Wednesday 19 March 2014

मेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, चाकण येथे ग्रंथप्रदर्शन

‘आपल्या स्नेहीजनांना पुस्तके भेट द्या.’ या नव्या संकल्पनेला चाकणवासीयांपर्यंत  पोहोचवण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊस ने भारत फोर्ज, चाकण  शाखा यांच्या सहयोगाने  दोन दिवसांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. 
 
दि. १२ व १३ मार्च, २०१४ या कालावधीत भरवण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनात मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकशित करण्या त आलेली अनेक  ऐतिहासिक, आत्मकथनपर, वैचारिक, मनोरंजक अशी विविध विषयांवर आधारित अनेक  पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी चाकणवासीयांना  मिळाल्ाी.

या प्रदर्शनाचे उद्घाटन भारत फोजचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एन.के. नाईक सर यांनी केले. ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी चाकणमध्ये वाचनाला  प्रोत्साहन देण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक  केले. ‘समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, भारत  फोर्जच्याच सदस्यांपासून सुरुवात करू’ अशीr घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. यावेळी वंâपनीचे एच. आर. मॅनेजर विजय पारीख व भारत फोर्जचे अन्य सदस्य उपस्थित होते. 
 
आम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल माननीय नाईक  सर, पारीख सर, आणि भारत फोर्जच्या संपूर्ण परिवाराचे मन:पूर्वक आभार! 


----
ऋचा बाक्रे 

 

No comments:

Post a Comment