Monday, 27 July 2015

वारी- व्यंकटेश माडगूळकर 

आता अर्जुना थकला होता. आता त्याचे भरत आले होते, हे त्याचे त्याला उमगले होते आणि त्यामुळेच त्याला उदास-उदास वाटत होते. प्रपंचाच्या उसाभरीतून तो आता अलग होऊ पाहत होता. घरात काय आहे, काय नाही याची चौकशी करीत नव्हता. म्हातारपणी आपली आबाळ होते म्हणून कुणापाशी कधी कुरकुरत नव्हता. फारसाकुणाशी कधी बोलतही नव्हता. घराच्या एखाद्याअंधाऱ्या  कोपऱ्यात हातपाय आखडून विचार करीत बसत होता. सून देईल ते खात होता आणि मुक्यानेच नातवंडांच्या पाठीवरून हात फिरवीत होता.अर्जुनाचा लेक आणि सून ही भली पोरे होती. म्हाताऱ्याला त्यांनी कधी हिडीस-फिडीस केले नाही. आपल्या परीने ती त्याला सुखच देत होती, जपत होती. पण अर्जुना उदासच होता. या प्रपंचात पोराबाळांच्या धबडग्यात त्याचा जीव आता रमत नव्हता. त्याला कसनुसे वाटत होते. काळजात कालवाकालव होत होती. या मायाजाळातून तो आता निसटू पाहत होता. पोटासाठी हयातभर कष्ट केले. हा टिचभर डबरा भरण्यासाठी नाना भानगडी केल्या, चहाड्या केल्या, लबाड्या केल्या, निंदा केली. मतलब साधण्यासाठी चांगल्याला वाईट म्हटले, वाईटाला चांगले ठरविले, अशी जाणीव होऊनअर्जुनाला कसनुसे वाटत होते. त्याच्या काळजाची कालवाकालव होत होती. आता बसता-उठता तो ‘हरी-हरी’ म्हणे. देवळात हरिविजयाचे वाचन चालू होते. दिवस मावळताच दोन घासपोटात ढकलून आणि कांबळे पांघरूण देवळापुढच्या धुरळ्यात अर्जुना बसे. ध्यान देऊन पोथी ऐके. मास्तरने सांगितलेला अर्थ त्याला पटे. हा नरदेह केवळ मातीचे मडके; त्याला जपण्यात, शृंगारण्यात काहीच फायदा नाही. हा संसारही मिथ्या आहे;त्याच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवू नये. सर्वांत एक हरिनाम सत्य आहे आणि त्याच्यावाचून गती नाही, हे पोथी वाचणाऱ्या मास्तराचे बोल अर्जुनाच्या मनाला पटले होते. एकटादुकटाच बसून तो हरिनाम गाई.‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’, हा ज्ञानुबारायाचा अभंग म्हणता म्हणता उन्मळून येई. सुरकुतल्या गालांवरून पाण्याचे ओघळ ओसंडत. आता एकदा पंढरीला जावे, चंद्रभागेत हा बरबटलेला देह बुचकळावा,संतांचे चरण धरावेत. मन तृप्त होईपर्यंत टाळ-मृदंगांचा गजर ऐकावा. पांडुरंगाचे नाव ऐकावे. मंगळवेढ्याच्या कुसवाखाली दडपून ज्याला हरीने आपल्या पायापाशी नेले, त्या चोखाची समाधी पाहावी. ‘पाषाण करी पायरीच्या मिषे। तुझ्या द्वारी वसेऐसे करी।’ असे बोललेला तो नामा ज्या पायरीखाली झोपला आहे, त्या पायरीवर तुळशीमाळा वाहाव्यात. लोटांगण घेत जावे आणि सुंदर ते ध्यान डोळ्यांनी पाहावे. त्या सावळ्या श्रीमूर्तीच्या पायांवर डोके ठेवावे. रंगशिळेवर नाचावे आणि राऊळात उभे राहून विठ्ठलनामाचा गजर अहोरात्र करावा, असे त्याला वाटत होते. म्हणून नेट धरून तो एका रात्री लेकापाशी बोलला, ‘‘अरं, मी पंढरीला जातू. मला एकबार देवदर्सन घ्यावं वाटतंया!’’
लेक नुकताच गावातून तुकडे मागून आला होता. पागुटे काढून भुईवर बसला होता. त्याचा लहानगा पोरगा त्याच्या मिशा ओढीत होता. बापाचे हे बोलणे ऐकताच पोराला मांडीवर ओढून त्याचा मुका घेत तो म्हणाला, ‘‘ह्यो थकिस्त जीव घिऊनकसा जाशील? तुझ्यानं वाटचाल व्हनार न्हाई!’’सून तान्हे पोर पाजीत होती. ती म्हणाली, ‘‘अवं, अगुदर तरी बोलायचं.आपल्या गावची समदी वारकरीमंडळी गेली. आता सोबत कुनाची? एकलं कसंजाल?’’
अर्जुनाला नीट ऐकू  आले नाही. कानाला हात लावून तो लेकापाशी सरकला आणि म्हणाला, ‘‘का म्हनालास पोरा?’’
मग लेकाने आवाज चढवला. म्हाताऱ्याच्या कानापाशी तोंड नेऊन तो ओरडला,‘‘वारकरी मानसं कवाच गेली. तुला सोबत कुनाची? आन् आता थकलास. बाराकोसाची वाटचाल तुझ्यानं व्हनार कशी?’’
सून बोलली, ‘‘आन् वारीच्या दिवसांत मायंदाळ गर्दी आसती, रोगराई आसती.अंमलदार धरून टोचत्याल. दंडात सुई खुपसत्याल. म्हाताऱ्याचा निबाव न्हाई लागनार ततं!’’
भुईशी हात टेकून लेकाकडे बघत अर्जुनाने उत्तर दिले, ‘‘आरं, जाईनबसत-उठत. इटुबा दील माज्या पायात बळ!’’त्यावर सून बोलली, ‘‘हं, इटुबा देतुया ताकद! वाटंतच परान जाईल – कायतरीच म्हाताऱ्याचं!’’
मग अर्जुना खाली बघत उगाच बसला. लेकाला वाईट वाटले. बायकोवर डोळे वटारून तो बापाला म्हणाला, ‘‘जा, तुजी विच्या आसली तर. पन चालत नगंजाऊस, मोटारीनं जा!’’अर्जुनाने डोळे मिटून मान हलवली, ‘‘आरं, मोटारीनं जानं खरं न्हवं. आपनकुटं इकतं तालेवार हाय? मोटारीसाटनं पैका खर्ची घालनं खरं न्हवं!’’त्यावर कुणी बोलले नाही. सून बोलली नाही, लेक पोराच्या कानात कुर्रर्रकरून त्याला हसवू लागला. पोरगा खिदळून तंगड्या झाडू लागला तशी सूनही कौतुकाने त्याच्याकडे बघत राहिली.मग अर्जुना अंगावरची चिरगुटे गोळा करून कोपऱ्यात सरकत बोलला, ‘‘बगा,माज्या मनाला वाटतंय. तुमची मर्जी नसली तर ऱ्हायल. बसतू बापडा गप्!’’ आणि कोपऱ्यात पाय आखडून बसलाही. मग लेक कष्टी झाला. म्हातारपणी आपल्या बापाची इच्छा आपण पुरविली नाही, तर त्याचा आत्मा हळहळेल म्हणून त्याला अवघड वाटले. तो बायकोला म्हणाला, ‘‘अगं, जाऊ दे त्येला. म्हातारपनी देवाधर्माची सई लई हुती. त्येचं मन आता परपंचात न्हाई. सरत्या काळात त्याला देवाला भेटू दे!’’नवऱ्याचा दुजोरा आला तशी तिला बोलणे प्राप्त झाले, ‘‘जाईनात बापडं! मी कुटं नगं म्हनतीया? आन् आता म्हनं देवळंबी आपल्या लोकास्नी उघडी झाल्याती.थेट इटुबाच्या पायांवर डोस्क  टेकाया मिळतंया म्हनं!’’बायकोचा दुजोरा मिळाला तसा लेक बापाच्या कानात ओरडला, ‘‘जा रं तू!आमची ना न्हाई. वारीचंच दीस हैती. कुनाचीबी सोबत मिळंल. वारकऱ्याची रीघ लागली आसंल वाटेनं!’’
‘‘जा तुमी मामाजी, आपल्या हतलं कैक जन देवदर्शन घिऊन आलं म्हनं.’’
‘‘व्हय, व्हय. त्यो तुका म्हार पाक आत जाऊन देवाच्या पायावर डोस्क  टेकून आला. या गांधीबाबांच्या राज्यात इटाळचंडाळ पाक गेला. त्या पुण्यवान बाबानं आमा लोकांस्नी देव दावला. पयलं आमा लोकांची सावली दिकून कुनी अंगावर घेत न्हवतं. रस्त्यावर थुकायची दिकून बंदी! गळ्यात लोटक बांधून त्यात थुकायचं. त्योकाळ पाक गेला. महार लोकांचा वनवास चुकला.’’
‘‘व्हय, चुकला! तुमी जामामाजी, इटुबाराया बगून या.’’लेक आणि सून यांनी असे बोलताच अर्जुना हरकला. तुका म्हारावाणी आपल्यालाही देवाच्या पायावर डोक  ठेवायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला.लेकाच्या चांगुलपणामुळे गहिवरल्यागत झाले. मग त्याने नातवाला आपल्यापाशी ओढून घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. आज्याच्या मिशांचे आणि वाढलेल्यादाढीचे केस रुतू लागले, तेव्हा नातू गाल चोळू लागला.मग म्हाताऱ्याची वारीला जाण्याची तयारी झाली. सुनेने सासऱ्याच्या अंगावरची धडुती सवळेच्या मातीने खळणी केली. लेकाने बापाचा फाटका जोडा चांभाराकडून शिवून आणला. सुनेने व्हंढीच्या आठ-दहा जाड भाकरी केल्या. त्याच्यामध्ये मिरची-कांदा घालून शिदोरी बांधली. पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून, कमरेला धोतर गुंडाळून अर्जुना पंढरीला जाण्यास निघाला. लेकाने त्याला आठ-चार आणे खर्चायला दिले.
वरचेवर ‘येतू रं’, ‘येतू रं’, करीत तो घरातच घुटमळू लागला. मन कितीही विटले तरी हे असेच आहे. अर्जुनाचा पाय लवकर घरातून निघेना. मग धाकला नातू आला आणि धोतराला लोंबकळीत म्हणाला, ‘‘आमाला डाळं, चिरमुरं, बत्तासं आन बरं का!’’म्हातारा म्हणाला, ‘‘व्हय, आनीन माज्या लेकराला!’’आणि पुन्हा लेक आणि सून यांना बोलला, ‘‘जातू मी. ह्याला नीट बगा, मी लगी म्हागारी येतूच.’’
त्यावर सून बोलली, ‘‘बरं, निगा आता. उनाच्या आत जेवडी वाटचाल हुईलतेवडी बरी!’’
आणि अर्जुना निघाला पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून. काथ्याने बांधलेला जोडा ओढीत गावाबाहेर पडला. लेक वेशीपर्यंत घालवत आला होता, त्याला म्हणाला, ‘‘अरं, तू फीर आता म्हागारी. नगू तकाटा घिऊस!’’
‘‘संबाळून जा. भाकरी लई वाळल्या, चावन्यासारक्या न्हाई ऱ्हायल्या, तर व्हटेलातनं काय तरी घिऊन खा पोटाला. पैशे देऊ का आजून?’’
‘‘नगं, नगं, हायतं की माज्यापाशी.’’मग लेक माघारी फिरला आणि म्हातारा चालू लागला. अर्जुना महार पंढरीच्या वाटेला लागला. कधी सडकेने तर कधी पाऊलवाटेने चालावे; थकल्यासारखे वाटल्यास एखादे झाड बघून त्याच्या सावलीखाली घडीभर विसावा घ्यावा आणि पुन्हा वाट धरावी. वाटसरूशी चार गोष्टी करीत रस्ता लवकर तोडावा. रात्र झाली तर गाव गाठून धर्मशाळेत गबाळे टावूâन भाकर खावी आणि घोंगडे अंथरून त्यावरपडावे. पहाटे चांदणी उगवताच उठून पुन्हा चालू लागावे. असे करीत अर्जुनानेमजल मारली आणि सकाळच्या प्रहरी तो त्या पुण्यनगरीत पोचला.
‘धन्य ही पंढरी... सुखाची मांदूस!’
या पंढरीत आजवर किती संत आले, गेले... किती जणांचे पाय इथे लागले!तो योगियांचा राजा ज्ञानदेव, तो त्याचा परात्पर गुरू निवृत्ती, तो सोपान, ती मुक्ताबाई, तो भोळा नामा आणि त्याची दासी जनी, देहूचा वेडा, तो अरभेंडीचा माळी, तेरढोकीचा कुंभार आणि तो चोखा महार! धन्य-धन्य ही पंढरी! संत म्हणतात, ‘जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।’ या पंढरीत पोचताच अर्जुनाचाशीण पार उतरला. चंद्रभागा दिसताच त्याने दोन्ही हात जोडले, ‘‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल!’’चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांचा मेळा जमला होता. अपार भक्तगण जमला होता. बायाबापड्या, उचनीच, लहानथोर – सारे चंद्रभागेच्या निर्मळ जलात वासनेची पातके प्रभाळीत होते. ‘‘हरि हो! हरि हो!’’ म्हणून बुड्या घेत होते. हे दृश्य बघूनअर्जुना कावराबावरा झाला. गोंधळून गेला. वाळूत पाय रुतवून उगाच हा सोहळाबघत राहिला. मग एकाएकी त्याला वाटले, या गर्दीत घुसून आपणही पुढे व्हावेआणि या गंगेत बुडी घ्यावी. पावन व्हावे, निर्मळ व्हावे आणि त्या भरात पाठीवरचेगबाळे सावरीत त्याने पाऊलही उचलले. धारेच्या रोखाने तो सणाट्याने निघाला. पण..

You can purchase this book online. Visit- http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Vari/373.aspx

Thursday, 23 July 2015

मामा भुर्रर्रर्र...  

एक जावईबुवा होते. दिसायला मोठे राजिंबडे. गोरेपान, सरळ नाकाचे आणि गुटगुटीत अंगाचे. पण डोक्याच्या नावाने आनंद होता.डोक्यात त्यांच्या काय भरले होते देव जाणे. कुणी म्हणत कांदे असावेत. कुणी म्हणत बटाटे असावेत. कुणी म्हणायचे गोलगोल गोटे असावेत नर्मदेतले. पण खरे सांगायचे म्हणजे त्यांचे डोके अगदी रिकामे होते. पोखरलेला नारळ असतो ना, तसे! किंवा  रिकामे खोकेच म्हणानात. असे हे बुवाजी गावात करीत तरी काय? काही नाही. दोन्ही वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करावा, खूप दूध प्यावे आणिगावातून भटकावे. ते दुपारीही झोपायचे आणि अंधार पडला की रात्रीही झोपायचे. 
जावईबुवा घरचे बरे होते. घरदार, शेतीवाडी चांगलीहोती. काही नाही केलं तरी दोन्ही वेळेला छान जेवायला
मिळायचे. कुठल्या सासऱ्याने त्यांना मुलगी दिली कोण जाणे! पण जावईबुवांचे एकदाचे लग्न झाले आणि ते `जावईबुवा' बनले.
चारसहा महिने गेले.दिवाळी आली. सासऱ्यांनी  दिवाळसणासाठी आमंत्रण पाठवले. 
पत्रात लिहिले, ``दिवाळी यंदा आमच्याकडेच करावी अशी आमची इच्छा आहे. तरी सगळ्यांनी अवश्य यावे. आम्हाला फार आनंद होईल...''
हे पत्र वाचल्यावर जावईबुवा वडिलांना म्हणाले, ``यंदा आपल्या गावात दिवाळीला सरकारने बंदी केली काय, बाबा?''
वडील म्हणाले,``शतमूर्खा! अरे, असा या पत्राचा अर्थ नाही.''
``मग?''
``तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण देण्यासाठी त्यांना बोलावलं आहे, समजलं?''
जावईबुवांच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटल्यासारखा उजेड पडला. त्यांनी दोन्ही हातांनी चुटक्या वाजवल्या.
``हां हां! आता आलं लक्षात. म्हणजे दिवाळीत आपण पोस्टमनला बक्षीस देतो, मोलकरणीला देतो, पोस्त का काय म्हणतात तेच ना?तसंच मला पण पोस्त देणार आहेत काय आमचे सासरे? वा वा! मग फार मजा होईल. अजूनपर्यंत एकाही गाढवानं मला कधी पोस्त दिलं नाही बघा.''
वडील लालबुंद चेहरा करून खेकसले, ``हात मूर्खा! अरे, तू काय गडीमाणूस आहेस पोस्त घ्यायला? जावई आहेस जावई, समजलं?सासुरवाडी चांगली श्रीमंत आहे तुझी. सोन्याचं कडं, अंगठी, भिकबाळी असलं काहीतरी देतील तुला सासरे. आणखीन तुला काही पाहिजे असलं तर माग की लेका. रुसून बस. म्हणजे सगळं मिळतंय बघ. मी सांगतो तसं करायचं. आपली अक्कल चालवायची नाही.''
जावईबुवांनी डोळे मिटून घेतले. क्षणभर विचार केला. मग मान हलवून ते म्हणाले,``बराय, आपल्याला काय? तुम्ही सांगाल तसं करतो.''झाले. जावईबुवांचे सासुरवाडीला जायचे नक्की ठरले. वडिलांनी सूनबार्इंना अगोदरच पाठवून दिले. जावईबुवांची जाण्याची सगळी तयारी केली. चारदोन नवे कपडे शिवले. फराळाचे सामान दिले.जावईबुवांचे घर खेड्यात. सासुरवाडीही खेड्यातच. जायला मोटार नव्हती, काही नव्हते. बैलगाडीने तरी जायचे किंवा  घोड्यावर बसून.जावईबुवांच्या घरचे एक तट्टू होते ते घेऊन जायचे ठरले. तयारी करताकरता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली. निघायचा दिवस उजाडला.वडिलांनी चिरंजीवांना उपदेश केला–
``हे बघ, स्वत:ची अक्कल फारशी पाजळायची नाही. मी सांगतो तसं करायचं.''
``अर्थातच! हे मी मागंच कबूल करून टाकलं आहे, बाबा.''जावईबुवांनी मान डोलवली.
``सासुरवाडीला गेल्यावर अगदी ऐटीत वागायचं. असं गबाळ्यासारखं नाही रहायचं. सगळ्यांवर कशी आपली जोरदार छाप पडली पाहिजे.सगळ्यांना मनातून दरारा वाटला पाहिजे.''
``ते लागलं माझ्याकडं. गेल्या गेल्या एकेकाची तंगडी मोडून टाकतो. म्हणजे असा दरारा वाटेल सगळ्यांना की यंव!'' जावईबुवा नाक फुगवून अभिमानाने बोलले.
``हात् मूर्खा! सासुरवाडी म्हणजे काय तालीम-बिलीम समजलास की काय? तसलं काही करायचं नाही. आलं लक्षात? रुबाबात वागायचं, रुबाबात!''
``ठीक आहे; आमच्या बापाचं काय जातं? रुबाबात वागतो.''
``शाबास! फारसं कुणाशी बोलायचं नाही. अगदी बेतास बात.बोललं तरी अगदी मोजकं. अगदी हळू. किती हळू?''
``अजिबात कुणाला ऐवूâ येणार नाही इतकं! बरोबर आहे ना?''
``गाढवा! इतकं  हळू नाही. थोडं हळू... कुठेही गेलं तरी उच्चस्थानी जाऊन बसावं. गंभीर मुद्रा असावी. बायकांशी फारसं बोलू नये.सगळ्यांची प्रेमळपणानं चौकशी करावी.''
जावईबुवा खो खो हसून म्हणाले,
``हे तर अगदीच सोपं आहे बाबा. अगदी बरोबर करतो. बराय,मी निघतो.''
जावईबुवा वडिलांच्या पाया पडून तट्टावर बसले. बरोबरचे सगळे सामान पडशीत नीट कोंबले. मग तट्टाचा लगाम हाती घेऊन त्यांनी घोड्याला इशारा केला. तेवढ्यात वडिलांनी चिरंजीवांना पुन्हा थांबवून सांगितले, ``हे बघ, सासू-सासरे यांची गाठ पडल्याबरोबर त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना म्हणायचं, `मामा नमस्कार, मामी नमस्कार'... समजलं?''
सकाळपासून उपदेश ऐकून ऐकून जावईबुवा कंटाळले होते.त्यांचे रिकामे डोके गरगरायला लागले होते. तोंड वेडेवाकडे करून ते म्हणाले,``आता हे सगळं कसं लक्षात ठेवायचं बुवा? विसरून-बिसरून गेलो तर?''
``छे: छे:! हे शिष्टाचार आहेत. नाही पाळले तर वाईट दिसेल. तू  आपलं असं कर. मामा नमस्कार... मामी नमस्कार... असं सारखं घोकतच जा ना वाटेनं. म्हणजे विसरणार नाहीस.''
ही कल्पना जावईबुवांना एकदम पटली. तट्टाला चुचकारून ते घोकतच निघाले एकसारखे.``मामा नमस्कार... मामी नमस्कार.''
हळूहळू सकाळ उलटली. दुपार झाली. उन्हे चांगली तापली. जावईबुवांचे डोके चांगलेच तापले. पण तिकडे लक्ष न देता ते जोराने तट्टू पिटाळीत होते आणि मनाशी घोकीत होते, ``मामा नमस्कार...मामी नमस्कार.''
थोड्या वेळाने वाटेत एक मोठे वडाचे झाड लागले. त्या झाडावर दुपारच्या वेळी कितीतरी पाखरे सावली धरून बसली होती. वडाखालून जावईबुवा चालले. त्यांच्या एकदम ध्यानात आले की, तट्टू लेकाचे फार हळू चालते आहे. चकचक करून काही उपयोग होत नाही. शेवटी त्यांनी पडशीतला चाबूक काढला आणि त्याचा काडकन आवाज हवेतकेला. त्या शांत वेळेला तो आवाज फार मोठा निघाला. झाडावरची पाखरे एकदम घाबरून भुर्रर्रर्रकन् उडाली. त्यांचे थवेच्या थवे उडाले आणि भुर्रर्र... असा मोठा आवाज झाला. जावईबुवा मनाशी घोकीत चालले होते. ते एकदम दचकले. तो आवाज त्यांच्या रिकाम्या डोक्यात जाऊन पोहोचला आणि पक्का झाला. काहीतरी गडबडगोंधळ झाला खरा. अन् जावईबुवा इकडं मनाशी घोकत पुढे निघाले,
``मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र...''
संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. सासुरवाडीचे गाव अगदी हाकेच्या टप्प्यात आले तरी जावईबुवा घोकीतच होते,
``मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र...''
अखेर सासुरवाडीच्या दारापाशी घोडे थांबले. जावईबुवा खाली उतरले. जावई आल्याची वर्दी सगळीकडे गेली. गडीमाणसं धावत आली. सासूबाई आल्या. सासरे आले. आसपासचे लोक कौतुकाने सावकाराच्या जावयाकडे पाहू लागले. जावईबुवांनी सगळ्यांच्या तोंडाकडे दृष्टी टाकली. मग ऐटीत पावले टाकीत ते पुढे गेले. सासऱ्यांना नमस्कार करून ते मोठ्यांदा म्हणाले,
``मामा भुर्रर्र...''
सासरे दचकलेच. आ करून बघायला लागले. तेवढ्यात जावईबुवांनी सासूबार्इंना नमस्कार केला. पुन्हा ते मोठ्यांदा म्हणाले,
``मामी भुर्रर्र...''
सासूसासरे घाबरून गेले. आसपासची माणसे मोठमोठ्यांदा हसू लागली. जावईबुवांना काही कळले नाही. तेही खो खो करून हसू लागले.