Monday 11 November 2013

चिकन सूप फॉर द कपल्स सोल

तुझ्या प्रेमाचा भुकेला

१९४२ मधला हिवाळा. बाहेर भयंकर थंडी पडलीय. पण इथे नाझीच्या छळ छावणीतला दिवस मात्र  जच्यासारखाच उगवला आहे. मी कुडकुडत उभा आहे. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्यात. दु:स्वप्न वाटावं असं जे काही घडतंय त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. माझं वय ते काय, मित्रांबरोबर हुंदडणं, शाळेत जाणं हे माझं जीवन असायला हवं वास्तविक. डोळ्यांत भविष्याची स्वप्नं असावीत. मोठा होईन, लग्न करीन, स्वत:चं असं कुटुंब असावं, पण ही स्वप्नं असतात जिवंत माणसासाठी! आणि मी त्यापैकी उरलेलोच नाही आहे. लाखो-करोडो ज्यूंबरोबर मलाही घरातून पळवून आणून या छळ छावणीत टाकलं आहे. तेव्हापासून मी अर्धमेल्या अवस्थेत मिनिटं, तास, दिवस मोजत आयुष्य ढकलतो आहे. कसाबसा का होईना जिवंत आहे इतवंâच! पण उद्याचा सूर्य आपल्याला दिसेल का? का आजच रात्री आपली गॅस चेंबरकडे रवानगी होईल?

स्वप्नं पडतात मला ती अशी!

कृश झालेल्या शरीराला थोडी ऊब मिळावी म्हणून मी काटेरी तारेच्या वुंâपणाजवळून पेâNया मारतो आहे. मरणाची भूक लागली आहे. पण ही भूक अशीच तर लागलेली आहे. आठवतही नाही किती दिवसांपासून लागलेली आहे ते! खाण्याचे पदार्थ–अन्न म्हणजे आता निव्वळ स्वप्न वाटायला लागलं आहे!

दरदिवशी जसे जसे आमच्यापैकी काहीजण दिसेनासे होतात, तेव्हा तर माझ्या सुखाच्या भूतकाळावरचाही विश्वास उडतो. तेही स्वप्नच वाटायला लागते आणि मग मी निराशेच्या खोल गर्तेत आणखी आणखी रुतत जातो! 

अचानक काटेरी तारेच्या वुंâपणापलीकडे एक मुलगी मला दिसली. मला पाहून तीही थांबली. माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं, की ती जणू म्हणतेय, ‘मला समजतंय सगळं. तुला इथे कशासाठी डांबलंय मलाही काही आकलन होत नाही आहे.’ मी तिची नजर चुकवायचा प्रयत्न केला. अशा फाटक्या कपड्यांच्या अवतारात मला शरमल्यासारखं वाटलं, पण तरीही तिच्यावरून नजर हटेना.

तिने खिशात हात घालून एक सफरचंद काढलं. ताजं, रसरशीत लाल सफरचंद! किती दिवस झाले असं सफरचंद पाहून! तिने डावीकडे-उजवीकडे सावधपणे पाहिलं आणि सुटकेचं हसू हसून, वुंâपणावरून ते सफरचंद माझ्याकडे पेâकलं. मी ते उचलायला अक्षरश: धावलोच. माझ्या थरथरत्या, गोठलेल्या बोटांनी ते कसंबसं उचललं. पोटातली भूक तर खवळलीच, पण माझ्या मरणपंथाला लागलेल्या आयुष्यात अचानक हाती आलेलं ते ताजं, रसरशीत सफरचंद म्हणजे मला जीवनाची, प्रेमाची अभिव्यक्ती वाटली! मी त्या मुलीकडे पाहिलं, तर ती पळून गेली होती. 

दुसNया दिवशी मला राहवलंच नाही. कालच्याच वेळी कालच्याच ठिकाणी वुंâपणाजवळ माझे पाय वळलेच. ती पुन्हा आजही येईल? माझी आशा वेडी तर नाही! निष्फळ तर ठरणार नाही. पण माझ्या या परिस्थितीत मला कोणताही एखादा छोटासा अंधुकसा आशेचा किरण पुरेसा होता आणि तिने मला तो दाखवला होता – तो मी घट्ट धरून ठेवणार होतो.

...आणि – ती आली! एवढंच नाही तर तिनं तसंच छानसं सफरचंदही बरोबर आणलं होतं – तसंच गोडसं हसून तिनं ते माझ्याकडे पेâकलं. 

आज मी ते अचूक झेललं आणि हात वर करून तिला ते दाखवलंही. तिच्या डोळ्यांत एकदम चमक उमटली. काय होतं त्यात? माझ्याबद्दलची दया! असेलही! असू दे, इथे कोणाला फिकीर आहे. मला आनंद आहे तो केवळ तिच्याकडे पाहण्याचा आणि मला आज जाणवलं एकदम – कित्येक दिवसांनी आज माझ्या हृदयात काही भावना तरी उमटली होती निदान! हेही नसे थोडके! मग हे रोजचंच झालं. तब्बल सात महिने आम्ही अशा प्रकाराने भेटत होतो. 

कधीकधी दोन-चार शब्दांची देवाण-घेवाण व्हायची, कधी फक्त सफरचंद! पण मला वाटतं, केवळ मला पोटाला काहीतरी खाऊ घालणं एवढंच ती करत नव्हती, तर देवदूताप्रमाणे मला भेटलेली ती माझ्या आत्म्याची भूक भागवत होती आणि मला का कोण जाणे खात्री वाटत होती, की तिचीही तीच भावना होती. तिलाही अपार समाधान मिळत होतं या भेटीतून. 

एक दिवस ती भयंकर बातमी माझ्या कानावर आली. आमची रवानगी दुसNया छळ छावणीत होणार होती. इथून जायचं? म्हणजे संपलंच सगळं! माझ्या दृष्टीने आणि माझ्या मैत्रिणीच्या दृष्टीनंही सगळं संपणार होतं.
दुसNया दिवशी तिच्याशी बोलताना माझं मन पार मोडून मोडून पडलं होतं. मला धड बोलताही येत नव्हतं. मी तिला कसंबसं सांगितलं– ‘उद्या माझ्यासाठी सफरचंद आणू नकोस! आम्हाला दुसNया छावणीत पाठवणार आहेत. आपली भेट आता संपली, पुन्हा कधीच भेटणार नाही आपण’ एवढं बोलून मी तिच्याकडे पाठ फिरवली आणि वुंâपणापासून पळत सुटलो, कारण तोपर्यंत माझ्या मनावरचा ताबा पूर्णपणे सुटला होता. मागे वळून पाहायची तर माझी हिंमतच नव्हती. माझ्या गालांवरून ओघळणारे अश्रू तिने पाहावे असं मला वाटत नव्हतं.
महिनोन् महिने नव्या छळ छावणीत. पुन्हा ते आणि तेच टेन्शन. तेच आयुष्य. पण या मैत्रिणीची आठवण यावेळी माझ्यासोबत होती आणि त्या बळावर मला दु:ख, दहशत, निराशा सगळ्यांवर मात करता आली. मनाच्या पटलावर सतत तिचा चेहरा, तिचे दयाद्र्र डोळे असायचे आणि जिभेवर रेंगाळायची सफरचंदाची चव!

...आणि एक दिवस ध्यानीमनी नसताना हे दु:स्वप्न संपलं! युद्धविराम झाला होता. छळ छावण्यांचं अस्तित्वच संपलं होतं आणि आमच्यासारखे सुदैवानं अजूनही जिवंत होते ते स्वतंत्र झाले. मी स्वतंत्र झालो खरा, पण माझ्या कुटुंबासकट माझ्याकडची प्रत्येक मोलाची गोष्ट हरवली होती. पूर्णपणे लुटला गेलेला एकाकी, एकटा असा मी ‘स्वतंत्र’ दुनियेत भिरकावला गेलो. पण एकटा का म्हणून? तिची स्मृती अजूनही माझी सावलीसारखी साथ करत होती. त्याच एका प्रेमाच्या धाग्याच्या आधारानं अमेरिकेला जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्याची उभारी दिली.

होता होता १९५७ साल उजाडलं. आता मी न्यूयॉर्वâ शहरात स्थिरावलो आहे. एक मित्र माझ्या मागे लागला आहे – त्याच्या ओळखीच्या ध्Eाीबरोबर मी डेटला जावं म्हणून! नाराजीनं का होईना अखेर मी तयार झालो. तिचं नाव रोमा. ती खूप चांगली आहे असं मित्राने सांगितलं होतं. मग मी विचार केला, ‘शिवाय तीही माझ्यासारखी स्थलांतरित आहे.’ निदान ही एक गोष्ट तरी आमच्यात समान आहे. हरकत नाही.

‘‘युद्धाच्या दिवसांत तू कुठे होतास?’’ रोमाने मला विचारलं. एक निर्वासित दुसNयाला ज्या हळुवारपणे हा प्रश्न विचारतो तोच हळुवारपणा तिच्या स्वरात होता.

‘‘मी जर्मनीतल्या छळ छावणीत होतो.’’ मी उत्तर दिलं.

कुठलीतरी गोड, तरीही वेदनामयी गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाव रोमाच्या डोळ्यांत उमटला.

‘‘काय झालं?’’ मी विचारलं.

‘‘हर्मन! माझ्या गत आयुष्यातली कुठली तरी आठवण मला येतेय. ते स्पष्टपणे आठवण्याचा मी प्रयत्न करत आहे.’’ अचानक तिचा आवाज भावुक झाला. ‘‘मी अगदी लहान होते ना, तेव्हा आम्ही एका छळ छावणीच्या शेजारीच राहायचो. त्या छळ छावणीत एक मुलगा वैâदी म्हणून होता. त्याला मी बराच काळ रोज भेटत असे. मला आठवतंय, मी रोज त्याला एक सफरचंद नेऊन द्यायची. मी वुंâपणाअलीकडून सफरचंद पेâकलं, की त्याला इतका आनंद व्हायचा म्हणून सांगू!’’

रोमाने एक खोल नि:श्वास सोडला आणि पुढे सांगू लागली. ‘‘त्या काळात आम्हाला एकमेकांविषयी नक्की काय वाटत होतं, ते सांगणं खरंच अवघड आहे. कारण तसे आम्ही दोघंही फारच लहान होतो आणि एखाददुसरा शब्द जेमतेम एकमेकांशी, तेही कधीतरी शक्य झालं तर बोलायचो. बस – पण तरीही मी आता सांगू शकते ते खरोखर प्रेमच होतं. लाखो माणसं मारली गेली त्यातच तोही बहुतेक मारला गेला असावा असं वाटतं, पण ही कल्पनाच मला सहन होत नाही आणि म्हणून मग आम्हाला जो काही वेळ एकमेकांबरोबर मिळाला, त्या
वेळेचाच विचार मी करत राहते.’’

माझं हृदय इतक्या जोरजोरात धडधडायला लागलं, की मला वाटलं आता पुâटतं बहुतेक! मी सरळ रोमाच्या डोळ्यांत पाहात विचारलं, ‘‘आणि त्या मुलाने एक दिवस तुला सांगितलं का, की उद्यापासून तू माझ्यासाठी सफरचंद आणू नकोस. आम्हाला दुसNया छावणीत पाठवणार आहेत म्हणून?’’ 

‘‘हं... हं... हो, पण हर्मन, तुला हे सगळं कसं काय माहीत?’’ रोमाचा आवाज अक्षरश: कापत होता.

मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि उत्तरलो, ‘‘कारण तो मुलगा मीच होतो रोमा!’’

रोमा अवाक, स्तब्धच झाली एकदम! कितीतरी वेळ असाच शांततेत गेला. आम्ही एकमेकांच्या नजरेत नजर गुंतवून नुसते बघत होतो – काही सुचतही नव्हतं. हळूहळू भानावर आलो. तेव्हा मात्र एकमेकांच्या आत्म्याची ओळख पटल्यासारखं वाटलं – एकेकाळचे जिवलग मित्र आम्ही – जे प्रेम कधी संपलच नव्हतं, जी आठवण कधी पुसलीच नव्हती अशा मैत्रीची, प्रीतीची ओळख आम्हाला आज मनोमन पटली!

शेवटी मीच पुढाकार घेतला. ‘‘हे बघ रोमा, एकदा आपली ताटातूट झाली; पण मला तुला गमवायचं नाहीये. आता मी स्वतंत्र आहे. तुझ्याबरोबरच कायमचं राहायची इच्छा आहे. लग्न करशील माझ्याशी?’’

लहानपणी तिच्या डोळ्यांत जी चमक मला दिसायची तीच चमक पुन्हा डोळ्यांत उमटलेली दिसली. ‘हो, तुझ्याशी मी लग्न करीन’ असं म्हणताच मी अनावर ओढीनं तिला मिठीत घेतली. कितीतरी काळापासून या मिठीची आम्हाला ओढ होती. पण मधे ते ‘काटेरी तारेचं वुंâपण’ होतं. आता कशाचीच आडकाठी राहिलेली नव्हती!

रोमा पुन्हा भेटली त्याला आता जवळजवळ चाळीस वर्षं होऊन गेली आहेत. नियतीनं युद्धाच्या काळात आम्हाला एकत्र आणलं होतं. एक आश्वासन देण्यासाठी आणि आता पुन्हा नियतीनंच आमची पुनर्भेट घडवून आणली. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी!

१९९६च्या व्हॅलेंटाईन डेला मी रोमाला ऑपेरा विनप्रेâ शोला नेलं. दूरदर्शनच्या राष्ट्रीय पडद्यावर तिचा सन्मान करण्यासाठी!

देशातल्या लाखो-करोडो लोकांच्या साक्षीनं मला तिला माझ्या हृदयातल्या भावना पोहोचवायच्या आहेत – ‘प्रिये, मी छळ छावणीत भुकेला असताना तू मला खायला घातलंस. आजही मी तसाच भुकेला आहे – ही भूक कधीच भागणारी नाही ग! तुझ्या, फक्त तुझ्या प्रेमाचा भुकेला मी!’
---
हर्मन आणि रोमा रोसेनब्लाट

No comments:

Post a Comment