ब्रिटिश लेखक डेव्हिड मॅकी यांची लोकप्रिय ‘एल्मर द पॅचवर्क एलिफन्ट’ ही छोट्या मुलांसाठी असलेली चित्ररूपी पुस्तक-मालिका! मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने एप्रिल, २०१४ मध्ये या मालिकेची मराठी आवृत्ती ‘एल्मर एक पॅचवर्कवाला हत्ती’ या नावाने प्रकाशित करण्यात आली.
‘एल्मर’ हा एक रंगीबेरंगी हत्ती! त्याचं अंग पिवळा-नारिंगी-लाल-गुलाबी-जांभळा-निळा-हिरवा-काळा आणि पांढरा अशा विविध रंगांनी (पॅचवर्क) नटलेलं आहे. त्याचा स्वभावही आनंदी आणि आशावादी आहे. त्याला रोजच्या अनुभवातील विनोद (प्रॉqक्टकल जोक्स) खूप आवडतात.
या मालिकेतील सर्व कथा ‘एल्मर’च्या चातुर्यावर त्याच्या बौद्धिक कौशल्यावर आधारित आहेत. ज्याद्वारे हत्तींच्या कळपात राहूनही ‘एल्मर’ आपले वेगळेपण दाखवून देतो. त्याने आपल्या शरीरावर केलेल्या रंगीबेरंगी नक्षीकामामधून – ‘पॅचवर्क’मधून – विविधतेचं महत्त्व पटवून दिलं आहे. एल्मरनं केलेला हा बदल त्याच्या दोस्तांना मात्र रुचत नाही. त्याने आपल्या शरीरावर केलेल्या पॅचवर्कमुळे ते ‘एल्मर’ला ओळखूच शकत नाहीत. ते त्याला आपल्या कळपात सामावून घेण्यास नकार देतात. अशाप्रकारे त्याचे जुने दोस्त जणू त्याच्यावर बहिष्कारच टाकतात. त्यामुळे एल्मर दु:खी होतो....
जेव्हा पाऊस सुरू होतो... तेव्हा ‘एल्मर’चा रंगीबेरंगी रंग नष्ट होतो आणि तो पुन्हा त्याच्या मूळ रंगात म्हणजेच त्याच्या मूळ रूपात परत येतो. त्याला असे पाहून त्याच्या दोस्तानांही आनंद होतो. ते सर्व मिळून ‘एल्मर’ला धीर देतात की, ‘ते त्याचा द्वेष करत नाहीत, तर उलट ते सर्व जण त्याच्यावर प्रेमच करतात. कारण की, तो सर्वांहून वेगळा आहे. त्यानंतर त्याचे दोस्तही एकसारखे दिसण्यासाठी स्वत:ला ‘एल्मर’सारखे रंगीबेरंगी रंगात रंगून घेतात....
No comments:
Post a Comment