Wednesday 15 May 2013

Dev 'D' by Ashay Anil Walambe

Dev 'D'



समाजात मनुष्याला इतक्या वाईट परिस्थितींना सामोरं जावं लागतं की, त्याचं आयुष्यच बदलून जातं!’’ खरंतर लेखाची सुरुवात कशी करावी ह्या वर खूप विचार केला, पण मग आयुष्य, समाज ,ह्या जगात…’’ असे फंडे मारले की, लेखाला थोडं वजन येतं असं मला वाटतं.


असो... तर काही महिन्यांपूर्वी मी चेन्नईला एका इंटर्नशिपसाठी गेलो होतो. एका जाहिरात कंपनीमध्ये अनुभव घ्यायचा होता . त्यासाठी मी साधारण १- महिने आधी जायची तयारी सुरू केली होती. चेन्नईला राहायची सोय, तिथलं Work culture ह्याबद्दल बराच विचार आणि हालचाल सुरू होती.



Ashay Anil Walambe

तिथलं वातावरण खूप खराब आहे ! ’’, अरे रोज इडली खावी लागेल!’’ ,तमिळ सिनेमे अन् गाणी ऐकावी लागतील ! ’’, Office मध्ये सगळे मद्रासी लोक असतील! ’’ अशी वेगवेगळ्या लोकांकडून सारखीच वाक्य ऐकायला मिळाली. 

बरीच फोनाफोनी केल्यानंतर एक फ्लॅट मिळाला. त्यातून रूममेट हा महाराष्ट्रीयन आहे हे समजल्यावर तोच finalise केला. २२ तास प्रवास आणि रिक्षावाल्याशी (यशस्वीरीत्या) हुज्जत घालून रूमवर पोचलो.

तोसामान घ्यायला खाली आला होता. (ह्या तो आणि पुलंच्या तो चा काडीमात्र संबंध नाहीये.)

उंची सधारण फूट इंच... एक लूज T-shirt आणि Bermuda. ती नावाला Bermuda होती, त्याच्या उंचीमुळे त्याला ती थ्रीफोर्थसारखी दिसत होती. मला माझ्या लहानपणीची  आठवण आली. संघाच्या शाखेत जायचो... तिथे घालावी लागणारी चड्डी अशीच होती. नमस्ते सदा वत्सले मात्रुभुमि…’’ सोबत चला जाऊ संघात, एक चड्डी दोघांत’’ हे म्हणायला शिकलो...

पण तोच्या चेहर्‍याकडे बघून तोकधी संघात गेला नसेल अस उगाच वाटलं मला.

काय रे कसा झाला प्रवास? घर सापडायला काही Problem तर नाही ना आला?”  त्याच्या प्रश्नाने मी भानावर आलो.

अरे प्रवास एकदम छान ! ह्या रिक्षावाल्याने थोडा त्रास दिला ,की luggage चे extra पैसे द्या पण मी logically त्याला explain केले की, बाबा रे माझ्यासोबत अजून काही लोक असते तर तू extra पैसे घेतले असतेस का? हे त्या रिक्षावाल्याला कितपत पटलं मला माहीत नाही पण
ஔஹ்ச்ஜ்ப்க்ஜச்த்பைல்கஜ்த்னஹ்த்லஜ்ச்ல் असं वाकडं तोंड करून बोलला आणि निघून गेला.”

अरे इथल्या लोकांची mentality खूप वाईट आहे.’’ –  ‘तोने माझी एक बॅग उचलली.

मला तो म्हणाला त्या वाक्याचा प्रत्यय नुकताच आला होता. घर शोधताना ज्या बिल्डिंगमध्ये मला जायचं होता त्या बिल्डिंग समोरून किमान वेळा गेलो. त्याच बिल्डिंगखाली एक म्हातारा उभा होता. त्याला पत्ता विचारला तर त्याने चक्क माहीत नाही म्हणला. आणि आता बघतो तर काय ? हा म्हातारा त्याच बिल्डिंगच्या ground floor ला आपल्या galleryतून बघत होता. कदाचित त्याला एक सुंदर मुलगी असेल आणि आमच्यात 
काहीतरी होईल ह्या चिंतेने त्याने मला पत्ता नीट सांगितला नसेल

मी लगेच त्याची मुलगी कशी असेल आणि महिन्यांत आमच्यात काय होईल ह्याचा विचार करायला लागलो.

अरे ते non-tamil लोकांशी बोलतच नाहीत, हरामखोर सालेतोच्या वाक्याने मी पुन्हा एकदा भानावर आलो.
मला त्याचं म्हणणं एकदम पटलं. “खवचट म्हातारा साला!!!”

तू lucky आहेस, आजच रूमवर TV आणि DTH कनेक्शन लावलय 

वाह!! क्या बात है! म्हणजे football worldcup बघता येणार.’’

चला म्हणजे रूममेट मराठी, ground floorवर सुंदर मुलगी (असेल अशी अपेक्षा, इच्छा, प्रार्थना) आणि रूमवर TV, असं ऐकल्यावरच छान वाट्लं. आता फक्त रूममध्ये गेल्यावर छान अगरबत्तीच्या धुराने आणि घमघमाटाने स्वागत होणंच बाकी होतं, अस म्हणत रूममध्ये शिरलो आणि खरंच धूर होता... पण cigaretteचा!
इनमीन १०X१०ची खोली एका कोपर्‍यात सगळे कपडे ओसंडून वाहत होते. दारूच्या बाटल्या छान रचून ठेवल्या होत्या. Ashtray म्हणून newspaper खोली भर पसरवलेले होते. खिडकीमध्ये सगळे कपडेच कपडे होते. त्यामुळे अंधार होता. त्यातून खोलीचा रंग हिरवा.

तू येणार म्हणून खोली आवरली!!’’ तो.

मला आता काय reaction द्यावी, खरंच कळत नव्हतं. हे जर आवरलेलं असेल तर आधीची परिस्थिती काय असेल?? मला imagine करवेना. (मला माझ्या खोलीची आठवण आली :-) )

आयुश, तू drinks घेतोस का रे? (मराठी ग्राफिटी आठवली –  हा प्रश्न आहे की आमंत्रण’)

कधी कधीच, काही occasion असेल तरच, आणि माझ नाव आशय आहे, आयुश नाही.मी (मला ह्याचा खूपदा अनुभव आलेला आहे. अक्षय , ‘असायपासून अशोकपर्यंत माझा उद्धार झालेला आहे.

अरे sorry, असो आज drinks घेणार?” – तो.

नाही रे, आज नको.” – मी

मी घेतली तर चालेल? काही problem नाही ना तुला?’’ – तो (घरातल्या दारूच्या बाटल्या बघून हे प्रकरण occasional नसून regularआहे हे समजत होत मला, पण जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही तोपर्यंत चालू दे म्हटलं. )

छे रे... problem कसला त्यात, (फक्त पिऊन उलट्या न तमाशे करू नका), काय विशेष आज?’’

माझ्या परी चं बारसं आहे आज…” शांतपणे दारूची बाटली उघडत तो म्हणाला.

परी?

माझी मुलगी

अरे मग तू इथे चेन्नईत काय करतोयेस? ठाण्याला नाही गेलास?

झक मारतोय, सुट्टी नाही.तो (शांतपणे).

अरे मग bossला सांगायचं ना... दिवस द्या.

मित्रा तुला अस वाटतंय का की, मी हे विचारल नसेल?”

मग?”

माझी इथे transfer झालीये एका महिन्यापूर्वी... किमान वर्षं तरी इथेच आहे.’’ हे सांगत असताना त्याने एक 
मोठा puff मारला. “...असो... तु सांग घरी कोण कोण असत तुझ्या? किती दिवसांसाठी आलायेस?

आई-बाबा, महिनेआणि एक महिन्यपूर्वी म्हणजे ? तुझी मुलगी होती किती दिवसांची ?

११

त्यानंतर ?...”

एकदाही नाही बघितलं…” माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो म्हणाला.

पण मी बघणार होतो तिला. माझ्या येणार्‍या महिन्यात...’’

दोन quarter आणि एक पाकीट cigarette संपवून रात्री १२ला त्याने घरी फ़ोन केला आणि त्या . महिन्याच्या परीशी गप्पा मारल्या. त्याने तिच्यासाठी चेन्नईहून चेन पाठवली होती. आवडली का विचारत होता....

तिच ... उउउ... ऊऊऊ एवढंच ऐकून तोतिच्याशी संवाद साधत होता.

पुढचे दोन महिने मी हा संवाद रोज ऐकला... एवढंच नाही तर बायकोशी होणारे वाद, मी नीट आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या…’’ असं बाबांशी खोटं बोललेलं, खूप भूक लागलीये गं आई... तुझ्या कार्ल्याच्या भाजीची खूप आठवण येतीये गं’’ (कार्ल्याची भाजी खूप छान लागत असेल अशी माझा समज झाला)... तिकडुन fax कर ना भाजी…” उपाशी पोटी आईशी बोलणं, कट्ट्यावरच्या मित्राला मी गणपतीमध्ये घरी येतोय तेव्हा मिरवणुकीत नाचू ह्याचं आश्वासन!

 तुम्ही म्हणाल की, हे तर बर्‍याच लोकांच्या बाबतीत घडतं. पण माझ्यासाठी ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती .एका बापाला “ plz… मला परीचा निदान फोटो पाठव... पाया पडतो मी तुझ्या…’’असं रडताना पाहिलंय... हे सगळ झाल्यावर तोखाली जायचाएक पाकीट cigarette, एक quarter घेऊन यायचा... आयुश, तुला त्रास नाही ना रे होत? मी प्यायलो तर चालेल ना?’’ त्याचं guilt  मला दिसून यायचं...

छे रे..problem कसला त्यात?” पण ह्या वेळी तुसडेपणा नव्हता.

दुसर्‍या दिवशी येताना एक उदबत्तीचा पुडा घेऊन आलो. रोज रात्री त्याचा ठरलेला प्रश्न –

आयुश ,प्यायलो तर चालेल नं?”

हो... पण एक cigarette नंतर एक उदबत्ती लावायची... ही एक अट घातली मी त्याला. त्याने ती पाळलीदेखील.
सकाळी आठला घर सोडायचो आणि रात्री आठला घरी यायचो. मी juice पिउन आणि तो’ either दारू पिऊन किंवा दारूची तयारी करून, पेप्सीची बाटली, एक plastic चा ग्लास आणि दारू. (specific असा brand नाही, मुळात चेन्नईमध्येमध्ये सरकारनेच  दारूला permission दिलीये. त्यामुळे local brands खूप आहेत)..

एक दोन वेळा त्याला emotionally blackmail करून दारू, cigarette कमी कर सांगायचा प्रयत्न केलादेखी. पण "कौन कम्बखत दर्द बर्दाश्त करने के लिये पिता है, हम पिते है क्युकी timepass हो सके" त्याचं कारण हेच होतं. पिऊन out झालाय अस कधीच झालं नाही.

त्याला एकूणातच चेन्नईबद्दल राग होता. त्यातून मुंबईकर असल्यामुळे ते शहर सोडून चेन्नईत बदली होणं त्याच्या जिव्हारी लागलं होतं.एका चांगल्या TV channel मध्ये कामाला होता. लग्न झालं होतं. बायकोला दिवस गेले आणि recession मध्ये ह्याची नोकरी... दुसर्‍या ठिकाणी job मिळाला आणि त्याची परी जन्मली. पण चेन्नईला transfer झाली. परी लहान असल्यामुळे आणि इथलं वातावरण एकतर वाईट त्यामुळे तो एकटाच इथे आला...

इथल्या लोकांच्या घामालादेखील सांबार आणि रस्समचा वास येतो.” थोडक्यात काय, तर इथलं खाणं, लोक, शहर यांबद्दल त्याचं मत वाईट होतं.

त्याउलट माझं होतं. Return ticket तयार असल्यामुळे थोडेच दिवस काढायचे होते . पण  तो एखाद्या black hole मध्ये अडकला होता.

मी रूमवर जाताना मानसिक तयारी करुन जायचो. cigrette,दारुचा वास, फोनवरची भांडणं... पण... पण त्यादिवशी काहीतरी वेगळंच घडलं. घरात शिरल्यावर उदबत्त्यांचा घमघमाट, छोटी छोटी खेळणी, प्रसन्न वातावरण होतं.

तोला एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यासारखा होता. sizesचे frocks घेऊन आला होता.

परी किती मोठी झाझीये गं? हाथभर लांब आहे की अजुन छोटीशी आहे?" असे प्रश्न ऐकायला मिळाले.  त्याने परी जन्मली त्या दिवसाचं वर्णन केलं. " आयुश, अरे मी OTच्या बाहेर tension मध्ये होतो... एक नर्स एक कपड्यात एका बाळाला घेऊन आले. म्हणली लक्ष्मी आलियेतिला हातात घेतलं आणि ढसाढसा रडायला लागलो. आयुश जेव्हा तू बाप होशील तेव्हा मला नक्की फोन कर...’’

तो त्याच्या परीला कुशीत घेऊन झोपल्याचा भास मला त्या रात्री झाला..

पण दुसर्‍या दिवशी त्याची रजा cancel झाली. रात्रभर परीचा video बघत होता. रात्रीचा  वाजला होता. मी कुस बदलत होतो. भिंतीला टेकून बसला होता.

आयुष? झोपलायेस का रे?’’

हमम, बोल’’

बराच वेळ काही बोलला नाही म्हणून मी डोळे उघडून पहिला तर परीचा video बघत होता.

माझी परी मला ओळखेल का रे??”

माझे डोळे खाड्कन उघडले. (हा प्रश्न माझ्यासाठी नव्हताच मुळी!)

अरे वेडायेस का? ओळखेल की मी उगाच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो...
एवढा एक प्रश्न विचारून तो झोपला अन् मी जागा रहिलो.

नुकतंच संदीप खरे आणि सलील कुलकर्णीच्या दमलेल्या बाबाची कहाणीने बर्‍याच लोकांना रडवलंय. पण निदान ते बाबा आपल्या मुलांना खरंखुरं तरी बघत असतील... ह्या दमलेल्या बाबांपेक्षा एकटा पडलेल्या बाबाचं काय??

आपल्या मुलीच्या सगळ्यात छान moments ना miss करत होता तो... रोज दारू, cigaretteने ह्याचा दिवस सुरू व्हायचा आणि संपायचा. हा नवीन DEV 'D' जिथे D stands for Daddy... पहिल्यांदाच बघितला....

मी ज्या कामासाठी चेन्नईला गेलो होतो तिथे एक रिसर्च करायचा होता. ज्या दाम्पत्याचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. त्यांच्यासाठी म्हणून एका पर्यटन कंपनीने नवीन स्कीम सुरू करायचे ठरवले होते. त्यांचे प्रॉब्लेम हे जीवघेणी स्पर्धा, कामवाली येणे, बाजारातली चढउतार, ढासळती तब्येत हे होते... आणि इथे 'तो' चे प्रॉब्लेम हे अन्न, वस्त्र, निवारासाठीची लढाई आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठीची तरतूद म्हणून एका आवडणार्‍या ठिकाणी येऊन काम करणं... काही वेळा आपल्याकडे काही पर्याय नसतो म्हणून आपल्या जवळच्या लोकांपासून आपण खूप लांब जातो.पण बर्‍याच वेळा आपली अशी समजूत असते की, आपण हे सगळं आपल्या कुटुंबासाठी करतोय. पण खरंच आपण जे करतोय त्याने आपले कुटुंबीय सुखी आहेत का? माणसाचा सहवास ही सगळ्यात मोठी समाधानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवतो आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी ही सगळी धडपड. मानसिक आणि शारीरिक त्रास दोन्ही. अवास्तव वाढवून ठेवलेल्या भौतिक सुखाच्या अपेक्षा, चंगळवाद, ह्यात वाहवत चाललेला माणूस... कुठेतरी थांबून विचार करायची नक्कीच गरज आहे... आता जर ह्या सगळ्या धडपडीत आपल्या स्वतःला खूप आनंद मिळत असेल तर विचार करण्यात अर्थ नाही... 

१० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही त्रास ओढवून घेणार्‍या लोकांकडून आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्रास सहन करणार्‍या 'तो' कडून मी त्या दोन महिन्यात बरंच काही शिकलो...

दोन महिने कसे संपले कळलंच नाही. माझी पुण्याला परत यायची तयारी सुरू झाली. मी पाँडीचेरीवरून त्याच्यासाठी एक branded full bottle व्हिस्की आणली. बाटलीकडे काही वेळ बघितलं आणि हसत म्हणाला. “हे तर दोन दिवसांत संपेल, पुढे?”

मी निघालो, तेवढ्यात हाक ऐकू आली "आयुश!!" (आता मात्र मला खरंच राग आला होता. दोन महिने होऊनदेखील शेवटच्या दिवशी माझा नाव चुकीचं घेतलं त्यानं.  )

माझ्या हातावर ५१ रुपये ठेवत म्हणला, “दगडूशेठ गणपतीला जा आणि पूजा कर, माझ्यासाठी नाही परी साठी.”

नक्की’’ पैसे खिशात ठेवत मी म्हणालो. “बरं, मुंबईला काही पाठवायचं इथून ? काही घेऊन जाऊ का?”

मला नेतोस ?” त्याने हसत विचारलं... 

शक्य असेल तर नक्की!” मीसुद्धा हसत वळलो. बॅग उचलून दरवाजापर्यंत गेलो.

“By the way एक गोष्ट विचारायची राहूनच गेली, परीचं नाव काय रे ठेवलंस?

त्याचे डोळे एकदम चमकले, तुला माहीतच नाही की कायघ्या… 'आयुशी' !!!”

इतके दिवस माझं चुकीचं नाव घेतल्यामुळे आलेला राग गिळून मी घराबाहेर पडलो...