श्री राजन गवस

गवस मुळचे गडहीग्लज करबळीचे. राजन गवसांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पी.एचडी मिळवली. गवस पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. त्यानंतर गारगोटी या गावी असणाऱ्या मौनी विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडाराभोग' या दोन कादंबऱ्या देवदासी व जोगव्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावयातील मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवादही झाले.
No comments:
Post a Comment