Tuesday 3 December 2013

बकुळा

पावसाने चांगलाच जोर धरला होता. पाऊस अगदी सतत कोसळत नसला तरी त्याची रिपरिप चालूच होती. त्यामुळे लोकांचं जिणं असह्य झालं होतं. धरणीमाता मात्र उन्हाळ्याच्या तापानं शुष्क होऊन गेली होती. ती पावसाची आस धरून बसली होती. पिवळट पडलेल्या गवताच्या रंगच्छटा बदलून पोपटी रंग कुठे कुठे दिसू
लागला होता. पावसाचे थेंब अंगावर पडताच लाजाळूचं झाड शहारून आपली पानं मिटून घेत होतं. पुâलं सुस्नात होऊन ताजी, टवटवीत झाली होती. थंड वाNयाच्या झुळकीसरशी चाफ्याची पुâलं कोमेजून चालली होती. बकुळेचं झाड मात्र पुâलांनी डवरलं होतं. गंगाक्काची मनसोक्त पुâलं वेचून झाल्यावरसुद्धा राहिलेल्या पुâलांचा गालिचा जमिनीवर शोभून दिसत होता.

शाळेत मुलामुलींच्या उत्साहाला नुसतं उधाण आलं होतं. शाळेनं या वर्षी पहिला व दुसरा असे दोन्ही क्रमांक पटकावले होते. त्यानंतरचा आठवडा हे यश साजरं करण्यातच गेला. श्रीकांत व श्रीमती या दोघांवर बक्षिसांची नुसती उधळण चालली होती. एक आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणून त्यांचं नाव अभिमानानं
उच्चारलं जात होतं. त्यांच्या या यशामुळे शाळेच्याही नावाचा चांगलाच बोलबाला झाला होता. आपल्या पाल्याला याच शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून दूरवरून पालकांच्या उड्या पडत होत्या.

या सर्व सत्कार समारंभाच्या वेळी श्रीकांत आणि श्रीमती यांच्यात एका शब्दाचीही देवाणघेवाण झाली नव्हती. एकमेकांचं अभिनंदन करणं तर दूरच. एक दोन वेळा श्रीमतीने आपण होऊन श्रीकांतशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकांत चांगलाच दुखावला गेला होता. त्यानं तिला काहीही प्रतिसाद दिला नाही. अखेर श्रीमती एक मुलगी होती. एका मुलीनं याहून अधिक धिटाई दाखवून मुलाशी बोलण्याचा प्रयत्न तरी कसा करायचा? ते फारच धाडसाचं दिसलं असतं. 

निकाल लागून काही दिवस लोटले. एक दिवस श्रीमती धारवाडला मामाकडे राहत असलेल्या आपल्या आजीला– आईच्या आईला– भेटायला लोकलने निघाली. आजीचं वय झालं होतं. तिला प्रवास करून श्रीमतीकडे येणं तर काही शक्य नव्हतं.

एका रिकाम्या वंâपार्टमेंटमधे शिरून श्रीमती खिडकीपाशी बसली. प्रवास तसा वंâटाळवाणाच होता. श्रीमतीनं प्रवासात वाचायला एक पुस्तक आणलं होतं. ते उघडून ती वाचनात गर्वâ झाली. गाडी सुटत असताना श्रीमतीचं समोर लक्ष गेलं. त्याच डब्यात श्रीकांतही चढला होता व नेमका तिच्या समोरच्याच सीटवर येऊन तो बसला. श्रीमती आश्चर्यचकित झाली, पण ती गप्प राहिली. श्रीमतीला पाहून श्रीकांतलाही आश्चर्य वाटलं. तोही धारवाडलाच निघाला होता, आपल्या बहिणीच्या सासरी. आज पहिल्यांदाच त्या दोघांची अशी एकांतात गाठ
पडण्याची वेळ आली होती. नाहीतर नेहमी दोघेही आपापल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातच असत. दोघांनाही खूप अवघडल्यासारखं झालं. संकोचामुळे काय करावं, काय बोलावं ते कळेना. संपूर्ण डब्यात ते फक्त दोघंच होते. श्रीमतीकडे टक लावून न बघता डोळ्यांच्या कोपNयातून श्रीकांतने तिचं निरीक्षण केलं. तिच्या हातात
काचेच्या साध्या बांगड्या होत्या आणि तिने डोक्यात नेहमीप्रमाणे बकुळीचा गजरा माळला होता.

बकुळीच्या गजNयाचा मंद सुवास पसरला होता. श्रीकांतनं चोरून तिच्या चेहNयाकडे पाहिलं. तिच्या चेहNयावर नेहमीचं अस्पुâट, मंद स्मित होतं. ते पाहून श्रीकांत धीर गोळा करून म्हणाला, ‘‘धारवाडला चालली आहेस का?’’ 

काय पण प्रश्न? ट्रेन धारवाडलाच तर जाणारी होती. मग आणखी कुठे जाणार? ‘‘होय. माझी आजी असते तिकडे, मालमड्डीला. आणि तू?’’ ‘‘मी पण धारवाडलाच चाललोय. सप्तपूरला आमचे नातेवाईक असतात,
त्यांना भेटायला.’’

आणि ते संभाषण तिथेच थांबलं. खरं तर श्रीकांत मूळचा चांगलाच धीट आणि बडबड्या होता. पण आज मात्र सुरुवात कशी करावी, तेच कळत नव्हतं त्याला. पण का कोण जाणे, हिच्याशी आत्ता आपण काहीतरी बोलावं... असं मात्र वाटतं होतं. एक अनामिक ओढ वाटत होती, एक प्रकारचं सुप्त आकर्षण वाटत होतं. कदाचित ती सगळ्यांपेक्षा इतकी वेगळी होती म्हणून असेल... िंकवा ती त्याची प्रतिस्पर्धी होती म्हणून असेल... आपल्याला एखादी गोष्ट मिळणार नाही हे समजलं की, त्याच गोष्टीच्या प्राप्तीची माणसाच्या मनात अभिलाषा निर्माण होते. तसंच काहीसं झालं होतं.

अचानक त्याने हात पुढे केला आणि म्हणाला, ‘‘अभिनंदन!’’ श्रीमतीला मोठाच धक्का बसला. त्या काळात, त्या तेव्हाच्या समाजात... ही गोष्ट अगदीच अनपेक्षित होती.

तिने लाजरेपणाने हात पुढे केला आणि म्हणाली, ‘‘थँक्स आणि तुझंसुद्धा अभिनंदन.’’

‘‘तू कशाला माझं अभिनंदन करते आहेस? आणि तेही इतक्या उशिरा? दुसNया नंबराबद्दल वाटतं?’’

‘‘तसं नाही श्रीकांत. मला तर खरं म्हणजे त्याच दिवशी तुझं अभिनंदन करायचं होतं. पण आजूबाजूला आपले सगळे मित्रमैत्रिणी होते. आणि सगळे कसे बोलतात, तुला माहीतच आहे. उगाच कोणीतरी वाटेल ते बोलू नये असंच मला वाटतं. खरं सांगू श्रीकांत? तुझ्या अंगचे अनेक गुण मला किती आवडतात, हे सगळं तुला
सांगायची माझी इच्छा होती, खूप दिवसांपासून. तू इतका एकलक्षी आहेस, मेहनती आहेस. याच तुझ्या गुणांमुळे अगदी थोड्याच दिवसात काय पाहिजे ते तू प्राप्त करू शकशील. पण मी तुझ्यासारखी नाही. मी अगदी थोडक्या गोष्टीत खुश होऊन जाते. 

म्हणूनच तुझं यश हे मला माझ्या यशापेक्षा मोठं वाटतं. पहिल्या आणि दुसNया क्रमांकात फार काही फरक असतो, असं मला मुळीच वाटत नाही. परीक्षकाचा पेपर तपासतानाचा मूड आणि काही थोड्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे... अशा गोष्टींमुळे नंबर पुढे मागे होऊ शकतात.’’

तिच्या तोंडचे ते शब्द ऐवूâन श्रीकांतला खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला. ही शांत, अबोल मुलगी... आपल्यापेक्षा कितीतरी हुशार असलेली... आणि तिला आपल्या अंगच्या गुणांची कदर वाटते? अचानक त्याच्या मनात आलं... हिचे हात किती मऊ आहेत! एका मुलीचे हात इतके मऊ असतात, याची त्याला कल्पनाच नव्हती. आता हिच्याशी संभाषण कसं चालू ठेवायचं, याच्या नवीन नवीन कल्पना त्याला सुचू लागल्या.

‘‘श्रीमती, तू कुठल्या कॉलेजात जाणार?’’

‘‘मी आर्ट्सला जायचं ठरवलंय.’’

याचा अर्थ इथून पुढे श्रीमती आपल्या वर्गात नसणार... पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे कधीच ती आपली प्रतिस्पर्धीसुद्धा नसणार... या विचाराने मात्र त्याला मनातून जरा हायसं वाटलं. 

No comments:

Post a Comment