Saturday, 2 July 2022

ध्यासपर्व


सेवासदनच्या संस्थापक रमाबाई रानडे...भारतातील पहिली डॉक्टर स्त्री आनंदीबाई जोशी...महर्षी कर्व्यांच्या कार्याशी एकरूप होऊनही स्वत्व जपणाऱ्या बाया कर्वे... विधवेच्या जिण्यातून बाहेर पडून समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या पार्वतीबाई आठवले...बालकवींसारखा प्रतिभावंत नवरा मिळूनही दु:खाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पार्वतीबाई ठोंबरे... ज्ञानकोशकार केतकर यांच्यासाठी परदेशातून इथे येऊन हिंदू झालेल्या आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचं जीवितकार्य पूर्ण करणाऱ्या शीलवती केतकर...भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी...स्त्रियांचे प्रश्न धीटपणे मांडणाऱ्या, काळाच्या पुढे असणाऱ्या देदीप्यमान लेखिका मालतीबाई बेडेकर...लेखिका, समीक्षक विदुषी कुसुमावती देशपांडे...`पाणीवाली बाई’ म्हणून मुंबईत प्रसिद्धीस आलेल्या मृणाल गोरे... उच्च कोटीचा कलाकार असूनही एकटेपण वाट्याला आलेल्या अन्नपूर्णादेवी...गोवा मुक्ती लढ्यात उडी घेणाऱ्या सुधा जोशी... एकूण बारा स्त्रियांच्या जीवनाचा आणि कार्यकर्तृत्वाचा सहृदयतेने घेतलेला वेध.BOOK REVIEWS

No comments:

Post a Comment