Saturday, 6 August 2022

महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासाला विलक्षण कलाटणी देणाऱ्या महाबंडाचा सखोल आढावा----

 

त्याच दिवशी सकाळी, एबीपी नेटवर्कचा वार्ताहर अक्षय भाटकरने ०९:३९ वाजता आपल्या कार्यालयाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर बातमी पाठवली. -'एकनाथ शिंदे यांना मिळणार मुख्यमंत्रीपद ! आज किंवा उद्या सरकार स्थापन करण्याचा दावा करणार ! भाजप त्यांना समर्थन देणार ! आतल्या गोटात चर्चा सुरु !' अक्षयने सकाळी ही बातमी दिली, तेव्हा कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसला नव्हता, तरी संध्याकाळच्या सुमारास ती बातमी खरी झाली. अक्षयच्या सूत्रांनी अगदी खरी बातमी दिली होती; परंतु त्याला बहुतांशी कुणीही पाठींबा दिला नव्हता. या निर्णयामागे कुठला ठाम विचार आहे हे नेमकं समजत नव्हतं, त्यामुळे ही बातमी न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीची बातमी पसरवण्यापेक्षा बातमी उशिरा पोहोचलेली अधिक बरी हाच विचार त्यामागे होता.महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासाला विलक्षण कलाटणी देणाऱ्या महाबंडाचा सखोल आढावा घेणाऱ्या ह्या पुस्तकाची पहिली प्रत मा. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांना देताना लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित हे पुस्तक जरूर विकत घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

Wednesday, 20 July 2022

Latest Review

ZANZIBARI MASALA

हलक्याफुलक्या आणि तरीही गंभीरपणे काही सांगू पाहणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी एका कथेचे नाव संग्रहाला दिले आहे. या कथांच्या नावांमधूनच लक्षात येईल, की त्यात जपान, मॅनहॅटन, पॅरिस, नायजेरिया, टोकियो, हॉलंड आणि अर्थातच झांजीबार येथील परिसराचा फेरफटका असणार आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे.

Tuesday, 19 July 2022

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT

would appreciate the way of writing where wildlife and human life are metaphorically connected throughout the book. It is equally good in making reader friendly by quoting ongoing issues,like movies. It`s a very nice book. Keen observations and inquisitiveness about wildlife and it`s behaviour; minute details of tribal culture are noteworthy. Happy to read and learn things.-Ms.Pratiksha Kale, Asstt. Conservator of Fores


*सामाजिक बांधिलकी जपणारी खुमासदार लेखनशैली* जी.बी.देशमुख ह्यांचे लेख असो वा पुस्तक असो, मराठी भाषेतील नेटके उच्चार, प्रगल्भ जीवन जाणीवा, वेधक भाषा मांडणी, यांचा परिश्रमपुर्वक प्रभावी वापर लेखकाने केला आहे. भाषेचे अमोघ सौंदर्य, भाषेची सहजता व ओघ लेखकाला प्रत्येक कथानक रंगवताना इतके साधले आहे की... लेखकाने अनेक वर्षापासून आपल्या दुर्बिणी सारख्या दृष्टीने अत्यंत शिताफिने माणसं व कुला मामा (मेळघाटातील वाघ) देखील वाचले आहेत, असे जाणवते. उत्तम बोलके संवाद, हा पुस्तकाचा आत्माच असतो. एकतर प्रभावी शीर्षक, त्यामुळे आताच वाचून घ्यावं अशी तळमळ मनात असते ..ती मी पूर्णत्वाला नेतेच.... त्याचे अमिताभवरचे लेख असो, `अमरावतीचे छप्पन स्वभाव` असो, `कुलामामाच्या देशात` असो... वाचतच रहावेसे वाटते.... सामाजिक बांधिलकी अत्यंत निष्ठेने जोपासली आहे त्यांनी .कधी खुदकन हसवणारी लेखन शैली, कुठ गंभीर, कुठ तिखट मिठ लावलेली, तू असाच लिहीत रहा... आम्ही वाचक आनंद घेत राहू.. मी त्यांच्या साहित्यकृतीला मनःपूर्वक शुभेच्छा देते....--डॉ. योजना बर्डे, अमरावती.


Saturday, 16 July 2022

कशीर १५ जुलै २०२२ कार्यक्रम

 अखिल मेहता सर यांसकडून पाहुण्यांचे स्वागत 








प्रकाशन



प्रेक्षक 



प्रेक्षकांचे प्रश्न उत्तर आणि लेखिका सहना विजयकुमार यांचा संवांद 
 











Friday, 15 July 2022

दाढीला लागली आग..

 सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी द्वारा अनुवादित

 'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' पुस्तकातील रंगतदार कथा...दाढीला लागली आग..



Thursday, 14 July 2022

VANSHVRUKSHA ABHIVACHAN

एस.एल भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित वंशवृक्ष या पुस्तकाचे अनंत कुलकर्णी यांनी केलेले अभिवचन