
लोणी पळवणारा कृष्ण, गोपांचा सवंगडी, कालियामर्दन करणारा, रासक्रीडेत रममाण होणारा प्रियकर ह्यांपैकी त्याचं कोणतंही रूप मला भावत नाही. एकमेव कृष्ण. सारथ्य करणारा!
सगुणसाकार म्हटलं की, कृष्ण. निराकार निर्गुण म्हटलं की, भव्य आकाश, गूढ, विराट, असीम, चिरंतन आणि असा एकमेव कृष्ण अर्जुनाला लाभला, म्हणून जगातला एकमेव भाग्यवान पुरुष म्हणजे अर्जुन!
आणि तरीही तो गोंधळलेला. मग तुमचं आमचं काय? कृष्णानं वारंवार जन्म घेतले, हे गीतेतलं कृष्णाचं वचन खरं मानायचं असेल, तर माझ्या मते ते चैतन्यरूपानं पण व्यावहारिक पातळीवर रोज अर्जुनच जन्माला येतोय. संपूर्ण चोवीस तासांत आपण स्वत: किती वेळा गोंधळलेले असतो, हे प्रत्येकानं आठवावं.
गोंधळून जाणाNयांतही दोन प्रकार आहेत. विचार कसा करावा, ह्याचंच आकलन न होणारे आणि अतिविचारी. अर्जुन विचारी आहे. म्हणूनच जिथं विचार आहेत, तिथं तर्वâ आहे. तर्कापाठोपाठ शंका आणि मग द्विधा मन:स्थिती आलीच. श्ळण्प् ऊप्घ्Nख्घ्Nउ ँथ्ळNऊए ऊप्E Aण्ऊघ्ध्N. अर्जुनानं कौरवसेना जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर कृष्ण धास्तावला. अर्जुन जर असं म्हणाला असता, ‘प्रथम मला सर्वांत बलाढ्य सेनापतीसमोर ने, म्हणजे तिथूनच युद्धाला प्रारंभ करतो.’ तर प्रश्न नव्हता. अवलोकन करायचं आहे म्हटल्यावर विचार आला.
एकदा ‘विचार’ ही अवस्था आली की, कृतीचा क्षण अंतरावर गेलाच. ही अवस्था आयुष्यातल्या प्रत्येक प्रांतात आणि षड्रिपूंच्या संदर्भातही जोखून पाहावी. प्रचंड क्रोधानं विंâवा एका क्षणात रागाचा पारा चढला आणि कर्मधर्मसंयोगानं आपण नेमक्या कोणत्या कारणासाठी रागावलो आहोत, ह्याचं त्याच क्षणी आत्मचिंतन
सुरू झालं, तर ती व्यक्ती कुणावरही डाफरणार नाही. लोभ, मोह ह्या सर्व रिपूंच्या बाबतीतही तेच तत्त्व आहे.
रणांगणावर जाण्यापूर्वी विचार योग्य. शत्रू समोर ठाकला की संपलं!
संसारात प्रत्यही आपण हेच करतो. पत्नी कामात असली की, पटकन मुलांशी काही गोष्टी बोलतो. नवरा कामावर जाण्याची बायका वाट पाहतात, हे नेहमीचं. प्रॉपर्टीच्या वाटण्या वगैरे जास्त गंभीर प्रश्न असतील, तर हडसून खडसून जाब विचारणारा. पैन्पैचा हिशेब करणाNयाचा आधार वाटणार असेल, तर ती व्यक्ती येईपर्यंत वाट पाहतो, नाही तर तो नसताना घाईघाईनं व्यवहार उरकतो. आणि इथं तर जीवन-मरणाचा प्रश्न होता. अर्जुन विचारी आहे, तसा दुर्योधनही नाही आणि भीमपण नाही. महाभारत आणि युद्ध ह्यांची विभागणीच तीन भागांत झाली आहे. विचारहीन, विचारी आणि निर्विचारी.
विचारहीन म्हणजे ज्याच्याजवळ विचार करण्याची क्षमताच नाही, अशी व्यक्ती. दुर्योधन आणि भीम म्हणजे विचारहीनतेचं प्रतीक. सरळ सरळ युद्धाला प्रारंभ करणारे. दोघांची वैचारिक पातळी एकच. म्हणूनच दुर्योधनानं युद्धाच्या वेंâद्रस्थानी भीमालाच मानलं होतं. त्यानं अर्जुनाचा विचार केला नव्हता. सैन्यात अशीच माणसं लागतात. तशी ती घडवली जातात. दिलेला हुवूâम ऐकणं हीच पहिली शिस्त. निर्णय घेणं हे स्वातंत्र्य जर प्रत्येक सैनिकाला दिलं, तर मिलिटरी उभीच राहू शकणार नाही. सैनिकाला विचारहीन बनावं लागतं; बनवलं जातं. भीम आणि अर्जुन ह्यांच्यात हाच फरक आणि भीम आणि दुर्योधन ह्यांच्यात हेच साम्य.
No comments:
Post a Comment