट्रोल भरायला विसरल्याचं त्यानं सांगितल्यावर मला त्याचा जो राग यायचा, ते क्षणदेखील मला आता हवेहवेसे वाटतात.

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेली तर काय होईल, हा विचारदेखील आपल्या मनाला कसा कधी शिवत नाही, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीनं प्रेमानं दिलेली फुलं आणि चुंबनंच फक्त आठवणी व्यापतात असं नसतं, त्या व्यक्तीबरोबर अनुभवलेला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन बसलेला असतो. अपयशांच्या आणि लहानमोठ्या संकटांच्या एकत्रपणे केलेल्या सामन्याची आठवण मनात घर करतेच आणि त्याचबरोबर धास्तावलेल्या मनाला उभारी देण्यासाठी दिलेला मिठीचा आधारदेखील घट्टपणे आठवणीत राहतो. आत्ता, या क्षणी मला तो माझ्याजवळ हवा होता; मला
त्याचं चुंबन घ्यायचं होतं. मी त्याची प्रतारणा करते आहे आणि त्याचा जाब विचारायला तो इथे उभा ठाकला आहे, असं जरी झालं असतं तरी मला ते चाललं असतं. कसंही करून मला तो आत्ता इथे असायला हवा होता.
ज्याच्यावर अतूट प्रेम केलं, ती व्यक्ती नाहीशी झाल्याच्या दु:खाला तुम्ही कसं तोंड देता, असं लोक कधीकधी धीर करून मला विचारतात. ते खूप अवघड आहे, एवढंच मी बोलते आणि गप्प बसते.

हृदयात खिळे ठोवूâन येशूसारखं थोडं-थोडं मरायला टावूâन दिल्यासारखं वाटतं, असं मी सांगू शकले असते. तो गेल्यानंतर कितीतरी दिवस झाले, तरीदेखील माझं हृदय किंचाळत, आक्रोश करत असे. वर-वर पाहाता मी शहरात फिरत असले आणि गप्प असले तरी आणि माझ्या तोंडून आवाज फुटत नसला तरी मी आतल्या आत प्रचंड आक्रोश करत असे, असंदेखील मी सांगू शकले असते. किंवा हे आत्ता पडलं ते स्वप्न मला पडतं, रोज स्वप्नात तो मला भेटतो, आणि रोज सकाळी तो माझ्यापासून हिरावला जातो, असंही सांगू शकले असते. पण त्यांचा दिवस कशाला खराब करायचा? असं म्हणून मी फक्त `ते अवघड आहे’ एवढंच म्हणून गप्प राहते. आणि लोकांचंही त्यानं समाधान होतं. 

No comments:

Post a comment