Thursday, 27 March 2014

गुलमोहर

जीव मुठीत घेऊन पळत होता. बराच वेळ तो तसाच पळत होता. सुरुवातीला त्याचा पळण्याचा जो वेग होता, तो आता राहिला नव्हता, तरी तो पळत होता. कारण किती वेळ आणि किती अंतर पळत गेलं म्हणजे धोका संपला याचा निर्णय त्याला घेता येत नव्हता. त्याच्यामागं अजून कुणीतरी पळत येत नव्हतं. तसं कुणी पळत येण्याची शक्यताही नव्हती; पण जर कुणी आलंच असतं तर मात्र त्याची धडगत नव्हती. असा एखादा सापडला तर सगळे मिळून त्याचा कसा भुगा करतात हे त्यानं अनेकदा पाहिलं हातं. बुक्क्यांवर बुक्क्या, लाथांवर लाथा बसतात. पोट बघत नाहीत, तोंड बघत नाहीत. डोळा बघत नाहीत की काही नाही. उगारलेली मूठ आपटेल तिथं आपटेल. एखाद्याला मारायचं म्हटलं की सगळ्यांच्या उत्साहाला उधाण येतं. अशाच
तNहेच्या धोक्यातून त्याला बाहेर पडायचं होतं आणि किती वेळ पळालो म्हणजे धोका टळला, हे त्याला कळत नव्हतं.

त्याची ती पहिलीच चोरी होती. चोरी करणारी माणसं चोNया का करतात हे त्याला कधी कळलंच नव्हतं. सगळी पापं पोटासाठीच करावी लागतात असं सरसकट सगळी म्हणायची; पण पोट भरण्यासाठी पापच का करावं लागतं याचा उलगडा त्याला आजवर झाला नव्हता.

तो उलगडा त्याला आज झाला. पाप का करावं लागतं हे त्याला इंटर होऊन कळलं नव्हतं. शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या उन्नतीसाठी होतच नाही, तर कुणाची तरी सेवा करता यावी, त्यासाठी शिक्षण राबवलं जातं, हे त्याला शिक्षण घेतल्यावर समजलं होतं; पण त्याहीपेक्षा नोकरी करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तो जेव्हा वणवण सहा महिने भटकला तेव्हा त्याला हेही कळलं की आपली सेवा कुणालाही नको आहे. सेवा करण्यासाठी त्याच्याहून जास्त शिकलेल्या माणसाची गरज जगाला होती. आटापिटा करून, घरातली पुंजी संपवून तो इंटरपर्यंत शिकला. ते शिक्षण कवडीमोलाचं ठरलं होतं हेही त्याला कळलं.

त्याला तशा बNयाच गोष्टी कळल्या. बेकार, निर्धन माणसाला कोणीही विचारीत नाही हे त्याला समजलं. ज्या वस्तूंवर आपण जिवापाड प्रेम केलं व ज्या वस्तूंना आपण वर्षानुवर्ष जिद्दीनं सांभाळलं, त्या वस्तू बाजारात विकायला गेलं की त्यांना काहीच भाव येत नाही, तरीही एक वेळच्या जेवणासाठी, दोन पोटांसाठी त्या वस्तू विकाव्याच लागतात हेही त्याला कळलं. 

सगळ्या वस्तू विवूâन झाल्यावर, आईला व त्याला दोन दिवस उपाशी राहावं लागल्यावर, तिसNया दिवशी त्याला ही शेवटची गोष्ट समजली की, पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.
तेच चोरीचं पाप त्यानं आज केलं होतं. काही मिनिटांपूर्वीच. पाप करायची जाणूनबुजून सवय नसल्यानं, असलं पाप कधी करतात हेही त्याला माहीत नव्हतं. चोरी करायला तो भर दिवसाढवळ्या प्रकाशाचा बाहेर पडला होता. चोरी कसली करायची याचाही डोक्यात विचार नव्हता, योजना नव्हती. जिथं योजना करूनही ती फसते, तिथं कसलीही योजनाच नसेल तर काय होणार? त्याप्रमाणे सकाळी वणवण भटवूâनही त्याला चोरी जमेना. भुकेचा डोंब पोटात उसळला तेव्हा तो एका हॉटेलात शिरला आणि तीन-चार ग्लास पाणी प्यायला. मग जवळच्याच बागेत गेला. तिथंच तासभर लवंडला. त्या तसल्या अस्थिर अवस्थेतही त्याचा जरा डोळा लागला. जाग आली तो अंगावर काहीतरी पडलं म्हणून. डोळे किलकिले करून पाहतो तो रंगीबेरंगी रबरी चेंडू. त्या चेंडूच्या पाठोपाठ दोन गोरे गोरे – मऊ इवलेसे हात, चांदण्यासारखं निष्पाप हास्य, बोबडे बोल, आर्जवी स्वर आणि सशासारखे डोळे. 

सशासारखीच बुजरी हालचाल. पण त्याच्या रिकाम्या पोटात आणि विवंचनेनं शिणलेल्या डोक्यात त्याक्षणी
सैतानाचं वास्तव्य होतं. समोर आलेलं ते बालरूप, परमेश्वरस्वरूप त्याला ओळखता आलं नाही. माया,ममता, वात्सल्य या सद्गुणांची आहुती त्या भुकेनं घेतली होती. पुण्यप्रभाव सरला आणि आणखी एक बळी मिळाला म्हणून पाप आनंदानं सरसावलं; त्याच्या डोळ्यांत प्रगट झालं.

त्या चिमुकल्या हातातल्या दोन सोन्याच्या बांगड्या त्याला दिसल्या. फक्त बांगड्याच– बाकी काही नाही. अर्जुनाला फक्त पक्ष्याचं डोवंâ दिसलं, मत्स्यवेध करताना, उकळत्या तेलाच्या प्रतिबिंबातही फक्त मासाच दिसला. तशा त्यालाही फक्त बांगड्या दिसल्या.

त्यानं झडप घातली, ती पोरगी भयानं ओरडेल असं वाटलं म्हणून तिचं तोंड त्यानं गच्च दाबलं. बांगड्या ओरबाडून काढल्या. त्या पोरीला ढकलून दिलं आणि बागेच्या वुंâपणावरून उडी मारून तो पळत सुटला.


No comments:

Post a Comment