Thursday 3 April 2014

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई

डोंगरीमधली महाधूर्त बाई

कब्रस्तानात

मरीन लाइन्सजवळच्या क्वीन्स नेकलेसवरच्या अजदाा टेट्रा-पॉडवर अरेबियन समुद्राच्या काळ्या-करड्या लाटा वेगाने आदळत आहेत. अनेक दिवस पाठशिवणीचा खेळ खेळल्यानंतर पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय.

अलीकडेपर्यंत, म्हणजे ८०च्या मध्यापर्यंतची गोष्ट. चर्नी रोडवरून मरीन लाइन्सकडे निघालेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता समुद्र सहज दिसत असे. `मरीन लाइन्स' हे नाव ब्रिटिश लोकांनी दिलंय. १९व्या शतकात ब्रिटिशांनी रेल्वेलाइनचं जाळं विणून मुंबई नगरी अनेक स्टेशनांशी जोडली होती. मरीन लाइन्स नावाचं मूळ ह्या गोष्टीमध्ये आहे. ‘मरीन बटॅलियन लाइन्स’वरून मरीन लाइन्स हे नाव पडलं. पुढे ह्या जागी एअरफोर्स रहिवासी क्वार्टर्स आल्या. आजही मेट्रो अ‍ॅडलॅबच्या दक्षिणेकडे ह्या क्वार्टर्स बघायला मिळतात. प्रसिद्ध मरीन ड्राइव्ह प्रॉमिनाड आणि समुद्र ह्यांमधून फक्त एक रस्ता जातो – व्ही. ठाकरसी मार्ग. 

स्टेशनला लागूनच बडा कब्रस्तान आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे, ह्याची आठवण करून देणारं हे कब्रस्तान सुमारे साडेसात एकर जागेत पसरलं आहे. दीडशे वर्षं जुनी ही दफनभूमी स्टेशनच्या एवढी जवळ आहे की, स्टेशनच्या उत्तरेकडे असलेल्या ओव्हर-ब्रिजजवळ पोहोचण्यासाठी प्रवासी तिथूनच जाणं पसंत करतात.

मी बडा कब्रस्तानजवळ पोहोचलो, तेव्हा थडग्यांवर पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरण अधिकच उदासवाणं वाटत होतं. कब्रस्तानमध्ये येण्याचं कारणही वेगळं होतं. हाजी मस्तानविषयी जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो. आज त्याची बरसी आहे – मृत्युदिन. मुंबईचा अतिशय कुख्यात सुवर्णतस्कर – डॉन हाजी
मस्तानच्या तिन्ही मुली दर वर्षी पुâलं आणि गुलाबपाकळ्या वाहून त्याला श्रद्धांजली देण्यासाठी येतात, अशी माहिती मिळाल्याने मी कब्रस्तानात आलो आहे. 

मुंबईमध्ये ही गोष्ट नवीन नाही. श्रीमंत लोकांच्या प्रियजनांना श्रद्धांजली वाहण्याच्या वेगवेगळ्या तNहा दिसून येतात. दाऊद इब्राहिमच्या पोलीस कॉन्स्टेबल पित्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते. इब्राहिम कासकरचं निधन झालं तेव्हा दाऊदने ट्रक भरभरून गुलाबपाकळ्यांचा वर्षाव पित्याच्या कबरीवरती केला होता. असं म्हणतात की, पुढचे तीन दिवस संपूर्ण कब्रस्तानामध्ये गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता.
पाण्याची डबकी चुकवायचा निष्फळ प्रयत्न करीत मी चालत होतो. नीटनेटक्या कबरींच्या रांगेच्या बाजूने पुढे गेल्यानंतर हाजी मस्तानच्या अंतिम विश्रांतीची जागा सहज सापडली. कबरीवरील दगडावर उर्दू आणि इंग्रजीमध्ये नाव लिहिलेलं होतं. ताज्या गुलाब पाकळ्यांचा सडा सभोवती पडला होता. पण ऐकलं होतं त्याप्रमाणे पुâलांचे डोंगर दिसले नाहीत. तुरळक लोक कबरीजवळ जमून कुराणाचं पठण करीत
होते. हीच डॉनची कबर आहे, ह्याची खात्री करून घेतलेली बरी असा विचार करून मी धीर एकटवला आणि एकाला विचारलं, ``क्या यह हाजी मस्तान की कबर है?''

काहींनी माझ्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकला; पण एकाने होकारार्थी मान हलवली. मस्तानच्या कबरीजवळचा साधासुधा, चपटासा नामफलक पाहून मी काहीसा विचारात पडलो. त्याच्या मुलींनी आजूबाजूच्या अनेक भव्य दगडी फलकांप्रमाणे का निवडला नाही हा, प्रश्न माझ्या मनात चमकला. `मस्तानसारख्या डॉनची काय ही अवस्था' असा विचार करतच मी कब्रस्तानात निरुद्देश फिरायला लागलो.
बडा कब्रस्तानात मी प्रथमच आलो होतो. मुंबईचे अनेक कुख्यात गँगस्टर इथेच अखेरची विश्रांती घेत आहेत, असं मला समजलं होतं – करीम लाला, इब्राहिम दादा, रहीम खान, दाऊद इब्राहिमचा भाऊ साबीर कासकर इत्यादी. हाजी मस्तानच्या मुली कबरीवर पुâलं आणि गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करायला येतात ही तर
अफवाच ठरली. त्यामुळे त्याची कहाणी अधुरीच राहणार असं दिसत होतं. आलोच आहे तर ह्या अन्य डॉनच्या कबरी बघाव्यात असं मी ठरवलं. 

काहीशा भोळसटपणानेच मी विचारलं, ``क्या यहाँ अंडरवल्र्डवालों के लिए अलग सेक्शन है?''

चुरगळलेला कुर्ता आणि गुडघ्यापर्यंत खोचलेली चौकडीची लुंगी घातलेला तो माणूस माझा प्रश्न ऐवूâन हसला. ``मियाँ, हे सर्व कब्रस्तानच अंडरवल्र्ड आहे. इथे येणारा प्रत्येक जण अंडरवल्र्डमध्ये जातो. अंडरवल्र्डचे राजे आणि राण्या, सर्वच अखेरची विश्रांती घेण्यासाठी इथेच येतात...''

``अंडरवल्र्डची राणी?'' मी आश्चर्याने विचारलं, ``अंडरवल्र्ड डॉनची पत्नी म्हणायचंय का तुम्हाला?''

त्याने चहूबाजूला नजर फिरवली आणि माझ्याकडे नजर रोखून पाहिलं. मी त्याचा अर्थ ओळखून गुपचूप ५० रुपयांची नोट त्याच्या हातात सरकवली. त्यानेही ती नोट चटकन कुत्र्याच्या खिशात लपवली. 

``मस्तानची एक बहीण होती... काय बरं तिचं नाव... पूर्ण नाव आठवत नाही, पण काहीतरी गांधी असं असावं. आपले भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसार्इंना राखी बांधली होती तिने... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसुद्धा तिला आदराने वागवायचे. ती मुंबईच्या अंडरवल्र्डची राणी होती. तिच्यासारखी पुन्हा होणार नाही.''

या म्हाताNयाचं डोवंâ फिरलंय की काय, अशी मला शंका आली. गेली १५ वर्षं मी क्राइम रिपोर्टर म्हणून काम करतोय. एवढ्या काळात मोठे राजकारणी आणि माफिया अशा दोघांबरोबर संबंध असणाNया कोणाही ध्Eाीविषयी काहीही ऐकिवात आलं नव्हतं. मस्तानची मानलेली बहीण, गांधी आडनाव, भारताच्या पंतप्रधानांना राखी बांधणारी, वजनदार मराठा मुख्यमंत्र्यांशी चांगला परिचय असलेली मुंबई अंडरवल्र्डची राणी? सारंच विलक्षण. 

डोवंâ फिरलेला असो अगर नसो, पण लुंगीवाला शवूâर भाईच मला तिच्या कबरीजवळ घेऊन गेला. असंख्य कबरींमधून वाट काढत आम्ही कब्रस्तानच्या दुसNया टोकाला पोहोचलो. एके ठिकाणी लहान मुलांना दफन करण्याची जागाही होती – ‘तिफ्लन-ए-जन्नत’ म्हणतात त्या जागेला.

बरीच मिनिटं चालल्यानंतर आम्ही कब्रस्तानच्या दक्षिणेकडील कोपNयात पोहोचलो. तिथल्या थ् आकाराच्या कबरीकडे बोट दाखवून तो म्हणाला, ``यही है उनकी कबर.'' कबरीची अवस्था अतिशय वाईट होती. नीट निगा राखलेली दिसत नव्हती. झाडंझुडपं वाढल्यामुळे कबर झाकली गेली होती.

कबरीवर नाव वगैरे काही लिहिलेलं दिसलं नाही. बाजूच्या दगडावर `फॉर्म नं. २५४४, ओटा नं. ६०१' ही अक्षरं कोरलेली होती. बस इतवंâच. मी शवूâर भाईच्या हातामध्ये आणखी एक ५०ची नोट टेकवली आणि जायला सांगणार तोच तो बोलायला लागला. 

``ती स्वातंत्र्यसैनिक होती. महात्मा गांधींबरोबर तिनेही इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.''

हे ऐवूâन मी आ वासला. ``काय सांगतोस?'' मी अविश्वासाने विचारलं, ``असं असेल, तर ती अंडरवल्र्डची राणी कशी काय झाली?'' 

``कारण दाऊद इब्राहिम तिला आपली आई मानायचा. शिवाय पोलीस आणि माफिया, दोघंही तिची इज्जत करायचे. सर्व गँगवर तिचा वचक होता.'' 

मी आणखी एक नोट त्याच्या हातात सरकवली आणि विचारलं, ``कुठे राहायची ती? आणि मुंबईत कोणत्या भागामधून तिचं काम चालायचं?'' 

``डोंगरी.''

पालेर्मो हा सिसिलियन माफियांचा बालेकिल्ला होता, तसाच मुंबई माफियांचा डोंगरी हा बालेकिल्ला होता, निदान दाऊद इब्राहिमच्या काळात तरी होता. `डोंगरी' हे नाव ऐकताच अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
``अच्छा, म्हणजे ही जेनाबाईची कबर आहे तर?'' मी उत्सुकतेने विचारलं. म्हाताNयाने जोरजोरात मान डोलावली, ``हा, हा, ही जेनाबाईचीच कबर आहे.'' मी बुचकळ्यात पडलो. जेनाबाई बेकायदा दारूचा धंदा करायची, पोलिसांची खबरी होती, हे मी ऐकलं होतं. पण ह्या कबरी खोदणाNया म्हाताNयाने जेनाबाईविषयी
नवीनच माहिती दिली होती. माझी जिज्ञासा चाळवली होती. जेनाबाईची गोष्ट जाणून घ्यायलाच हवी.

No comments:

Post a Comment