Monday, 1 June 2015

चिंता सोडा सुखाने जगा - डेल कार्नेगी

रूडयार्ड किपलींगसारखी प्रसिद्ध नामवंत व्यक्तीसुद्धा प्रसंगी हे विसरते की, ‘आपले थोडके आयुष्य लहान बनवू नये.’ त्याचा परिणाम काय झाला? त्याचे व त्याच्या मेहुण्याचे कोर्ट-दरबारी चाललेले भांडण इतके ऐतिहासिक ठरले की, काळजीच्या सवयीतून तुमची मोडतोड होण्यापूर्वी... त्यावर एक पुस्तक लिहिले गेले : ‘रूडयार्ड किपिंलग्ज व्हर्मींट फ्यूएड’.

त्याची कथा अशी की, रूडयार्ड किपिंलगचे व्हर्मींटमधील एका मुलीशी लग्न झाले. कॅरोलिन तिचे नाव. ब्रॅटलबोरो येथे त्याने एक सुंदर घर बांधले आणि तेथेच आता पुढील आयुष्य काढायचे या विचाराने तो तेथे स्थायिक झाला. त्याचा मेहुणा निटी बॅलेस्टीयर हा त्याचा अगदी जीवश्च कंठश्च मित्र बनला. दोघेही एकत्र काम करायचे, खेळायचे, मौजमजा करायचे. नंतर किपिंलगने बॅलेस्टीयरकडून काही जमीन विकत घेतली. अर्थात त्यांचा तोंडी करार असा झाला होता की, किपिंलग त्या जमिनीवरील गवत कापून नेण्यास कधीच हरकत घेणार नाही, पण एके दिवशी बॅलेस्टीयरने पाहिले की, त्या विशिष्ट जागेवर किपिंलगने फुलझाडांची लागवड केली होती. तो रागाने बेभान झाला. किपिंलगनेसुद्धा ठोशाला प्रतिठोसा दिला आणि छोट्या कटकटीचे रूपांतर मोठ्या युद्धात झाले. काही दिवसांनी किपिंलग जेव्हा सायकलवरून जात होता त्या वेळी त्याचा मेहुणा घोडागाडी घेऊन रस्ता ओलांडत होता, पण किपिंलगला धक्का लागून तो जोरात पडला आणि जो किपिंलग त्याच्या पुस्तकातून मानसिक संतुलनाबद्दल लिहायचा आणि डोके शांत ठेवण्याबद्दल लिहायचा, त्याच किपिंलगने स्वत:च स्वत:चे मानसिक संतुलन घालवले आणि बॅलेस्टीयरविरुद्ध पकड वॉरंट काढले. 

कोर्टकेस चालली. सगळेच फार सनसनाटी आणि खळबळजनक होते. गावागावांतून वार्ताहर शहरात आले. जगभर बातमी झळकली. मध्यस्थी, तडजोड, मांडवली यांसारखे शब्द बाद झाले. या भांडणामुळे किपिंलगला आणि त्याच्या बायकोला अमेरिकेतील त्यांचे हे सुंदर घर पारखे झाले. सगळा कडवटपणा आणि काळजी कशासाठी, तर केवळ वाळलेल्या गवतासाठी! हा गवताचा भारा उंटाच्या पाठीवरील ओझ्यातील वाढीव गवताच्या काडीसारखाच ठरला!!

सुमारे चोवीस शतकांपूर्वी पेरीकल्स म्हणाला होता : ‘सभ्य गृहस्थांनो, आपण किरकोळ गोष्टींवर जरा जास्तच वेळ घालवतो. होय! हे खरेच आहे.’ डॉ. हॅरी इमरसन नेहमी जी गोष्ट सांगतात, ती वनराजीच्या प्रबळ योद्ध्याची, जिंकलेल्या आणि हरलेल्या युद्धाची कथा ऐका :

कोलोरॅडोच्या डोंगरउतारावरील एका प्रचंड महाकाय भुईसपाट झालेल्या वृक्षाची ही कथा आहे. निसर्गप्रेमी सांगतात की, ते झाड चारशे वर्षांपासून तेथे होते. कोलंबसने जेव्हा अमेरिकेत सॅग सालव्हॅजेरेवर पाय ठेवला तेव्हा त्याचे बीज रुजले होते आणि प्लायमाउथला भाविक जेव्हा स्थायिक झाले तेव्हा ते छोटे रोपटे होते. त्यानंतरच्या काळात चौदा वेळा त्याच्यावर वीज पडून ते कोलमडले. अनेक वादळांना त्या झाडाने यशस्वीपणे तोंड दिले. अत्यंत प्रतिकूल  परिस्थितीतसुद्धा ते परत उभे राहिले, पण शेवटी वाळवीच्या किड्यांच्या मोठ्या सैन्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला जमीनदोस्त केले. त्या वाळवीच्या किड्यांनी त्या झाडाला पोकळ करून टाकले आणि त्याची आतील शक्ती निष्प्रभ केली. इतक्या दुर्बल किड्यांच्या अव्याहत प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. ज्या महाकाय वृक्षावर काळाचा कोणताच परिणाम झाला नाही, वीज त्याला मोडू शकली नाही, वादळ नमवू शकले नाही, त्याला ज्या किड्यांना माणूस त्याच्या एका चिमटीने चिरडून टाकून शकतो, अशा शूद्र किड्यांनी संपवले. आपणसुद्धा जंगलातील त्या महाकाय वृक्षाप्रमाणेच आहोत, नाही का? आपणसुद्धा आपल्या जीवनात येणाऱ्या चढ-उतारांना, संकटांना, दु:खद प्रसंगांना मोठ्या हिमतीने तोंड देतो, पण आपल्या हृदयाला काळजीरूपी किड्यांना पोखरण्याची परवानगी देतो! काळजीची वाळवी! ती नाहीशी करणे सहज सोपे असते.

एकदा व्योिंमगमधील टेटॉन राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा प्रसंग आला. मी राज्याच्या महामार्ग-निरीक्षक असलेल्या चाल्र्स सेफ्रेडबरोबर व इतर काही मित्रांबरोबर होतो. आम्ही रॉकफेलरच्या मालकीच्या जागेला भेट देणार होतो, पण आमच्या गाडीने एक चुकीचे वळण घेतल्यामुळे आम्ही रस्ता चुकलो आणि पहिल्या गाडीपेक्षा एक तास उशिरा पोहोचलो. सेफ्रेडकडे किल्ली होती. त्याने कुंपणाचे गेट उघडले व एवढ्या गरमीत, डासांच्या साम्राज्यात, त्या जंगलात तो एकटा आमची वाट पाहत उभा राहिला. साधुसंतांचासुद्धा संयम तुटला असता असा तो प्रसंग होता, पण तशाही परिाqस्थतीत सेफ्रेडने संयम राखला. आमची वाट पाहत उभे असताना त्याने झाडाची एक फांदी तोडली आणि त्याची सुबक शिट्टी बनवली. आम्ही पोहोचलो तेव्हा तो डासांना शिव्या घालत होता का? तर नाही. मजेत शिट्टी वाजवत होता. मी ती शिट्टी एक अशा माणसाची आठवण म्हणून अजूनही जपून ठेवली आहे की, ज्याला हे माहीत होते की छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करू नये. 

काळजी करण्याची सवय सोडायची असल्यास नियम २ :

क्षुल्लक गोष्टींनी आपण स्वत:ला त्रास करून घेऊ नये. त्या विसरून जाव्यात. 

लक्षात ठेवा, 

‘आयुष्य लहान आहे. त्याला आणखी लहान बनवू नका.’

No comments:

Post a Comment