Saturday, 8 March 2014

मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी

मी बारा वर्षांची होते. माझ्यापेक्षा लहान मुलींची यापूर्वीच लग्नं झालेली मला माहीत होतं. लग्न म्हणजे काय हे जरी मला कळत नसलं, तरी मला ही कल्पना मात्र फारच आवडली. मात्र मला नवNया मुलाबद्दल फारसं माहीत नव्हतं. त्याचं नाव होतं मुन्नीलाल पाल. तोही माझ्यासारखाच गडरिया होता. तो माझ्यापेक्षा
साधारण दहा वर्षं मोठा होता. नऊ वर्षांपूर्वी त्याचं माझ्या दूरच्या नात्यातल्या बहिणीशी लग्न झालं होतं. पण ती काही महिन्यांपूर्वी प्रचंड तापाचं निमित्त होऊन वारली होती. या गोष्टींनी फारसा फरक पडत नव्हता. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की, तो दिसायला कसा आहे!

आमच्या लग्नाची तारीख ठरली. दोन महिन्यांनंतरचा मुहूर्त होता. लग्न आमच्याकडं होतं. प्रथेनुसार माझ्या वडिलांनी स्वागतसमारंभाचा खर्च केला. ३ मे रोजी २०० माणसांच्या वNहाडाच्या स्वागताची सज्जता पूर्ण झाली होती. माझी आजी, आई आणि कावूâ कित्येक दिवस स्वयंपाकघरात खपत होत्या. गरमागरम चपात्या आणि भाज्यांच्या रश्श्याचा खमंग वास घरात भरून राहिला होता. या उत्सवी वातावरणाचा स्पर्श घडल्यामुळं मीही अतिशय आनंदात होते. बाहेर खेळताना टीपेच्या आवाजात गाणी गात होते. दुपारी अम्मानं मला पिवळी साडी नेसवली. लग्नात याच रंगाची साडी नेसण्याचा पारंपरिक रिवाज आहे. दरम्यान, दाईनं माझ्या पायांच्या कडा मेंदीनं रंगवल्या. एव्हाना सूर्य ढळू लागला होता. मी नवNया मुलाची वरात येण्याची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. तितक्यात वरात येताना दिसली. त्याबरोबर मी लहान मुलासारखी त्याला भेटायला धावत गेले. तो वरातीच्या अग्रभागी खुर्चीत विराजमान होता. त्याच्यामागून इतर वNहाडी मंडळी पायी चालत विंâवा बैलगाड्यांतून येत होती.

मी वरात थांबण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर मला त्याचं दर्शन झालं. त्यानं पिवळा कुर्ता आणि पांढराशुभ्र पायजमा घातला होता. अंगावर पिवळी शाल गुंडाळली होती. त्याच्या माथ्यावर वाळलेल्या पानांचा मुकुट होता. मी इतका छान माणूस पहिल्यांदाच पाहत होते. तो उंचापुरा, सडपातळ होता. त्याचं धीरगंभीर व्यक्तित्व ही मला त्याच्या उमदेपणाची साक्ष वाटली. मला तो अतिशय देखणा वाटला. मी जराही न लाजता त्याच्याकडं पाहत होते. उत्तम शिष्टाचारांनुसार मी नजर खाली झुकवून राहणं गरजेचं होतं. पण मला ते काही जमलं नाही. माझ्या आजीचा मी डोक्यावरून पदर घ्यावा यासाठी आग्रह होता, पण मी तो न जुमानता पदर मागं खांद्यावर टाकला. त्यामुळं मी माझ्या भावी पतीच्या दृष्टीस पडले. त्यानं जे काही पाहिलं, ते त्याला आवडलं असावं असं मला त्याच्या चेहNयावरचे भाव पाहून वाटलं. त्यामुळं मला वेड्यासारखा आनंद झाला होता.

त्यानंतर सर्वांचा परिचय करून देण्याचा कार्यक्रम झाला. एव्हाना माझं कुतूहल शमलं होतं. त्यामुळं माझ्या मनात फक्त एकच विचार होता. आत्ता नुकत्याच आलेल्या पाहुण्या मुलांच्यात खेळायला जाण्याचा! माझे सासरे मिठाया वाटू लागले होते. त्यामुळं सगळी मुलं त्यांच्याभोवती गर्दी करून होती. क्षणभरापूर्वी मला थरारून सोडणाNया माझ्या भावी पतीचा विचार विसरून मीही हात पुढं करून त्या गर्दीत मिसळण्यासाठी धावत गेले. पण लगेचच माझ्या काकांनी मला परत वळणावर आणलं, `‘संपत, आत जाऊन बस आणि शांत राहा.’’

No comments:

Post a Comment