Tuesday, 11 March 2014

!! गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा !!

कधी कधी वाटत उगाचंच माणसाच्या जन्माला आलो, नाही त्या रोजच्याच कटकटीत अडकलो... तेच तेच रोज कंटाळवाणं जिणं जगायचापण कधी कंटाळा येतोच.

मनात थैमान मांडलेल्या विचारांचं काहूर, नाही नाही त्या शंका-कुशंका मनात फेर धरून नाचत असतात, प्रत्येकजण असाच का वागतो, कशाला दुस-याच्या जीवनात घुटमळतो?? त्यापेक्षा एखादी शोभेची वस्तू म्हणून जन्माला आलो असतो तर... काही दिवसाच्या चमक-ढमक नंतर अडगळीच्या खोलीत तरी राहीलो असतो, पुन्हा उपयोगात येणारी वस्तू म्हणून...एक माणूस म्हणून अडगळीत आता जावू पण शकत नाही... वस्तू दुर्लक्षित होतात पण एक आपलं माणूस... कसा दुर्लक्षित  होईल... नाही म्हंटल तरी जास्त काळासाठी  अजिबात नाही त्या माणसाच्या नसण्याचा रितेपणा थोड्याच अवधीत जाणवू लागतो...

नकळत त्या माणसाची उणीव भासू लागते, असते ते तर... नेहमीच दूर केलेल्या  माणसाजवळ जाउन परत येण्यास किती वेळा साकड घालायचं?? काही दिवस नेटाने वागवून, आपल्या कामाचं ओझं हलक करून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची सोडून... हिणवायचे?? उगाचं परत आणलं, होतात आश्रमात तेच बर होत, काहीच उपयोगाचे नाही, एक साध काम, धड करता येत नाही, अपमान करून अक्षरशः शेवटी  हाकलण्या पर्यंत मजल जाते... पण मनात साधा विचार येत नाही ते स्वत: नव्हते आले आपण बोलावलं होत, येण्याचं औचित्य आपण साधलं, आपलं काम झालं नेटाने आपण बोलुही शकत होतो या आता... येवढा घृणास्पद अपमान कशाला ?? पुन्हा गरज पडली तर दोन वेळच अर्धच जेवण, दुपारी एकदाच मिळणार्या दोन घोट चहा मध्ये दुसर कोण काम करणार आता?? स्वार्थ स्वताचा फक्त स्वार्थ साधतात इथली  माणस...


कधीच दुसर्याच्या मनाचा, भावनांचा विचारच करत नाही, काही बोलत नाही आपली  व्यक्ती म्हणून किती वेळा छळणार ?? कधी ना कधी सहनशीलतेचाही अंत होणारच ना?? चार भिंतीत, चार माणसात गुप्त असलेलं स्वभावाचं नागड रूप जर कुणाला कळलं तर... कापरं भरत ना नुसता विचारही करून, पण नाही ती व्यक्ती अस करूच शकत नाही एव्हडा ठाम विश्वास असतो, कितीही आपण चुकीची वागणूक दिली तरी ती  व्यक्ती आपलं वाईट कधीच करूच शकत नाही, मग आपण त्या व्यक्तीला असे तुच्छतेने का वागवतो?? यंदा चूक झाली पुढच्या वेळेस अस नाही होणार म्हणून वापस आणलं होत आता फक्त माफी मागायची आहे... पिकलेलं पान आहे गळून पडायच्या आधी सर्व चुकंना कबूल करायचं आहे... पण केव्हा आत्ता लगेच होय असतील कुठे ते माहीत आहेच पण माफी देतील?? देतीलच माझी माणस आहेत... पण ते आता तुला  आपलं समजतीलच कशावरून..? नाही ते अस वागूच शकत नाही खात्री आहे मला, आत्ता अजून उशीर नको जायला हवं आश्रमात...  हे काय सगळे पांढर्या पोशाखात, शिणलेला चेहरा, पाण्यात बरबटलेले डोळे.. हातात एक गुलाबच फुल कशाला?? काय चालू आहे आज नेमक आश्रमात?? प्रत्येकाच्या नजरेत काही समजतंयं का शोधत तो साहेबरावांच्या खोली कडे चालू लागला... खोली बाहेर गर्दी जमली होतीसाहेबरावांच्या आवडीच्या गुलाब अगरबत्तीचा मंद गंध पसरला होता.. त्याच गंधात धुंद होवून त्याने साहेबरावांच्या खोली प्रवेश केला, साहेबराव त्यांच्या कॉटवर शांत झोपले होते, चेहर्यावर समाधान होते, आलेल्या मृत्यूचे  संतुष्टीचे भाव चेह-यावर होते, काहीच बाकी राहिले नाही सगळे संपले... 


"आयुष्यभर माझ्या माणसांनी येथेच्छ हेटाळले, हिणवले, अगदी हाकललेही, पण  त्यांच्या या वर्तुणुकीचा मला राग कधीच आला नाही, दाखवत नसले कधी तरी, मनातून मला जपत होते, सांभाळत होते, माझ्यापासून दूर कधीच नव्हते एका माणसाला अजून काय पाहीजे? माझ्या मृत्युच्या दिवशी जन्मभर माझा राग करणारी व्यक्ती, माझा गतप्राण देह पाहून, दुखाच्या वादळात माझ्या इतक्या जवळ असेल  या पेक्षा सुखाची गोष्ट दुसरी कोणती? राग, द्वेष पैशांचे मिजास करावे पण मनात असलेल्या प्रेमाची तुलना कशाशीच होत नाही..." मी कधी कुणाचा राग केला नाही अन द्वेषही मी प्रेम करत होतो त्यांच्या प्रत्तेक वागण्यावर... कसलीच अपेक्षा ठेवता

थोरले सरकार साहेबरावांची शेवटची इच्छा होती त्यांचा "वैकुंठ धामाचा" पुढचा प्रवास तुम्ही आरंभवावा, मी फक्त होकारार्थी मान हलवली...  मी इथे आलो कशासाठी होतो, तब्बेतीने धड-धाकट असलेला माणूस इतकं सहज कसा सोडून जावू शकतो...?

साहेबरावांना गुलाब खूप आवडायचे एकदा म्हणाले होते.. मृत्यू नंतर एक जन्म  गुलाबाचं फुल म्हणून घेईल, प्रेमाचा धुंद लाल रंग माझ्या पाकळ्यांना मिळेल, माझ्या उमलण्याची आतुरतेने वाट कोणी बघत असेल,एका रम्य सकाळी जेव्हा मी सोनेरी किरणांसोबत हसेल, मोहक रुपात माझ्या काही क्षण तोही स्वताला हरवेलनाजूक हातांनी अलगत मला तोडून जेव्हा तो प्रेयसीला मला नजर करेल माझ्या लाल  गुलाबाची गुलाबी लाली तिच्या गालांवर त्याला दिसेल, त्याला होकार देतांना ओठ थोडे थरथरतील, हातात हात घेईल तेव्हा बोटांतून अलगत मी निसटेल, तू दिलेला पहीलाच गुलाब हा म्हणून ती सतत मला जपत राहील, कधी चिडून मला पायाखाली तुडवूनही जाईल, कधी तू नसतांना तुझ्या आठवांत माझ्याशी गुजगोष्टी  करत राहील, माझ्या पाकळ्यांना नाजूक बोटांनी कुरवाळत राहील, कारण फुलं आपलेपणा जपतात, म्हणून मला एक गुलाबाचं फुलं बनायचं आहे...!


---

मृदुंग

No comments:

Post a Comment