सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी द्वारा अनुवादित
'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' पुस्तकातील रंगतदार कथा...दाढीला लागली आग..
सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी द्वारा अनुवादित
'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' पुस्तकातील रंगतदार कथा...दाढीला लागली आग..
एस.एल भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित वंशवृक्ष या पुस्तकाचे अनंत कुलकर्णी यांनी केलेले अभिवचन
आऽऽऽऊऽऽ - हळुवार कण्हण्याच्या आवाजाने मी दचकलो. हळूच माझे डोके उचलून माझ्या पायांकडे बघितले. क्षणभर माझा श्वासच घशात अडकला. माझ्या पायांपलीकडे एक भली मोठी सिंहीण होती, कमीतकमी तीनशे पौंड वजनाची असेल. जमिनीवरून बघितल्यामुळे तर अजूनच मोठी दिसत होती. ती पंधरा फुटांवरून आमच्या दिशेने चालत येत होती. चालताना तिचे डोके एकीकडून दुसरीकडे हेलकावत होते आणि प्रत्येक पावलागणिक तिच्या शेपटीचे काळे टोक हादरत होते. मी मुठीत शेजारचे गवत घट्ट पकडले आणि स्तब्ध होऊन पाहत राहिलो. अगदी तालबद्ध पावले टाकत ती सिंहीण माझ्या दिशेने चालत आली. तिच्या थोराड मिश्यांच्या टोकाला दवाचे थेंब चिकटले होते, तिच्या पिवळ्याधमक डोळ्यांनी ती थेट माझ्याकडे बघत होती. मला डेलियाला उठवायचे होते; पण हालचाल करायची भीती वाटत होती.निव्वळ एकजोडी कपडे घेऊन धरतीवरच्या सर्वात मोठ्या अस्पर्शित वाळवंटात आयुष्याची सात वर्षे घालवणारं एक अद्भुत जोडपं..ज्यानं कालाहारीच्या वाळवंटातलं अनभिज्ञ प्राणीजीवन जगासमोर आणलं, अशा मार्क आणि डेलिया ओवेन्सचे चित्तथरारक अनुभवकथन.
किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयआयटी, दिल्ली येथून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार (सामाजिक शास्त्र विभाग) या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनियर टेनिस चॅम्पियन होत्या. आशियाई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले.