तयार राहा ...
फार थोड्या माणसांची मृत्यूशी गाठभेट होते.... स्वतःचं जीवन स्वतःच संपवणारे विंâवा न्यायालयात फाशीची शिक्षा झालेले सोडून. वृद्ध आणि रुग्णाईतांना ‘तो’ दिवस समीप येत असल्याचं जाणवत असेल, पण त्यांना मृत्यू कोणत्या दिवशी, कुठल्या वेळी येणार आहे, ते नेमवंâ कधीही कळत नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी मरणाच्या दारात जाऊन आल्याचा अनुभव घेतलेला असतो — बस, रेल्वेच्या प्रवासात, विंâवा विमानप्रवासात ते विमान नंतर कोसळतं, अशा प्रकारचा.
मी मला आलेल्या अशा प्रकारच्या काही अनुभवांबद्दल लिहिलं आहे.. मी एका झाडाच्या भव्य फांदीखाली गाडी पार्वâ केली आणि तिथून बाजूला गेलो. अवघ्या काही सेवंâदातच अकस्मात वादळी तडाख्यानं ती फांदी कोसळली, त्याखाली माझ्या गाडीचा चुराडा झाला. शिवाय मी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर होतो; मला चाहूलसुद्धा नसताना त्यातला एकजण माझा फ्लॅट पाहून गेला होता, तो माझ्या मागोमाग कसौलीपर्यंतसुद्धा आला होता. तिथं त्याला पोलीस त्याच्या मागावर असल्याचं लक्षात आलं. दिल्लीला परत येत असताना तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढं त्याला पुण्याच्या तुरुंगात फासावर चढवण्यात आलं. (त्यानं पूर्वी केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून) मृत्यू अटळ आहे ही गोष्ट आपण सदैव मनावर कोरली पाहिजे. आपण मरायलाच हवं हे लक्षात ठेवा. या विचारानं कुढत बसण्यापेक्षा त्यासाठी सज्ज राहा.
कवी असदुल्लाह खान गालिब यांनी हे फार सुंदर शब्दांत मांडलं आहे.
रौ मे है रख्श - ए - उमर कहाँ देखिये थामे?
नई हाथ बाग पर है ना पा है रकीब में
आयुष्य चौखूर वेगानं धावत आहे कोण जाणे कुठं थांबणार आहे? आपल्या हातात त्याचे लगाम नाहीत
आणि आपले पाय रिकिबीत नाहीत मला कसौलीत गेल्याच्या गेल्या वर्षी मरणाच्या दारात गेल्याचा अनुभव आला. त्यावेळी माझं वय होतं अठ्ठ्याऐंशी, पण मी वयाच्या मानानं चांगला ठणठणीत होतो. मी सकाळ-संध्याकाळ निरनिराळ्या प्रकारच्या औषधाच्या गोळ्या घ्यायचो...
म्हातारपणातल्या आजारांशी दोन हात करण्यासाठी, कमी-जास्त होणारा रक्तदाब काबूत ठेवण्यासाठी, प्रोस्टेट ग्लँड वाढलेली, यकृताचं कार्य बिघडलेलं... अशा काय काय दुखण्यांसाठी. पावसाळा सरत आला होता, हवेत खूपच दमटपणा होता. गोळ्या ठेवण्याच्या जागी बुरशी आली होती आणि त्या निरुपयोगी झाल्या होत्या.
एके दिवशी दुपारी मी वामकुक्षी आटोपून उठलो. शाल पांघरून, लिहायचं पॅड घेऊन व्हरांड्याच्या दिशेने निघालो. या व्हरांड्यासमोर बाग आहे. मी या ठिकाणी सूर्यास्तापर्यंत नेहमीच बसतो. त्या दिवशी मला माथ्यावर छत कोसळतंय असं जाणवलं. पुस्तकांच्या शेल्फातली पुस्तवंâ माझ्यावर गडगडत कोसळली. मी तोंडावर आडवा झालो. नाक आणि कपाळ जमिनीला टेकलं. मी क्षणभर जमिनीवर तसाच अस्ताव्यस्त पडून राहिलो. त्या वेळी मदतीला कुणाला बोलावावं म्हटलं तर जवळपास कुणीही नव्हतं. मला उठता येत नव्हतं. मी खेकड्यासारखा तिडमिडत रांगत फर्निचरचा पाय विंâवा काही भाग हाताला येतो का याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे मला त्या आधारानं उठता आलं असतं. मला आपला अंत आला असं वाटलं. मग माझ्या मनात, अजून पूर्ण व्हायच्या कामांचा विचार आला. आता मी प्रकाशक आणि वृत्तपत्रांच्या संपादकांना निराश करणारा होतो... या मंडळींसाठी मी साठ वर्षांहून अधिक काळ लेखन करत होतो, लेखन देण्याची अंतिम तारीखसुद्धा
कधी न चुकवता. मी आणखी थोडं आयुष्य लाभावं अशी करुणा भाकली नाही.
मला अल्लामा इक्बाल यांच्या चेतनादायी काव्यपंक्ती आठवल्या.
बाग-ए बहिश्त से मुझे हुक्म-ए-सफर दिया था क्यों?
कार-ए-जहाँ दराज है, अब मेरा इन्तजार कर.
तू मला नंदनवनातून बाहेर जाण्याचा आदेश का दिलास? मला अजून बरंच अर्धवट काम पूर्ण करायचं आहे:
आता तू माझी वाट पाहावीस हे बरं.
No comments:
Post a Comment