Friday 8 August 2014

चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल

आम्ही बहिणी

तुमच्या मैत्रिणींबरोबर फोनवर दहा मिनिटं गावगप्पा (गॉसिपिंग) करून, तुमचा जबडा आणि हनुवटी जितकी डौलदार होईल, तेवढी ती प्लााqस्टक सर्जरीनंदेखील होणार नाही. 
- डॉक्टर जेन कर्टन

डायानाला तिच्या ब्राउनीचा मधला भाग आवडतो. मी प्रथम कोपरे आणि मग कडा खाते. तिला मफिन्चा वरचा भाग आवडतो. मला तळ आवडतो. तिचे केस लांब, दाट आणि कुरळे आहेत. माझे तारेसारखे सरळसोट आणि मऊ आहेत. आम्ही एकमेकींच्या केसांबद्दल असूया करतो. ती उजव्या हातानं कामं करते, मी डावखोरी आहे. ती उंच आहे आणि बाबांसारखी दिसते. मी आईसारखी दिसते; पण तरीही गावातल्या उपाहारगृहात आम्ही एकमेकींकडे तोंड करून बसतो, तेव्हा जणू लकबी आणि हावभावाचं आम्ही आरशात प्रतिबिंबच पाहत असतो. आमचे हात सारख्याच पद्धतीनं हलतात. आम्ही दोघीही टोस्ट खाण्यापूर्वी कॉफीचा घोट घेतो. (तिचे टोस्ट पांढरट असतात, माझे जळलेले असतात.) आम्ही एकमेकींसारखं वागताना जाणवलं, की आम्ही मनमोकळं हसतो. आमचे ओठ बोटांच्या टोकांनी झावूâन टाकतो, तेही अगदी एकमेकींप्रमाणे. आम्ही खिदळणं दाबतो. ‘‘हं!’’ आम्ही म्हणतो. कधीकधी लोक विचारतात, आम्ही जुळ्या बहिणी आहोत का? आम्ही जुळ्या नाही; पण आम्ही बहिणी आहोत.

मोठं होत असताना आम्ही सर्वात जवळच्या मैत्रिणी होतो. रस्त्यावरच्या दिव्यांखालून, तंग कपड्यांमध्ये, अनवाणी पळत आम्ही काजव्यांचा पाठलाग करत असू आणि पायांची माती रस्त्याच्या कडेच्या डबक्यामध्ये धुऊन टाकत असू. मग आम्हापैकी एकीला वटवाघूळ दिसलं, तर आम्ही घराच्या पोर्चच्या सुरक्षित आसNयाला विंâचाळत पोहोचून एकमेकींना मिठी मारत असू आणि खिदळत असू. मला ठाऊक आहे, की जवळून जाणाNया कुणालाही आम्ही वेडपट वाटत असणार; पण तेव्हा आम्ही त्याची कधीही फिकीर केली नाही. माझ्या बहिणीला मी कधी मूर्ख वाटले नाही.

आम्ही आमचा जवळजवळ सर्व वेळ एकत्र घालवत असू. आम्हाला इतर मैत्रिणी होत्या; पण आमची एकमेकींशी होती, तेवढी इतर कुणाशीही जवळीक नव्हती. आम्ही एकच खोली, एकच मोठा पलंग, एकच अंघोळीचा टब, आमचे कपडे-खेळणीसुद्धा वाटून घेत असू. आम्ही आमची गुपितं, भीती आणि स्वप्नंही
वाटून घेत असू. बहिणीच्या गुपितांहून अधिक महत्त्वाचं काहीही नसतं. आमच्या बार्बी बाहुल्या आमच्याप्रमाणेच वागत. तिची माझ्या बाहुलीहून मोठी होती, खूप सारे कपडे बाळगून होती आणि दादागिरी करणारी होती. माझी बाहुली कुरकुरणारी आणि मनासारखं झालं नाही तर आदळआपट करणारं लहान मूल
होती. आम्ही कधी तसं बोललो नाही, तरी आम्हाला ठाऊक होतं, की त्या बाहुल्याही बहिणी-बहिणीच होत्या.

माझा विवाह आधी झाला. मी माझ्या वाङ्निश्चयाबद्दल सर्वात आधी तिला सांगितलं. ती माझी ‘मेड ऑफ ऑनर’ - करवली - होती. तिनंदेखील लग्नाचं वचन दिल्यावर सर्वप्रथम मलाच सांगितलं. मीदेखील तिची ‘मेड ऑफ ऑनर’ करवली - होते. आम्हाला प्रश्न पडला होता, की मला ‘मेड ऑफ ऑनर’ न म्हणता ‘मेट्रन ऑफ ऑनर’ म्हणायला हवं का? पण आम्ही तो बेत रद्द केला. आमच्या समजुतीनं ‘मेट्रन’ म्हणजे म्हाताNया, जाडजूड, तिशीपुढच्या ध्Eिाया असतात. आम्ही बहिणी यापैकी काहीच नव्हतो. मला दिवस गेल्यावर डायानाला मी ते सर्वात आधी सांगितलं. ‘आधी मला सांगायचं’ यासारखे बहिणींचे नियम कधीच बदलत नाहीत. ती माझ्या मुलांचे फोटो तिच्या पाकिटात ठेवते आणि जो कुणी बघायला तयार असेल, त्याला दाखवते.

ती म्हणते, ‘‘माझे छोटे भाचे बघायचेत?’’ ते छोटे मुलगे सतरा आणि चौदा वर्षांचे आहेत. तिला तिची स्वत:ची मुलं नाहीत, म्हणून ती बहिणीचीच मुलं आपली मानते. माझ्या विवाहानंतर मी दूर राहायला गेले. आता आम्ही एकमेकींना वर्षातून काही वेळाच भेटतो. आम्ही अजून आमची गुपितं, भीती आणि स्वप्नं एकमेकींना
सांगतो; पण आता त्यात आमच्या आठवणी, आमचा भूतकाळ आणि आमच्या वेदनांची भर पडली आहे. आम्ही एकमेकींना टोपणनावानं हाका मारतो. आम्ही कधीही आमची खरी नावं वापरल्याचं मला आठवत नाही. ती आहे ‘गून’ आणि मी आहे ‘हूट’.

आमचे नवरे एकमेकांना त्यांच्या खNया नावांनी नेहमी हाका मारतात. आमच्या डोक्यात अजिबात अक्कल नाही, अशा मुद्रेनं ते आमच्याकडे बघतात. विशेषत: माझ्या नवNयाचा या अपमानास्पद टोपण नावांमुळे गोंधळ उडतो; पण ते अपेक्षितच आहे. कारण त्याला बहीणच नाही.

तिचा नवरा मात्र वाटेतून बाजूला सरतो. आमच्या भेटल्यावरच्या मिठ्या आणि दूर जातानाचे अश्रू यांचा त्याला अर्थच कळत नाही. फक्त डोळ्यांनी बोलली जाणारी आमची भाषाही त्याला समजत नाही. एका कटाक्षानं, एका खुणेनं विंâवा गूढ शांततेनं व्यक्त होणारे प्रचंड अर्थ त्याला उमगत नाहीत; पण मला आश्चर्य
वाटत नाही. कारण तो काही बहीण नाहीय. 

आम्ही एकमेकींना आठवड्यातून तीन ते चार वेळा फोन करतो; पण आम्ही फार वेळा बोलत नाही कारण दुसरी घरी नसेल तेव्हाच फोन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही सांकेतिक वाटतील असे निरोप ठेवतो. हे खरंच, आम्हाला खूप बोलायचं नसतं. आम्हाला फक्त एकमेकींशी संपर्वâ साधून एकमेकींची आठवण येतेय एवढंच सांगायचं असतं. मी जर तुम्हाला म्हणाले, केव्हा फोनवरला निरोपाचा दिवा माझ्या बहिणीचा आहे, हे मी ओळखू शकते, तर तुम्हाला वाटेल माझं डोवंâ ठिकाणावर नाही; पण तुम्हाला बहीण असली तर तुम्ही समजू शकाल. आम्ही एकत्र प्रवास करायचा प्रयत्न करतो. अधूनमधून फक्त आम्ही दोघीच! 

संभाषणाला स्पष्टीकरणाची गरज लागत नाही, अशा संभाषणातून मिळणाNया विसाव्याची आम्हाला गरज भासते. त्यातील सुखद निश्चिती विवाहातील नात्याहूनही अधिक गाढ असते. ती माझं उजवं अंग आहे. मी तिचं डावं. मला वाटतं, तुम्हाला बहीण असेल, तर मी काय म्हणतेय ते तुम्हाला कळेल. आता तुम्ही मला जायची परवानगी द्या, कारण मला फोन ऐवूâ येतोय. मी खात्रीनं सांगतेय, तो कुणाचा आहे ते मी ओळखलं आहे! 

– अ‍ॅन मरी रोलंड

No comments:

Post a Comment