Saturday, 16 July 2022

कशीर १५ जुलै २०२२ कार्यक्रम

 अखिल मेहता सर यांसकडून पाहुण्यांचे स्वागत 








प्रकाशन



प्रेक्षक 



प्रेक्षकांचे प्रश्न उत्तर आणि लेखिका सहना विजयकुमार यांचा संवांद 
 











Friday, 15 July 2022

दाढीला लागली आग..

 सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी द्वारा अनुवादित

 'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' पुस्तकातील रंगतदार कथा...दाढीला लागली आग..



Thursday, 14 July 2022

VANSHVRUKSHA ABHIVACHAN

एस.एल भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित वंशवृक्ष या पुस्तकाचे अनंत कुलकर्णी यांनी केलेले अभिवचन


Tuesday, 12 July 2022

कादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत उत्त्चुक

 

महाकादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत 'महासम्राट'च्या पहिल्या खंडासाठी उत्सुक.येत्या १ ऑगस्टला प्रकाशित होतोय छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ उलगडणारा 'झंझावात'







Monday, 11 July 2022

AAJICHYA POTADITIL GOSHTI BY SUDHA MURTY


सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी यांच्या द्वारे अनुवादित आजीच्या पोतडीतील गोष्टी पुस्तकातील `मंतरलेले विंचू' कथेचे आरती मराठे यांनी केलेले अभिवाचन.






Saturday, 9 July 2022

साद घालतो कालाहारी...Cry of the KALAHARI

 आऽऽऽऊऽऽ - हळुवार कण्हण्याच्या आवाजाने मी दचकलो. हळूच माझे डोके उचलून माझ्या पायांकडे बघितले. क्षणभर माझा श्वासच घशात अडकला. माझ्या पायांपलीकडे एक भली मोठी सिंहीण होती, कमीतकमी तीनशे पौंड वजनाची असेल. जमिनीवरून बघितल्यामुळे तर अजूनच मोठी दिसत होती. ती पंधरा फुटांवरून आमच्या दिशेने चालत येत होती. चालताना तिचे डोके एकीकडून दुसरीकडे हेलकावत होते आणि प्रत्येक पावलागणिक तिच्या शेपटीचे काळे टोक हादरत होते. मी मुठीत शेजारचे गवत घट्ट पकडले आणि स्तब्ध होऊन पाहत राहिलो. अगदी तालबद्ध पावले टाकत ती सिंहीण माझ्या दिशेने चालत आली. तिच्या थोराड मिश्यांच्या टोकाला दवाचे थेंब चिकटले होते, तिच्या पिवळ्याधमक डोळ्यांनी ती थेट माझ्याकडे बघत होती. मला डेलियाला उठवायचे होते; पण हालचाल करायची भीती वाटत होती.निव्वळ एकजोडी कपडे घेऊन धरतीवरच्या सर्वात मोठ्या अस्पर्शित वाळवंटात आयुष्याची सात वर्षे घालवणारं एक अद्भुत जोडपं..ज्यानं कालाहारीच्या वाळवंटातलं अनभिज्ञ प्राणीजीवन जगासमोर आणलं, अशा मार्क आणि डेलिया ओवेन्सचे चित्तथरारक अनुभवकथन.