Saturday, 5 July 2014

द अॉक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

मी एकदा डॉ. मनमोहन सिंग यांना विनोदानं असंही म्हणालो होतो की, वाजपेयींच्या कारकिर्दीत त्यांचे मुख्य सचिव हे स्वत:च पंतप्रधान असल्याच्या थाटात वावरत असत आणि लोक तर डॉ. सिंग यांच्याबद्दल असं म्हणत की, पंतप्रधान स्वत:च मुख्य सचिव असल्यासारखे वागतात. अर्थात ही ‘प्रतिक्रिया’ डॉ. सिंग यांचा शिस्तप्रिय, काटेकोर स्वभाव, सर्व तपशिलांमध्ये जातीनं लक्ष घालणं, प्रशासकीय लहान-सहान बाबींमध्ये असलेला त्यांचा सहभाग, अधिकारी वर्गाबरोबरच्या त्यांच्या प्रदीर्घ, वंâटाळवाण्या बैठका या सर्वांमुळेच होती. वाजपेयी या अशा गोष्टी क्वचितच करत. अर्थातच या मल्लीनाथीकडे डॉ. सिंग नेहमीच दुर्लक्ष करत असत. प्रत्यक्षात राजकारणामध्ये सोनियाच वरिष्ठ आहेत, असं सुचित करणारं हे खोचक बोलणं आहे, याचीही डॉ. सिंग यांना पूर्ण कल्पना होती.

- संजय बारू  
   लेखक ( द अॉक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर )

No comments:

Post a comment