Saturday 9 July 2022

साद घालतो कालाहारी...Cry of the KALAHARI

 आऽऽऽऊऽऽ - हळुवार कण्हण्याच्या आवाजाने मी दचकलो. हळूच माझे डोके उचलून माझ्या पायांकडे बघितले. क्षणभर माझा श्वासच घशात अडकला. माझ्या पायांपलीकडे एक भली मोठी सिंहीण होती, कमीतकमी तीनशे पौंड वजनाची असेल. जमिनीवरून बघितल्यामुळे तर अजूनच मोठी दिसत होती. ती पंधरा फुटांवरून आमच्या दिशेने चालत येत होती. चालताना तिचे डोके एकीकडून दुसरीकडे हेलकावत होते आणि प्रत्येक पावलागणिक तिच्या शेपटीचे काळे टोक हादरत होते. मी मुठीत शेजारचे गवत घट्ट पकडले आणि स्तब्ध होऊन पाहत राहिलो. अगदी तालबद्ध पावले टाकत ती सिंहीण माझ्या दिशेने चालत आली. तिच्या थोराड मिश्यांच्या टोकाला दवाचे थेंब चिकटले होते, तिच्या पिवळ्याधमक डोळ्यांनी ती थेट माझ्याकडे बघत होती. मला डेलियाला उठवायचे होते; पण हालचाल करायची भीती वाटत होती.निव्वळ एकजोडी कपडे घेऊन धरतीवरच्या सर्वात मोठ्या अस्पर्शित वाळवंटात आयुष्याची सात वर्षे घालवणारं एक अद्भुत जोडपं..ज्यानं कालाहारीच्या वाळवंटातलं अनभिज्ञ प्राणीजीवन जगासमोर आणलं, अशा मार्क आणि डेलिया ओवेन्सचे चित्तथरारक अनुभवकथन.



No comments:

Post a Comment