Thursday 21 November 2013

डिसेप्शन पॉर्इंट

घटनामालिकेची नांदी

ती एक निर्जन जागा होती. जगण्यासाठी अनुवूâल असे तिथे काहीही नव्हते. टंड्राम
धील विस्तीर्ण, हिमाच्छादित व वनस्पतीविरहित असे जणू काही ते एक हिमााच्छादित वाळवंट होते. येथून पुढे उत्तर ध्रुवाभोवतालचा समुद्र सुरू होतो. तरीही तो प्रदेश भव्य होता, उदात्त भासत होता, मनावर छाप पाडणारा होता; पण ती भव्यता, उदात्तता व छाप ही हिंदाा होती, घातकी होती, जीवघेणी होती. अशा ओसाड जागी येणारा मृत्यू हा विविध स्वरूपात अवतीर्ण होतो.

पण तरीही मृत्यूच्या त्या हिंदाा छायेत एक माणूस सतत जाऊन येत होता. तो एक भूशाध्Eाज्ञ होता. जमीन, खडक, भूभर्ग इत्यादींचे जे शाध्Eा होते, त्यात तो निष्णात होता. त्या विस्तीर्ण भूभागाचा तो अभ्यास करीत आलेला होता. त्याच्यावर आता एक अत्यंत रानटी पद्धतीचा व अनैसर्गिक असा घाला पडणार होता. त्याला
त्याची कल्पना नसल्याने त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्याने साहजिकच तयारी केली नव्हती. त्याचे नाव चाल्र्स ब्रॉफी होते. 

अतिउत्तरेकडील त्या हिमाच्छादित प्रदेशात नेहमीप्रमाणे चाल्र्स ब्रॉफी संशोधनासाठी परत गेला होता. त्याच्याबरोबर संशोधनाची संवेदनशील साधनसामुग्री होती. एवूâण सामान वाहून नेण्यासाठी व प्रवासासाठी एक घसरगाडी त्याने बरोबर घेतली होती. बर्फाळ भूमीवरून ही घसरगाडी ओढत नेण्यासाठी चार कुत्री त्याला जोडली होती. त्या गाडीवरून त्याचा प्रवास चालू होता. अचानक त्या घसरगाडीचा वेग मंदावत जाऊन ती थांबली. चारही कुत्री आपली नाके आकाशाकडे करून वरती पाहू लागली होती.

ब्रॉफी त्या गाडीवरून खाली उतरला व आपल्या कुत्र्यांना उद्देशून म्हणाला, ‘‘काय भानगड आहे, बच्चे मंडळी?’’

आकाशात वादळी ढग जमू लागले होते. त्या ढगांपलीकडून एक ाqट्वन-रोटर जातीचे वाहतूक करणारे हेलिकॉप्टर प्रकट झाले. एका वर्तुळाकृती मार्गातून ते खाली खाली आले. जमिनीवरील बर्फाच्छादित उंचवट्याच्या जवळून जात ते सरळ ब्रॉफीकडे येऊ लागले. त्यातून त्या वैमानिकाचे लष्करी कौशल्य प्रकट होत होते. ही काहीतरी वेगळी व चमत्कारिक घटना आहे, असे त्या भूशाध्Eाज्ञाला वाटले. इतक्या दूरच्या उत्तरेकडच्या भागात हेलिकॉप्टर आलेले त्याने आजवर कधीही पाहिले नव्हते. त्याच्यापासून सुमारे दीडशे पुâटांवरती ते हेलिकॉप्टर जमिनीला टेकले. त्या वेळी तिथल्या जमिनीवरील सैल व बोचNया हिमकणांचा एक फवारा हेलिकॉप्टरभोवती उसळला. घसरगाडीच्या कुत्र्यांना त्यात धोक्याची जाणीव झाली. ते घशातल्या घशात गुरगुरत आवाज करू लागले. त्यांच्या चेहNयावरती अस्वस्थता प्रकट झाली होती.

हेलिकॉप्टरची दारे सरकवली गेली व त्यातून दोन माणसे बाहेर पडली. त्यांनी आपल्या अंगावरती थंडीपासून बचाव करणारे खास पोषाख नखशिखान्त चढवले होते. ते पोषाख पांढNया रंगाचे होते. त्या दोघांच्या हातात रायफली होत्या. अत्यंत घाईघाईने ते दोघे ब्रॉफीकडे येऊ लागले.

‘‘डॉ. ब्रॉफी?’’ जवळ आल्यावर त्यांच्यातील एकाने विचारले. 

‘‘तुम्हाला माझे नाव कसे ठाऊक आहे? अन् तुम्ही कोण आहात?’’

‘‘तुमच्याकडे असलेला तो वायरलेस सेट आधी बाहेर काढा, प्लीज.’’

‘‘माझ्या लक्षात येत नाही. कशासाठी तो सेट मी बाहेर काढू?’’

‘‘तुम्ही तो नुसता बाहेर काढा. अन् ताबडतोब.’’

चक्रावलेल्या ब्रॉफीने आपल्या कोटाच्या आतल्या खिशातून तो छोटा वायरलेस सेट बाहेर काढला.

‘‘तुमच्या या सेटवरून आम्हाला एक तातडीचा निरोप पाठवायचा आहे.

सेटची प्रिâक्वेन्सी कमी करून ती शंभर किलोहर्ट्झवरती ठेवा.’’

शंभर किलोहर्ट्झ? ब्रॉफी आता पुरता गोंधळून गेला. इतक्या कमी प्रिâक्वेन्सीवरती कोणालाच संदेश घेता येत नाहीत. त्याने विचारले, ‘‘कुठे काही अपघात झाला आहे काय?’’

त्यावर त्या दुसNया माणसाने आपली रायफल उचलली व सरळ ब्रॉफीच्या डोक्यावरती रोखली व म्हटले, ‘‘हे पहा, सगळा खुलासा करत बसायला वेळ नाही. 

आम्ही सांगतो तेवढेच करा.’’

थरथरणाNया ब्रॉफीने आपल्या सेटची प्रिâक्वेन्सी शंभर किलोहर्ट्झवरती आणून ठेवली.

मग पहिल्या माणसाने एक कागद ब्रॉफीच्या पुढे केला. ते एक कार्ड होते व त्यावरती काही ओळी टाईप केल्या होत्या. तो म्हणाला, ‘‘यावरचा मजवूâर ताबडतोब प्रक्षेपित करा.’’

ब्रॉफीने त्या कार्डकडे पहात म्हटले, ‘‘पण मला हे काय चालले आहे ते समजत नाही. शिवाय या कार्डवरची माहिती चुकीची आहे. मी असले कधी...’’

यावर त्या समोरच्या माणसाने आपल्या रायफलीची नळी ब्रॉफीच्या कपाळावरती दाबून धरली.

ब्रॉफीचा आता नाइलाज झाला. तो घाबरला. थरथरत्या आवाजात कार्डवरची चमत्कारिक माहिती वायरलेस सेटवरून तो प्रक्षेपित करू लागला. सर्व मजवूâर प्रक्षेपित केल्यावर तो पहिला माणूस म्हणाला, ‘‘छान! आता
तुम्ही, तुमची ही कुत्री व सारे सामान हेलिकॉप्टरमध्ये चढवा.’’ 

बंदुकीच्या धाकाखाली त्या भूशाध्Eाज्ञाला ते ऐकणे भागच होते. त्याने मुकाट्याने आपली नाखूष झालेली कुत्री आणि ती घसरगाडी गोळा केली व हेलिकॉप्टरपाशी नेली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात सामान ठेवण्याची जागा होती. तेथून एक धातूची फळी बाहेर तिरपी होऊन जमिनीला टेकली होती. त्या फळीच्या उतारावरून ती कुत्री घसरगाडीसह आत चढवली गेली. त्यांच्यामागोमाग ते तिघेजण आत गेले. ताबडतोब हेलिकॉप्टरने आपल्या फिरणाNया पंख्याची गती वाढवली व ते आकाशात चढू लागले व त्याने पश्चिमेचा रोख धरला. 

‘‘हू द हेल आर यू? तुम्ही कोण आहात?’’ 

ब्रॉफी आता चिडून त्यांना विचारीत होता. त्याच्या अंगावरती सर्वत्र घामाचे झरे पुâटले होते. त्या चमत्कारिक मजकुराचा अर्थ काय? कशासाठी तो पाठवावा लागला? हे प्रथम त्याच्या मनात राहून राहून उमटत होते.
त्याच्या प्रश्नावर ती दोन माणसे काहीही बोलली नाहीत. ती नुसती गप्प बसून राहिली.

जेव्हा त्या हेलिकॉप्टरने पुरेशी उंची गाठली तेव्हा उघड्या दारातून आतमध्ये घोंगावणारा वारा घुसू लागला. ती चारही कुत्री अजूनही त्या घसरगाडीला जखडलेली होती. त्यांना त्या वाNयाचा त्रास होऊ लागल्याने ती विव्हळण्याचा आवाज काढू लागली.

ते पाहून ब्रॉफीने त्यांना म्हटले, ‘‘निदान तेवढे दार तरी लावून घ्या. माझी कुत्री किती घाबरली आहेत ते दिसत नाही का?’’ 

तरीही ती दोन्ही माणसे गप्पच राहिली. त्यांनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

जेव्हा त्या हेलिकॉप्टरने ४००० पुâटांची उंची गाठली तेव्हा ते एका विशिष्ट भागाकडे जाऊ लागले. तिथे खाली बर्फाच्या दNया होत्या, बर्फाला मोठमोठे तडे गेले होते. रुंद भेगा पडल्या होत्या. हेलिकॉप्टर त्या भागावरून आता जाऊ लागले. अचानक ती दोन माणसे उठली, त्यांनी एक शब्दही न बोलता ती जड घसरगाडी
त्यावरच्या कुत्र्यांसह उचलली आणि उघड्या दारातून बाहेर टावूâन दिली. ब्रॉफी भयभीत होऊन ते दृश्य पहात होता. घसरगाडीला जखडलेली कुत्री खाली पडता पडताही सुटकेसाठी जिवाच्या आकांताने धडपडत होती. काही क्षणांतच ती घसरगाडी व कुत्री खालच्या हवेत अदृश्य होऊन गेली.

ब्रॉफी उठून उभा राहिला होता व तो विंâकाळी फोडण्याच्या बेतात होता. पण त्या दोघांनी मिळून त्याला धरले. घाबरलेल्या ब्रॉफीने आपल्या मुठी आवळून त्यांना ठोसे लगावण्याचा क्षीण प्रयत्न केला, पण त्या बलदंड माणसांपुढे त्याचे काहीही चालले नाही. भीतीने गोठून गेलेल्या ब्रॉफीला त्यांनी शांतपणे बाहेर पेâवूâन दिले.
ब्रॉफीच्या प्रतिकाराचा काहीही उपयोग झाला नाही. खाली सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या दNया व भेगा यांनी भरलेल्या गर्तेत तो कोसळू लागला. त्या भागात आजवर कधीही माणूस पोहोचला नव्हता व येथून पुढे पोहोचणार नव्हता. 

No comments:

Post a Comment