पुणे
तीसलाच रात्री बातमी कळली. सगळे तपशील समजले. दुसNया दिवशी सकाळी दंगलीला सुरुवात झाली. टोळक्या-टोळक्यांनी लोक शहरभर हिंडू लागले. डोक्याला टोपी, रुमाल घालून हिंडणाराला त्यांनी बोडके व्हायला लावले.
लोकांनी काही ठिकाणी दगडपेâक केली, काही दुकान लुटली, उपाहारगृह जाळली. वर्तमानपत्राची कचेरी जाळली. बेफाम झालेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी शहरात तीन जागी गोळीबार केला. छत्तीस तासांची कफ्र्यू ऑर्डर जारी केली.
पुण्याचे सगळे वाहते रस्ते आटून गेले. सगळी दुकाने बंद झाली. वाहने बंद होती. नाना तNहेच्या आवाजाने चोवीस तास बोलणारे हे शहर वाचा बसल्यासारखे गप्प झाले होते. काळ्या स्लेट पाटीवर दगडी पोqन्सलीने
चरा उठावा; तशी एखादी लष्करी गाडी डांबरी रस्त्यावर वाजत असे. बावरलेली भटकी कुत्री काय करावे हे न कळून, पुन:पुन्हा रस्ता ओलांडत होती. आणि भिंतीकडेला उभी राहून मोकळ्या रस्त्याकडे बघत होती. रोजचे व्यवहार अवघडले होते. वडील माणसांना नोकरी-धंद्यावर जाता येत नाही, मुलाबाळांना शाळेला जाता येत नाही. दुधाचा गवळी येत नाही. वाण्याच्या दुकानाकडे जाता येत नाही. पिठाच्या गिरण्या चालू नाही. सगळी घडीच विस्कटून गेली आहे.
संध्याकाळ झाली. थंड वारे सुटले. सोनेरी उन्हे छपरावर उतरली. पण रस्ते मोकळे, बागा मोकळ्या, थिएटरे, हॉटेले बंद. रोज संध्याकाळी जागोजाग गर्दी करणाNया चिमण्या-साळुंक्यासुद्धा कुठे दिसत नव्हत्या. पुलाखाली पारवे फिरत नव्हते.
रात्री बाजारपेठा उदास दिसत होत्या. दुकाने बंद होती. फक्त खांबांवरचे दिवे तेवढे जागते राहत होते. आजाNयाच्या रात्रीसारखी रात्र जाता जात नव्हती.
दुपारी झोपलो होतो; तो मी साडेपाचला जागा झालो. चादर अंगावर ओढून घेऊन उगीच पडून राहिलो होतो. गेले दोन दिवस मी धड जेवलो नव्हतो. अन्नावर वासना नव्हती.
एरवी या वसतिगृहाच्या खोल्यांतून राहणारी शाळा-कॉलेजांतील मुले या वेळी केवढा गोंधळ करायची. वर दाणदाण पावले वाजायची, वेड्याविद्र्या आवाजाने गाण्यांच्या ओळी म्हटल्या जायच्या. आडनावांची कडबोळी
वळून हाका मारल्या जायच्या. स्टोव्ह फरफरायचे, नळावर बारड्या वाजायच्या. आज सगळे गप्प होते. मला काही खावे असे वाटत नव्हते. खोलीतून बाहेर पडू नये असे वाटत होते. सारखी चुणचुण थंडी वाजत होती. अंगावरचे पांघरूण काढावे वाटत नव्हते. मी आजारी होतो का? अंग गरम नव्हते, डोके दुखत नव्हते. जीभ मात्र अस्वच्छ वाटत होती.
खोलीतील उजेड हलके-हलके कमी होत होता. डासांची गुणगुण वाढली होती. दुपारी यशवंताही पलीकडे असलेल्या कॉटवर झोपला होता. दार ओढून घेऊन तो गेल्यासारखे मधे कधीतरी वाटले होते. कुठे गेला? कामावर गेला असेल. पण आज कचेNया सुरू आहेत का? यशवंताची कचेरी या वंâपाउंडातच आहे. पण अशा ाqस्थतीत कचेNयांत काय कामकाज चालणार?
संध्याकाळ दाटून आली होती. कसे उदास वाटते होते. आज वार कोणता, तारीख किती? जानेवारी दोन की तीन? फार वेळ पडून राहिलो होतो. आता उठावे. दिवा लावावा. नळावर जाऊन स्वच्छ तोंड धुवावे. गार पाणी डोळ्यांवर शिंपडावे. चला, उठले पाहिजे असे घोकत-घोकत पडूनच राहिलो होतो. झोप नव्हती, पण डोळे जड होऊन सारखे झाकत होते. खोल चाललो आहोत, तोल जाऊन पडतो आहोत असे वाटत होते. डोळे प्रयासाने उघडावे लागत होते.
आई गं! आई!
पुन्हा घुसमटून पांघरुणात गोळा झालो.
खोलीचे दार आत ढकलल्याचे मला कळले नव्हते. लख्खकन दिवा लागला. डोक्यावरून पांघरूण घेऊन मी पालथा झोपलो होतो, तरी आत कळले की दिवा लागला. यशवंता आला का?
मला हलवीत यशवंता म्हणाला, ‘‘अरे, अजून काय झोपून राहिला आहेस? ऊठ!’’
मी पांघरूण दूर करून उताणा झालो. प्रकाशाने डोळे दिपले. माझ्या गळ्याला, कपाळाला हात लावून यशवंता म्हणाला, ‘‘ताप-बीप नाही ना!’’
‘‘नाही, पण उठावंसं वाटत नाही.’’
‘‘ऊठ, जेवून झोप. आज आपल्या जेवणाची सोय झाली आहे. आमच्या साहेबांनी आपल्या दोघांनाही जेवायला बोलावलं आहे –’’‘‘मला जेवायचं नाही.’’
‘‘थोडंसं खा – ऊठ – आठ वाजून गेले! ती माणसं वाट बघत असतील.’’
यशवंताच्या या चिकट आग्रहाचा मला तिटकारा आला होता. जेवण ही गोष्ट याला इतकी महत्त्वाची का वाटते! नाही जेवलं; तरी माणूस काही मरत नाही लगेच.
‘‘तू जा, मी नाही येत.’’
‘‘का?’’
काय सांगायचे? –
‘‘मला संकोच वाटतो. तुझे साहेब माझ्या काही इतक्या ओळखीचे नाहीत. मला कशाला बोलावतील ते? तूच सांगितलं असशील त्यांना.’’
‘‘अरे, पण त्यात संकोच कसला? आपल्याला जेवण पाहिजे आहे. त्यांचं घर आहे. म्हणून दोन पानं जड नाहीत त्यांना. सोय झाल्याशी गाठ. खानावळीत वाढपी काय ओळखीचे असतात? आपले हाल बघून त्यांनी या म्हणून सांगितलं आणि नाही म्हणायचं का आपण? चल!’’
No comments:
Post a Comment