Thursday 21 March 2013

'दोस्ता'ला सलाम....!!!!!!!!

नुसत्या वाचनाने माणूस मोठा हॊत नाही. 
वाचलेल्या विचारांना स्वतः चे अनुभव 
जोडायचे असतात . 
म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीव होतं . 
करमणूक करवून घेतानाही स्वतः ला खर्ची 
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही . 
' साहित्य हे निव्वळ चुण्यासारखं असतं . 
त्यात आपल्या विचारांचा कात 
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही . 
आणि लेखकाला हवा असतो संवाद . 
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही . 

                                            --- वपुर्झा 



व. पु. अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे. गेली तब्बल पाच दशके या दोन शब्दांनी मराठी मनावर शब्दांचं जे गारुड केलं आहे ते आजही तसचं टिकून आहे किंबहुना वाढतच गेलं आहे.

व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या या अवलियाने साहित्यविश्वात शब्दांच्या ज्या अजोड कलाकृती निर्मिल्या त्या प्रत्येकवेळेस वाचकाला एका वेगळा अनुभव देऊन जातात. प्रत्येकवेळेस तेच पान, तेच पुस्तक पण मिळणारा अनुभवाचा गंध मात्र वसंतात फुटलेल्या नव्या पालवीप्रमाणे ताजा, कोरा, टवटवीत, मन प्रसन्न करणारा. ज्याच्या नावातच वसंत आहे अशा या  मुशाफिराने वाचकांच्या आयुष्यात नेहमीच आनंदाच्या, उत्साहाच्या रंगांची पखरण केली. जगण्याच तत्वज्ञान इतक्या साध्या सोप्या शब्दात उलगडून सांगितलं की वाचताना प्रत्येकाला 'जगण' म्हणजे 'महोत्सव' च आहे असं वाटावं.
व. पु. च साहित्य वाचताना नेहमीच वाटत राहत की पंचेन्द्रियाबरोबरच व. पुं ना एक कॅलिडोस्कोप मिळाला होता ज्यातून इतक विविधरंगी आयुष्य ते पाहत असत आणि शब्दाच्या कुंचल्याने कागदावर रेखाटत.

व. पु. आणि कथाकथन म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यांच्या कथा त्यांच्याच आवाजात ऐकण ही श्रोत्यांसाठी एक मोठी पर्वणीच असे. आपल्या कथाकथनाच्या यशाच रहस्य सांगताना ते म्हणतात कथाकथनात नाट्य हवं पण नाटक नको, अभिनय हवा पण अभिनेता नको स्मरण हवं पण पाठांतर नको. "पार्टनर", "सखी", "प्रेममयी" अशा अनेक रूपात व. पु. आपल्याला जागोजागी, क्षणोक्षणी भेटत राहतात. अशा या सर्व वाचकांच्या दोस्ताला त्यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त सलाम ! सलाम ! सलाम !


---
सानिका करंदीकर
मेहता पब्लिशिंग हाऊस

Friday 8 March 2013

Celebrating the Spirit of Being a Woman !!!!



She is WOMAN. She is Mother. Daughter. Wife. Sister. She is a Person. She is Strong, Smart, Crafty. She is Passionate, Courageous, Generous. Cooking barefoot is only one of several superpowers. She is Action, Emotion, Devotion.

She has Hope, Beauty, Power. She has a Brain and she knows how to use it. She Gives You LIFE. She gives you RESPECT, LOVE, GRATITUDE. She believes in you. She will nurture you, fight for 

you. And, she deserves nothing less from you.

A woman’s essence lies in her innate ability to care, love and sacrifice for the other. She plays an all-enveloping character of a mother, daughter, wife and sister as a friend, nurturer, guide and partner from time to time. Emotional and vulnerable, sometimes erratic, sometimes serene, she displays a wonderful range of emotions from being patient to being extremely courageous in times of crisis.

Tormented and subjugated throughout all times and ages, women have fought their way through exploitation, harassment, and have managed to secure their rights in the public domain. In spite of continuing exploitation and injustice against women both in the domestic and work sector today, several milestones have been achieved in terms of education, freedom of choice and liberty, equality etc.With growing literacy and financial independence women feel more empowered today to assert their right to a life of dignity and self worth.

The InternationalWomen's Day celebrated on 8th March is a universal day for all women around the world. It endows them with a sense of honour, dignity and self respect for being the person that they are. This day marks a celebration of the economic, social, cultural and political achievements made by women over the years.

The first International Women’s Day (IWD) was held because of a strike by women workers in New York in the textile industry in 1911.  What is interesting about celebrating IWD today is that it is just as relevant as it was 100 years ago. A lot of the issues remain the same when you take a look at the rights of women. Those women were on strike because of dreadful working conditions, low wages, and no security.  These issues sound familiar all over the world even today.


The UN theme for International Women's Day 2013 is “A promise is a promise: Time for action to end violence against women”, while International Women's Day 2013 has declared the year's theme as “The Gender Agenda: Gaining Momentum”.


In India, we’ve been celebrating International Women’s Day for many years. Marked by large rallies and marches in different towns and cities, over the years the day has taken on different aspects in different places.Many events have become more local, with groups concentrating on issues that are particular to their areas. But also, in several places, seminars and discussions, festivals of film and theatre have replaced rallies, and discussions on the Internet and in blogs have become an important arena for drawing attention to this day.

We have to think of the women’s struggle in the last 100 years, getting the vote, participation in politics and so on, not only the battles we have won but also the ongoing battles we have to struggle in order to win. I am convinced that the women of the world, united, can become a most powerful force for international peace. 

-----
Parul

Friday 1 March 2013

‘मारण्या’पेक्षा ‘वाढवू’ या!


मी माझ्या नुकताच परदेशात गेलेल्या मित्राशी चॅटिंग करत होतो.

तो - तुला एक गंमत सांगायचीये. इथल्या लोकांना आपल्याबद्दल फार आश्चर्य वाटतं अरे...

मी- का?

तो - कारण आपल्याला दोन किंवा तीन भाषा बर्‍यापैकी येत असतात याचं त्यांना भारी अप्रूप वाटतं.

मी – म्हणजे?


तो – ते म्हणतात की, इंग्रजी, अमेरिकन माणसाला इंग्रजीच येते, जर्मन-फ्रेंच लोकांना त्यांची-त्यांची भाषा. पण आपल्याला आपली मातृभाषा येतेच, हिंदीही जुजबी येते आणि आता इंग्रजीही कामापुरती का होईना, पण समजते. आता मलाच इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषा येतात, थोडीफार गुजरातीही मी जाणू शकतो, असं म्हटल्यावर माझ्या मल्टिलिंग्विलिटीने माझा परदेशी कलिग तर एकदम माझ्याकडे आदरानेच पाहू लागला!

मी - आणखीन म्हणजे एखादी बोलीभाषाही आपल्याला येत असते. म्हणजे मराठीचंच बोलायचं झालं तर कोकणातल्याला कोकणी, मालवणी येत असते, मराठवाड्यातल्याला मराठवाडी, विदर्भातल्याला वैदर्भीय, खानदेशातल्याला खानदेशी. अगदी मुंबई-पुण्याकडचीही किंवा कॉलेजकट्ट्यावरचीही!

आमचा संवाद सुरूच होता; पण माझ्या डोक्यातली विचारचक्र या गोष्टीने फिरू लागली, आणि तो दिवस होता जागतिक मराठी भाषेचा आणि त्यामुळे तर चाकांना अधिकच चालना मिळाली...

आजच्या या पोस्टमॉडर्न म्हणजे उत्तरआधुनिक जगात भाषेचा ती मरतेय, मेलीएअसा नकारात्मक विचार करायला हवा का? कारण जागतिकीकरणानंतर झालेल्या घुसळणीत हे सिद्ध झाले आहे की, इंग्रजी ही ग्लोबल – जागितक भाषा आहे, ती ज्ञानभाषा आहे हे आपण मान्य करणं भाग आहे. 

इंग्रजी शिकण्याने, त्यातील साहित्य, कला व इतर व्यवहार जाणून घेतल्याने आपल्या समजुतीच्या, जाणिवांच्या कक्षा रुंदावण्यास, वाढण्यास मदत होते. (खरंतर हे कोणत्याही नव्या भाषेशी, संस्कृतीशी संबंध आल्यावर होत असतं. जागतिकीकरणामुळे संपर्क साधण्याची साधनं वाढल्याने ही देवाणघेवाणाची प्रक्रिया वेगाने होतेय.) या तंत्रज्ञानाच्या युगात तर इंग्रजी ही कळीची भाषा आहे. मग अशा वेळेला तिच्यातून मिळणारा नव्या जाणिवांचा, विस्तारित दृष्टिकोन आपण मराठीत आणायला हवा.

मी स्वतः भाषाशास्त्र शिकलो आहे. भाषा ही सरकार किंवा कोणतीही संस्था घडवीत नसते, तर लोक घडवीत असतात व ही अतिशय सूप्तपणे सतत चालत असलेली प्रक्रिया असते. साधं उदाहरण घ्यायचं, तर ज्ञानेश्वरांची भाषा मराठीच असली तरी ती आज आपल्याला कळत नाही, त्यासाठी त्या-त्या शब्दांचे अर्थ व सटीप स्पष्टीकरण वाचावे लागते. ती भाषा मराठीच असली तरी आज ती आपल्याला संपूर्ण कळत नाही. इंग्रजी वाढण्यामागे महत्त्वाचे कारण असे की, त्यांनी विविध भाषांमधले शब्द आपल्या भाषेत घेतले, इतर भाषांना दिले. इतकंच काय तर जागतिक श्रेष्ठ दर्जाचे साहित्य हे इंग्रजीत अनुवादित होत असते व इंग्रजीनेही ते इंग्रजी साहित्य म्हणून समाविष्ट करून घेतले आहे.

मग अशा वेळी, संपर्काच्या आजच्या जगात बोलीभाषांकडे अशुद्धतेचा चष्मा घालून पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे भाषेची प्रयोगशाळा म्हणू पाहायला हवे. भाषेचा प्रवाह वाहता राहिला, तरच तो टिकतो अथवा त्याचे डबके होते. बोलीभाषा ही प्रमाणभाषेच्या प्रवाहातला अंतःस्थ;  पण जिवंत, रसरशीत प्रवाह असतो. बोली तसेच इतर भाषांच्या शब्दांच्या देवाणघेवाणातून हे प्रवाह वाहते राहतात.

एक गंमत अशी की, इंग्रजीतून प्राप्त झालेले ज्ञान किंवा माहितीच्या मराठी लिहिण्याची सॉफ्टवेअर्स तयार झाली आहेत. आणि त्यातून आता फेसबुक, ट्विटरपासून अन्ड्रॉइडसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक जण मनसोक्तपणे मराठी भाषा सहज वापरताहेत! किंवा मराठीत ई-बुक तयार होतातहेत आणि जगात कुठेही लोक ती डाउनलोड करून वाचू शकत आहेत! हे इंग्रजी किंवा जागतिक संपर्कामुळे, देवाणघेवाणीनेच घडले आहे हे लक्षात घ्यायला हवे.

मी स्वतः एका प्रकाशनसंस्थेत संपादक आहे. प्रकाशन व्यवसाय हा इंग्रजीतून आपल्याकडे आला आणि संपादक हे पद निर्माण झालं व त्यामुळे आज माझा चरितार्थ सुरू आहे. आणि म्हणून मी मराठीत काही काम करू शकतोय. म्हणजे मराठी मरतेय असं म्हणण्यापेक्षा तिला व्यावसायिक, सामाजिक, साहित्य अशा विविध क्षेत्रांत एक्स्पोजर दिलं पाहिजे. मराठीतून कथा-कादंबर्‍या-कोश-ग्रंथ-वैज्ञानिक असं सगळ्या प्रकारचं लिखाण, व्यवहार जास्तीत जास्त झाले पाहिजेत.

म्हणजेच इतर कोणत्याही भाषांबद्दल अढी, नकारात्मक भावना न बाळगता जास्तीत जास्त लवचीक राहून काम – वर उल्लेखलेल्या प्रत्यक्ष कृती केल्या पाहिजेत. कारण मोडेन पण वाकणार नाहीपेक्षा, लवचीकतेने टिकून राहता येते आणि सर्व्हाव्हल – टिकेल तो जगेल हा निसर्गाचा नियम आहे.
म्हणजे मरून जाण्यापेक्षा जगून राहून काम करणे, ही माझी पसंती आहे.  

आणि तुमची?

;-) J J



प्रणव 
मेहता पब्लिशिंग हाऊस