Wednesday, 23 July 2014

व्हर्चुअल् रिअलिटी - श्री दिगंबर वि. बेहेरेश्री दिगंबर वी.  बेहेरे 
कॅप्टन नितीन जोशी यांच्याशी माझी ओळख एका छोटया अपघातानेच झाली. आम्ही महाबळेश्र्वरला गेलो होतो. संध्याकाळी चार साडेचारची वेळ असेल. बरोबरीचे सर्वजण मार्केट मध्ये फिरायला गेले होते. मी मात्र मागे राहुन शेवटची ही संध्याकाळ हा.टेलच्या स्वीमिंग टॅंक मध्येच काढावी म्हणुन डुंबायला उतरलो. टॅंक मध्ये त्यावेळी साधारण माझ्याच वयाचे एक गृहस्थ पोहत होते. मी हाय करून डुंबु लागलोे. थोडया वेळाने त्या गृहस्थांनी हाक मारली. “सुबोध, मी इथे आहे.” मी वळुन पाहीले. चार ते पाच वर्षाचा एक मुलगा आपल्या आजोबांना भेटण्याच्या आनंदात स्वीमिंग टॅंककडे झेपावला.त्याने सरळ पाण्यात उडी मारली ती माझ्याच अंगावर आली. मी अर्थात त्याला लगेचच खांद्यावर घेतला. आजोबाही लगेच जवळ आले. त्याला अलगत त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि मला म्हणालेहा माझा नातु सुबोध.आपल्याला त्याची लाथ वगैरे लागली नाही ना?”  मी म्हटलेनाही हो. माझाही नातु एवढाच आहे.”  हीच आमची ओळख.

पाण्याबाहेर आल्यावर तिथेच आम्ही कॉफी घेतली. त्यावेळी आमची अधिक ओळख झाली. गप्पा मारतांना लक्षात आले कि कॅप्टन नितीन इंडियन एअर लार्इन्स मधुन निवॄत्त झाले होते.बासष्ट सालच्या युध्दानंतर एअरफोर्स मध्ये कमिशन्ड .फिसर म्हणुन त्यांची निवड झाली होती.तिथेच वैमानिक होऊन   पंधरा सोळा वर्ष त्यानी देशाची सेवा केली. दिल्ली, चंदिगड, आसाम अशा अनेक ठिकाणी त्यांनी डयुटी केली होती. निवॄत्तीनंतर त्याना इंडियन एअरलार्इन्स मध्ये कमर्शियल पायलट म्हणुन इंडक्ट करण्यात आले. शेवटी त्याही सव्र्हीस मधुन ते मुंबर्इतुन निवॄत्त झाले. त्यांचा मुलगा अशोक आयआयटीतुन बी. टेक्. झाल्यावर अमेरिकेत एमेस् करण्याकरता गेला होता. एरा.ेना.टिक्स इंजिनिअरींगमध्ये पुढे डा.क्टरेट केल्यावर तिथेच सेटल् झाला. त्याची पत्नी मानसी सातारची. तिच्याच आग्रहावरून ते सर्वजण महाबळेश्वरला आले होते.

माझाही मुलगा अमेरिकेत असतो. त्याच्या कडे दोनतीन वेळा जाणे झालेले होते. प्रत्येक वेळी  मुंबर्इला रात्रीच्या वेळेला उतरतांना मुंबर्इ तर वरून बहारदार दिसतेच पण मनात येर्इ कि एवढया अवाढव्य पसरलेल्या दिव्यांच्या पसाळयात  वैमानिकाला विमानतळ कसा शोधता येत असेल? आणि त्यातही धावपट्टी नेमकी कशी ओळखता येते? कॅप्टन नितीन यांची ओळख झाल्याने मनातल्या अशा शंकांचे आज निरसन करून घ्यावे असे मला वाटले.

कॅप्टन नितीननी सांगितलेल्या गोष्टीचा सारांश असाभारताच्या वायु हद्दीत प्रवेश करणारे प्रत्येक .ब्जेक्ट मा.निटर केले जाते. माननीय श्री अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना पाकिस्तानचे एक विमान कच्छ मध्ये आपल्या वायु हद्दीत शिरतांशिरताच कसे पाडले गेले होते याची मला त्यावेळी आठवण झाली. मुंबर्इ एअर ट्र.फिक कंट्रोलरच्या संपर्कात येताच वैमानिकांना आपले फलार्इट आयडेंटिफाय करावे लागते. उजवीकडे बसलेला सहवैमानिक (कोपायलट) हे करतो. तो Íिक्वेंसी मा.निटर करीत असतो. रेडियोवरून कंट्रोलशी संपर्क साधतो. कॉम्प्युटरचा वापर करतो, प्रवाशांना वेळोवेळी सूचना देतो वगैरे. स्वत:ला आयडेंटिफाय करून कंट्रोलला विमानाची वस्तुस्थिती, म्हणजे समद्रसपाटीपासुनची उंची आणि इतर माहिती पुरवल्यावर आपल्याला टा.वरकडुन सूचना येतात.उदाहरणार्थ, सुचना असू शकते कि उजवीकडे (किंवा डावीकडे) अमुक अमुक डिग्री वळुन अमुक अमुक फुट उंचीवर विमान उतरवा वगैर. विमान एअरपोर्ट पासुन शंभर एक  किला.मिटरच्या आसपास असतांना सर्वसाधारणपणे हा संवाद घडत असतो. एअर ट्र.फिक कंट्रोल कडील रडार  विमानतळाकडे येणा-या आणि विमान तळावरून जाणा-या विमानांकरता जहाजाच्या लार्इट हाऊसचे काम करतो. अर्थात वैमानिकाच्या चार्ट मध्ये विमान तळाचे अक्षांश रेखांशासह बरीच माहिती असतेच, शिवाय  विमानतळावर एकाच वेळी हिरव्या पांढ-या रंगाचे लार्इट, बीकन लार्इट ज्याला म्हणतात ते सारखे फल. होत असतात. ते कमर्शियल विमानतळाची खूण म्हणुन असतात. त्यामुळे विमानतळ रात्रीच्यावेळी ओळखणे सोपे जाते. शिवाय वैमानिकाचा नेहेमीचा सरावही असतोच. त्यामुळे एअर ट्र.फिक कंट्रोलशी संपर्क झाल्यानंतर साधारण अध्र्या तासात धावपट्टी मार्क करणारे पांढ-या रंगाच्या दिव्यांचे लांबचलांब पसरलेले पट्टे दिसतात. धावपट्टीच्या टोकाला  “टच् डाऊन झोनअसतो. धावपट्टीच्या अगोदरचा पाचशेफुटाचाथ्रेशोल्डसंपल्यावर धावपट्टी सुरू होते.तिथे .प्रोच लार्इटच्या हिरव्या रंगाची आडवी पट्टी दिसते. टच् डाऊन झोन मध्ये प्रत्येक पाचशे फुटावर उभे पांढरे पट्टे असतात ते तीनहजार फुटापर्यंत असतात. धावपट्टीच्या दोन्ही अंगाना पांढरे दिवे असतात. शिवाय मधली पट्टीही पांढ-या रंगात प्रकाशित ठेवलेली असते. पहिल्या तीन हजार फुटापर्यंत पांढरे दिवे, पुढील दोन हजार फुटापर्यन्ंत पांढरा लाल पांढरा असे दिवे पुढे धावपट्टी संपेपर्यन्त लाल रंगाचे दिवे ती प्रकाशीत करत असतात. “इंस्ट्रुमेंट .न्डिंग सिस्टीमच्या सहाय्याने लॅंडिंग सहज करता येते.

तुम्ही एअर फोर्सची फायटर विमाने चालवीत होतात त्यात आणि कमर्शियल एअरक्रफट चालविण्यात फरक काय ?” मी.

फायटर विमाने तशी आकाराने लहान आणि हलकी असतात. वैमानिक स्वत: सर्व गोष्टी करीत असतो. फायटर एअर क्रॅफ्ट चालवताना आणि विषेशत: शत्रुच्या विमानाचा पाठलाग करतांना तर अंगात रग असतेच पण तिथली शिस्तही वेगळी असते. कमर्शिअल एअर क्रॅफ्ट आम्ही सहज चालवु शकतो. पण ती आकाराने आणि वजनानेही मोठी असतातत्यात  कंट्रोलही जास्त असतात. म्हणुनच कॅप्टन सहवैमानिकाची योजना केलेली असते. आपल्या बरोबरच्या चारशे पांचशे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्र्न असतो. तिथे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आणि पुस्तकाबरहुकुम गोष्टी होणे महत्वाचे असते. म्हणुनच कमर्शियल पायलटचे वेगळे लायसन्सही घ्यावे लागते.

अवजड विमान चालवण्या पूर्वी प्रथम आम्हा प्रत्येकालाच फलार्इट सिम्युलेटर मध्ये सराव करावा लागतो. फलार्इट सिम्युलेटर ही  एअरक्रॅफ्टच्या कॉकपिटची जमिनीवरील सही सही नक्कल असते. आंत गेल्यावर  अजिबात सांगता येत नाही कि आपण विमानाच्या कॉकपिट मध्ये बसलो आहोत कि सिम्युलेटर मध्ये. सर्व कंट्रोल तसेच्या तसे असतात. कंट्रोल व्हील मागे खेचल्या बरोबर तुम्ही टेकआ.फ् घेता. खिडकीतुन बाहेर पाहिलेत तरी तुम्ही हवेत वर वर जात असल्याचे जाणवते. ढगातुन जातांना विमान जसे हादरते तसेच तिथेही जाणवते. थोडक्यात सर्व अनुभव तंतोतंत विमानातल्या सारखेच आसताात.” आमच्या गप्पा चांगल्याच रंगत चालल्या होत्या. पण त्यांच्या कुटुंबियांकडून सूचना मिळाल्यामुळे लवकरच आम्हाला आटोपते घ्यावे लागले.

कॅप्टन नितीन यांनी सांगितलेला फलार्इट सिम्युलेटर मधला वैमानिकाचा अनुभव मात्र माझ्या डोक्यात नंतर बराच वेळ घोळत होता.थिअेटर मध्ये सिनेमा पहाताना नाही का आपल्याला तसाच अनुभव येत. आपल्याला माहित असते कि आपल्या समोर फक्त चित्र हालत आहेत. पण तरी सुध्दा विषेशत: तो सिनेमा जर चांगला असेल तर कित्येकदा आपण स्वत:ला विसरून चित्रपटातल्या त्या पात्रांच्या सुखदु:खात एकरूप होत असतो. तिथे आपण रडतो, हसतोघाबरतोही. किती तरी वेळा दात ओठ खाऊन आणि अगदी हाताच्या मुठी आवळुन  एखाद्या पात्राचे वार्इटही चिंतितो. चित्रपट जेव्हां आपल्याला तेवढा पसंत पडत नाही तेव्हा अधुन मधुन भानावर येऊन आपण आजुबाजुला पहातो. इतर लोक  वासून तो पहात आहेत असे दॄष्य दिसते. प्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतिकारक प्रगतीने त्रिमिती सिनेमा,आयम.क्स, आयम.क्सडोम आणि त्रिमिती आयम.क्स सिनेमा प्रक्षेपणांतुन प्रेक्षकांना जबरदस्त अनुभव मिळवून देतात यात शंकाच नाही. थोडक्यात सिनेमा पाहताना कित्येकवेळा आपले बदललेले वास्तव आपण अनुभवतो.

मात्र तरीहि कोणताही चित्रपट पहात असतांना त्यामध्ये आपल्या समोर घडणा-या गोष्टीत आपला सहभाग असत नाही. आपण जे घडते त्याचे फक्त साक्षीदार असतो. चित्रपटाला एक कथा असते आणि प्रत्येक वेळी तशाच सर्व घटना त्या चित्रपटात घडत रहातात.पण फलार्इट सिम्युलेटरमध्ये तसे होत नाही.तिथे वैमानिकाने कंट्रोल व्हील मागे खेचल्या बरोबर विमान टेक . घेतल्याचे जाणवते त्याचा अनुभव मिळतो.म्हणजे त्याने निर्णय करून केलेल्या कृतीच्या परिणाम स्वरूप जणु त्याच्या ओवती भोवतीच्या वास्तविक जगातच बदल होत आहेत असे त्याला अनुभवायला मिळते.आणि वैमानिक ते बदल स्वत: कृति करून घडवून आणित असतो. यामुळेच फलार्इट सिम्युलेटरने माझी उत्सुकता वाढवली. त्याचे कारण म्हणजे वैमानिकाच्या सहभागामुळे फलार्इट सिम्युलेटर मधला अनुभव, चित्रपटगॄहातील चित्रपटा पेक्षाव्हर्चुअल रिअॅलिटीच्या जास्त जवळ जाणारा आहे.

व्हर्चुअल रिअॅलिटीम्हणजे संगणकाच्या सहाय्याने दॄकशाव्य माध्यमातुन कोणत्याही वातावरणाचा इतका हुबेहुब आभास निर्माण करायचा कि त्यात असताना जणु आपण त्या वातावरणात होणा-या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असेच तो घेणा-याला वाटावे इतका तो प्रभावी करण्याचे तंत्र असे म्हणता येर्इल. हे तंत्र करमणुक क्षेत्रात, थेरपीच्या क्षेत्रात आणि कौशल्य कमावण्याच्या किंवा वाढविण्याच्या क्षेत्रात वापरले जाते. फलार्इट सिम्यलेटर हे त्यातलेच एक उदाहरण म्हणता येर्इल. व्हर्चुअल रिअॅलिटी मध्ये आंधळी कोशिंबिर खेळताना जसे डोळयावर झापड बांधले जाते तसे एक हेल्मेट वापरले जाते. त्यामध्ये कॉम्प्युटर स्क्रीन डोळयावर असतो आणि स्टिरिओफोनिक साऊंड ऐकण्याकरता कानांवर हेडफोन असतात. आपण ज्या वातावरणात जाणार असु त्याचा संपूर्ण सीन  कॉम्प्युटरच्या स्क्रीन वर आपल्याला दिसतो. कारण संपूर्ण डाटा कॉम्प्युटरच्या सिप्यिु मध्ये ग्रथित केलेला असतो. चित्रपटा प्रमाणे येथे कथा नसते. आपण डोके फिरवुन ज्या प्रमाणे आपल्या आजुबाजुचे दॄष्य प्रत्यक्षात न्याहाळतो त्याच प्रमाणे व्हर्चुअल रिअॅलिटी मध्येही डोके फिरवना, हालचाली करताना दिसणारी दॄष्यें कॉम्प्युटर स्क्रीनवर आपण न्याहाळतो आणि आवाजही ऐकतो. उदाहरणार्थ,, आपण जर पॅरॅशुट मधुन विमानातुन उडी मारण्याचा जमिनी लगदच अनुभव घ्यायचे ठरवले  तर व्हर्चुअल रिअॅलिटी सारखे दुसरे माध्यम नाही. पॅरॅशूट मधुन उतरणा-या सैनिकाला जो अनुभव येर्इल अगदी तसाच अनुभव कोणालाही घेता येतो. विमानातुन उडी मारल्या पासुनच्या उंची पासुन जमिनीला आपले पाय टेके पर्यन्तची सर्व दॄष्ये दिसतात.उतरताना इकडे तिकडे पाहिल्यावर आकाशातील, जमिनीची आणि अगदी आपल्या शरिराच्या दॄष्य भागाची सुध्दा सर्वच्या सर्व दॄष्ये त्यांच्या अनुभवांचे परिणाम कॉम्प्युटर मध्ये ग्रथित केलेले असतात. ते आपल्याला अनुभवता येतात. ..शुट मधुन उडी मारण्याच्या अनुभवा प्रमाणे दुसराही एखादा अनुभव आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण खोल महासागराच्या तळाशी जाऊन तिथल्या विश्र्वाचा अनुभवही घेऊ शकतो. थोडक्यात व्हर्चुअल रिअॅलिटी अनुभवणारी व्यक्ति  फलार्इट सिम्युलेटर प्रमाणे स्वत: त्या घडणा-या घटनांमध्ये सहभागी होते.

आपल्याला निसर्गदत्त पाच ज्ञानेंद्रिये लाभलेली आहेत. त्वचा, ज्याने स्पर्श ज्ञान होते. नासिका, नाकाने आपण श्र्वास गंध घेतो. चक्षु, आपण सर्व जग पहातो. कर्ण, ज्याने आपण श्रवण करतो आणि जिव्हा ज्याने आपण रस आणि स्वाद घेतो. ह्मा इंद्रियां मार्फत आपण शरीरा बाहेरील  जग अनुभवतो. मात्र  व्हर्चुअल रिअॅलिटी ही यापैकी दोनच इंद्रियंाना, म्हणजे डोळे आणि कान, यांनाच फक्त बाहेरून कृत्रिम संवेदना पुरवुन आपल्या अनुभवाला येते. मग आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना बाहेरील संवेदना पोचवणारी अशी एखादीव्हर्चुअल रिअॅलिटीअसु शकेल काय कि जिच्या मध्ये आपण त्यातील पात्रांना पाहु शकु, त्यांच्याशी बोलु शकु नि ती पात्रेही आपल्याशी बोलतील ते आपण ऐकु शकु, त्यानां स्पर्श करू शकु ती ही आपल्याला स्पर्श करतील, ज्या मधे आपण खाणे खाऊ शकु  आपल्याला पोट भरलेले अनुभवता येर्इल, आपण चालु शकु, पळु शकु , खरेदी विक्री सारखे व्यवहार करू शकु वगैरे? हो. असु शकेल काय आहे. ती आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अनुभवीतच जगत असतो. मात्र आपल्याला तीव्हर्चुअल रिअॅलिटीवाटत नाही तर आपले ते खरेखुरे  वास्तव असते.*या वास्तवात आपण प्रत्येक क्षणाला कोणता तरी निर्णय घेऊन हालचाली आणि कृती करतो  त्यामुळे बाहेरच्या जगात कांही तरी घडत असते. त्याचे दॄष्य परिणाम कांही वेळा आपल्याला तत्क्षणी, तर कधीं कधीं कांही वेळे नंतर पण आपल्याला अनुभवयला मिळतात. आपल्या कडुन निर्णय आणि कृती अनिच्छेने किंवा अजाणतेपणी झाली तरीही त्याच्या परिणाम स्वरूप झालेले बदलही अनुभवावे लागतात.

कोणत्याही व्यक्तिला जर त्याच्या वास्तवातील, म्हणजेच त्याच्या स्वत:च्या प्रत्यक्ष जीवनात येत असलेले, अनुभव बदलायचे असतील तर त्याने आपले निर्णय बदलुन कृती करायला हवी पॅरॅशुट मधुन उडी मारण्याचा निर्णय बदलुन आपण महासागराच्या तळाशी काय आहे ते अनुभवण्याच्या निर्णय करण्या सारखेच आहे हे. स्वत:चे वास्तव बदलु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तिने निर्णय घेऊन कृती करायची आहे म्हणजे बाहेरील जगात त्या कृतीने बदललेले वास्तव त्याला अनुभवायला मिळेल. आणि निर्णय बदलले नाहीत तर? तर काय होते *याची अनेक उदाहरणे आपण नेहेमी सर्वत्र पहात असतो. उदाहरणार्थ, आपण अनुभवतो कि चिडखोर माणसे चिडचिड करीतच राहिलेली दिसतात. भित्री माणसे घाबरलेलीच रहातात. हे सर्व कशामुळे? कित्येकवेळा त्याचे एक प्रमूख कारण त्यानी निर्णय बदलणे हे असते. अर्थात त्यांना मात्र आपण निर्णय बदलत असतो असेच नेहेमी वाटत असते असेही अनेकजणाच्या बोलण्यात आल्याचे आपण पहातो. मात्र कित्येकदा प्रत्यक्षात परिस्थिती बदलत असते आणि निर्णय मात्र बहुतांशी सवर्इनी तेच तेच असतात असेही दिसते. अर्थात चिडखोर माणसे कोणावर चिडलेली आहेत किंवा भित्री माणसे कशाला घाबरत आहेत हे महत्वाचे नाही. पण ती चिडलेली असणे किंवा घाबरलेली असणे हे महत्वाचे.चिडायचे नाही किंवा घाबरायचे नाही हा निर्णय सर्वस्वी चिडखोर व्यक्तिंनी अंर्तमुख होऊन स्वत:च्यास्वत: करायचा असतो. असा निर्णय केला कि वास्तव ही बदलते. कोणते निर्णय करीत आहोत हे निर्णय करणा-याच्या संपर्कात येणा-या इतर प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या बरोबरच्या व्यवहारा वरून, त्याच्या विषयींच्या त्यांच्या मतां वरून ठरविता येते. इतरांच्या त्या व्यक्ति विषयींच्या मतांमध्ये त्याच्या निर्णयांचे प्रतिबिंब पडलेले असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तिच्या सानिध्यात येणा-या व्यक्तिंपैकी कित्येक माणसे ही चिडचिड करणारी आहेत असे ज्यावेळी त्याच्या लक्षात येते तेव्हा आपण स्वत: तर चिडखोर नाहीना असा प्रश्र्न त्याने स्वत:ला विचारून त्याचे काय उत्तर मिळते हे पाहिले पाहिजे. आणि त्याचे उत्तर जर होकारार्थी असेल आणि आपले वास्तविक जग बदलणे आवश्यक आहे अशी त्याच्या मनाची खात्री झाल्यावर त्याने आपले निर्णय तपासुन बदलले पाहिजेत.

विषेशत: आर्थिक चणचणीमुळे गरीबीत दिवस काढीत असलेल्या कित्येक कुटुंबांची अशा प्रकारे वेळीच निर्णय घेऊन आपले वास्तव बदलण्याची क्षमता अधिकच कमकुवत झालेली असते. याचे एक कारण इच्छा असूनही कित्येकांच्या बाबतीत डोक्यात राख घालुन निर्णय घेतल्यास सर्व डावच उधळला जार्इल की काय अशी भीति असते. म्हणुन कित्येकवेळी निर्णय घेतलेच जात नाहीत. किंवा चुकीचे निर्णय घेऊन कित्येकजण कर्जबाजारी होतात किंवा व्यसनी होतात. त्यामुळे निर्णय बदलण्याची क्षमता आणखीनच क्षीण होत जाते. त्यातील कांही व्यक्ति तर आत्महत्येस प्रवॄत्त होतातकांही जणांच्या जीवनपटातील इतर पात्रेच एखाद्याला आत्महत्येस प्रवॄत्त केल्याचीही उदाहरणे क्वचित् कानांवर येतात. महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात मोठया प्रमाणावर झालेल्या आत्महत्यांच्या मागे अशीच काही कारणे असावीत.

परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा स्वयंस्फूर्तितून पण जाणीव पूर्वक कृति करून स्वत:चे  वास्तव बदलुन टाकले आहे अशी अनेक उदाहरणे आपला इतिहासात  दिसतात. कित्येक शतकां पूर्वी प्रभू श्रीरामचंद्राना दक्षिणेकडे मुलुखगिरी करणे भाग पडले होते. त्यामुळे त्यांचे बदलेले वास्तव हे रामायण आपण सर्वजण जाणतोच.समर्थ रामदासांनी तर आपले वास्तव स्वत:चे स्वत: घडवण्याचा  निर्णय  अगदी लहानपणीच घेतला होता.अगदी अलिकडील तशी उदाहरणे सांगायची म्हणजे महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत विनोबा भावे, डा..बाबासाहेब आबेडकर, स्वतंत्रता संग्रामाच्या चळवळीत स्वत:ला झोकुन दिलेले अगणित लोक, डा..बाबा आमटे, सुधीर फडके अशी कितीतरी नावें सांगता येतील

आपल्या ज्ञानेंद्रियांत कोणत्याही कारणाने जेव्हां बिघाड होतो तेव्हां आपले अनुभव विश्र्वही बदलते हे आपण जाणतोच.मुके बहिरे आणि आंधळयांचे जग वेगळे असते. आजारी पडल्यावर कितीतरी वेळा आपल्या तोंडाची चव बदलल्याचे आपण अनुभवतो. भाजल्यावर किंवा जखम झालेल्या भागात आपल्या स्पर्श ज्ञानाच्या जाणिवाही कमकुवत झालेल्या आपणाला जाणवतेज्ञान हे मेंदु मध्ये साठवले जाते प्रत्येक व्यक्ति आपआपल्या ज्ञानाचा उपयोग करीत निर्णय घेऊन कृती करीत असते. मात्र मेंदुला जेव्हा इजा होते किंवा जन्मजात त्यामध्ये जेव्हां कांही दोष असतो, तेव्हा त्या व्यक्तिचे जीवन ही सर्वसामान्यांच्या तुलनेत पूर्णपणे बदललेले असते. उदाहणार्थ, पॅरॅप्लेजिया आणि सेरेब्रल पाल्सीने आजारी व्यक्तिंचे जग वेगळे असते. तसेच मतिमंदता(मेण्टल रिटार्डेशन) आणि आॅटिझम् हेही मेंदुशी निगडीत असलेले आजार आहेत. ते सुध्दा जन्मजात असू शकतात. अशा व्यक्तिंचे जगही सर्वसामान्यांच्या जगापेक्षा वेगळे असते हे आपण जाणतो. मेंदु मध्ये जडणघडण ही सतत होत असते. मेंदूसंरचना शास्त्रज्ञ डाॅ. मेरियन डायमंड यांनी त्यांच्या लॅब मधील कोणत्याही वयाच्या उंदिरांवर प्रयोग करून असे दाखवून दिले कि ज्या उंदिरांचे कुपोषण होते. ज्यांना पिंज-यात नीट बसायला जागाही नसते. खेळायला सवंगडीही कमी आहेत. सर्वत्र एक प्रकारचेच पिंजरे असतात आणि ज्यांच्याकडे लक्षही तुलनेने कमी पुरवले जाते अशा उंदिरांच्या तुलनेत, ज्या उंदिरांच्या आजुबाजुचे वातावरण भरपूर खेळायला आणि बागडायला वाव देणार आहे भीति कमी करून ज्यांचे वातावरण कुतुहल वाढवणा-या वस्तुंच्या विविधतेने भरलेले आहे ज्यांना मिळणारा आहार चांगल्या प्रतीचा आहे  मिळणारी वागणुक ही प्रेमळ आणि चांगले संगोपन करणारी आहे  त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत विषेश प्रकर्षाने वाढ होते. म्हणुनच आपण सर्वानीच कमितकमी आपआपल्या संपर्कात येणा-या सामान्यत: सर्वच व्यक्तिंबरोबर व्यवहार करतांना पण विषेशत: मेंदूला इजा झालेल्या किंवा जन्मजात मेंदूमध्ये दोष असलेल्या व्यक्तिंचे बरोबर वागतांना सहसंवेदनशील मनाने व्यवहार करून एकमेकां मधील वातावरण उत्साहवर्धक कसे राहील याकडे लक्ष पुरवणे हेच सर्वात जास्त हितकारक आहे.

मेंदू मध्ये जन्मजात दोषच निर्माण होतात असे नाही. आपल्याला सहसा कल्पनाही करता येणार नाही इतके त्याच्या कार्यशक्तिचे अद्भुत नमूनेही क्वचित् आपल्याला दिसतात. “मानवी संगणकशकुन्तलदेवी चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे. असेच दुसरे एक नाव आहे स्टीफन विल्शायर नामक व्यक्तिचे. लंडन मध्ये रहाणारा स्टीफन विल्शायर, जन्म 1974, हा जन्मा पासून ठार मुका आहे. शिवाय वयाच्या तिस-या वर्षी तो .टिस्टिक आहे म्हणुन त्याचे निदान केले गेले होते. पण तो एक निष्णात चित्रकार आहे. इतका कि  “युमन कॅमेराम्हणुनच तो ओळखला जातोतो जे पहातो त्या गोष्टीचे हुबेहुब चित्र त्यातील कोणतीही गोष्ट परत बघता तो काढतो. हेलिकॉप्टर मध्ये बसवुन शहरावरून नुसती एक फेरी मारून आल्यावर रोम, टोकियो हा.न्गकॉन्ग सारख्या शहरांच्या त्याने एकदाच पाहिलेल्या सर्व इमारतींसह संपूर्ण .ण्डस्केप त्याने परत आल्यावर भिंतीवर काढल्याच्या चित्रफितीयू टयूबच्या वेब सार्इटवर उपलब्ध आहेत. *यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि सर्व सामान्यपणे आपण सर्वजण जे पहातो त्या सर्व गोष्टींची नांेद आपल्या मेंदुमध्ये सुध्दा होत असते पण त्यातील बहुतेक सर्व निरर्थक भाग आपल्या स्मॄतितून गळुन जात असतो.

आपल्या ज्ञानेंद्रियानी ग्रहण केलेल्या संवेदना आपल्या मेंदुतील त्यांच्या संवेदना केंद्रांत नोंदवल्या जातात त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच आपल्याला ज्ञान झाल्याचे, समजल्याचे, ध्यानात आल्याचे आपण मानतो. पण आपल्याला ज्ञान होते म्हणजे नेमक काय होते हा एक फारच गहन असा संशोधनाचा विषय आहे. अमेरिकेतील फा.रिन पा.लिसी नामक मासिकाने जगातील अव्वल दर्जाच्या शंभर विद्वानांची एक सूची मे 2008 मध्ये प्रसिध्द केली आहे. त्यात .लिफोर्नियाच्या सॅन डिॅगो विश्र्वविद्यालयाच्या सेंटर फाॅर ब्रेन अॅण्ड कॉगनिशन या संस्थेचे डायरेक्टर, मूळचे भारतीय, डाक्टर विलयानुर रामचंद्रन् यांच्या मते आपण जे बा* जग नजरेने सतत टिपीत असतो त्यादॄष्टीच्या संवेदनांची नोंद, विश्लेषण आणि त्यानुसार आज्ञा देणे इत्यादि अनेक गुंतागुंतीच्या संवेदनांचे ज्ञानात रूपांतर करणारी अशी एकुण तीस संवेदना केंद्रे आपल्या मेंदुमध्ये कार्यरत असतात.मेंदुला इजा झाल्यास इजा कोणत्या केन्द्राला कशी झाली आहे वगैरे गोष्टींवर त्या  व्यक्तिचे बदलेले वास्तव अवलंबुन असतो. डाॅक्टर रामचंद्रन् यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलेले हे उदाहरण फार बोलके आहे. त्याच्याकडे आलेल्या एका पेशंटला आपल्या स्वत:ची आर्इ समोर बघुन ओळखता येत नव्हती. ती आपल्या आर्इसारखीच दिसणारी पण कोणीतरी अनोळखी स्त्री आहे असा त्याचा समज होत असे. तिच्या जवळ टेलिफोनवरून बोलतांना मात्र आपल्या आर्इशी ज्या आपुलकीने माणुस बोलतो तसा तो बोलत असे. त्या व्यक्तिला झालेल्या अपघाताने त्याचे ते चेहेरा ओळखणारे विशिष्टदॄष्टीकेंद्र आणि आर्इ या नात्याशी निगडीत असलेल्या भावना मेंदुच्या ज्या केंद्रात सामावलेल्या असतात किंवा प्रभावित केल्या जातात, ज्यालालिंबिक सिस्टीमअसे संबोधले जाते, यांच्यातील दुवा असलेल्या सर्किटची पार मोडतोड झालेली होती. मात्र तशाच प्रकारचे श्रवण केंद्र आणि लिंबिक सिस्टीम  यांच्यातील सर्किट शाबुत होते. अशा प्रकारची फार नाजुक ठिकाणी इजा झालेल्या व्यक्ति स्वत:ला देखील आरशात पाहुन ओळखत नाहीत. म्हणजे अपघाताने त्यांचे वास्तव किती बदलु शकते याची कल्पना येर्इल.

मेंदुवर जेव्हा आघात होतो किंवा अपघातात त्याला इजा होते तेव्हा निसटलेत्या त्या क्षणी व्यक्तिला आपल्या विश्र्वात नेमके काय बदल होत आहेत, आपली रिॅलिटी कशी बदलते आहे हे समजून घ्यायला वेळच नसतो. त्याला कांही समजायच्या आतच एका झपाटयात ती घटना घडुन जाते. पण जेव्हा एखाद्याला स्ट्रोक येतो तेव्हा त्याच्या वास्तवात होणारे बदल त्यामानाने संथ गतीने  घडत असतात. ती व्यक्ती कावरी बावरी होते. घाबरते. पण कांही वेळेला त्या व्यक्तीला मूर्छा वगैरे आल्यास, आपल्याला काय होते आहे याचे थोडे फार वर्णन त्याला करता येणे शक्य होते. असेही दिसून आलेले आहे कि अश्या स्ट्रोक मधुन सहीसलामतपणे बरे झालेले पेशंट स्ट्रोक आला त्यावेळी आपल्याला काय झाले होते हे ते विसरूही शकत नाहीत. तेव्हा अशा प्रकारचा स्ट्रोक जर एखाद्या मेंदु शास्त्रज्ञाला आला तर? आणि आल्यावर नेमके काय होते आहे याचे ज्ञानही त्याला होर्इल का?असे मनात येणे साहजिक आहे. अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता किरकोळ असली तरी अशक्य नक्कीच नाही. सुदैवाने मेंदुवर विषेश संशोधन करीत असलेल्या शास्त्रज्ञ डा.क्टर जिल् बोल्ते टेलर यांचे भाषण जेव्हा मी ऐकले तेव्हा मला समजले कि त्यांच्या बाबतीत नेमकी अशीच घटना घडली आहे. डा.. टेलर यांनी हार्वर्ड विद्यापीठातुन न्यूरोअनाटा.मी(मेंदुसंरचना शास्त्र) विषयात शिक्षण घेतले. सध्या त्या इंडियाना विद्यापीठातील मेडिसीन विभागात शिकवितात. 1994 मध्येनॅशनल अलायन्स . मेन्टल इल्नेसच्या डायरेक्टर बोर्डावर त्यांची निवड झाली होती. मेंदुचे पोस्टमार्टेम हा त्यांचा विषेश अभ्यासाचा विषय आहे. डिसेंबर 10, 1996 रोजी त्या एकटयाच घरी होत्या. सकाळी उठल्या उठल्या  त्यांच्या डाव्या मेंदूतील नस तुटुन तेथे रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतरच्या चार तासातच त्यांचे वास्तव क्षणक्षणाला बदलत गेलेले त्यानी अनुभवले. या अवधीत त्यांच्या मेंदुचे कार्या मध्ये इतक्या पराकोटीचा बिघाड झाला कि त्याना चालण्या बोलण्या पासुन ते लिहिण्या वाचण्या पैकी कोणतीही गोष्ट करणे अगदी दुरापास्त होऊन बसलेआपल्या स्ट्रोकचा त्यानी स्वत:हुन कसा शोध घेतला त्याची ही त्यानी आपल्या भाषणात सांगितलेली गोष्ट.

प्रथम डा..टेलर यांच्या डाव्या डोळयाच्या बरोबर मागे सुर्इने टोचल्यासारख्या तीक्ष्ण वेदनानी त्याना जाग आली. थोडा वेळ तिथे दुखायच आणि मग धोडा वेळाने ते थांबायचे असे होऊ लागले.त्यांचा डावा डोळा सारखा फडफडत होता. तोंडाला अनोळखी चव आल्या सारखे वाटलेपूर्वी फारशा कधी आजारी पडल्यामुळे या सर्वच गोष्टी त्याना तशा अनोळखी होत्या. व्यायाम केल्यावर कदाचित या वेदना नाहीशा होतील म्हणुन नेहेमीच्या मशीनवर त्यानी व्यायाम करायला सुरवात केली. आणि तेव्हाच प्रथम त्याना विचित्र असे वाटायला लागलेआपण आजारी वगैरे पडलो नाहीना अशी शंकाही त्याच्या मनाला चाटुन गेली. त्यांच्या लक्षात आले कि त्या विचार करीत होत्या. पण शरिरावरील त्यांचा ताबा नाहीसा झाला होता. मशीनवर त्यांचे हात पुढे मागे झोके घेत असल्याचे त्या पहात होत्या. पण त्यांच्या होणा-या हालचाली त्याना पाहिजे तशा होत नव्हत्या. आपले वास्तव बदलत आहे असे त्याना सारखे भासु लागले. आपल्याला जे करावेसे वाटते ते आणि आपले शरीर ज्या हालचाली करीत आहे त्यातील फरक झपाटयाने वाढतोच आहे असे लवकरच त्यांच्या लक्षात आले. मशीनवर ठेवलेले त्यांचे हात त्याना एखाद्या जंगली श्र्वापदाच्या पंज्या सारखे दिसायला लागले.आपले मन नेहेमीच्या ओळखीच्या वातावरणा ऐवजी दूर कुठेतरी हवेत टांगुन ठेवले आहे अशी त्यांची भावना झाली. पण तरी सुध्दा ध्यानधारणा केल्यावर जशी मन्नशांती लाभते तसेच त्याना अतीशय शांत पण अगदी सुन्न सुन्न वाटायला लागले. मात्र आपण त्यातच अडकुन पडलो आहोत आणि त्यातुन बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीये असेही वाटले. डाव्या डोळया मागची वेदना उलट अधिकच तीव्र झाली आहे असे त्याना जाणवले. मशीन वरून मोठया कष्टाने त्या उतरल्या आणि बाथरूम कडे निघाल्या. चालताना शरीराच्या हालचाली नेहेमी प्रमाणे लयीत होत नव्हत्या. आपले शरीर आपल्याला ओढुन न्यावे लागत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यात त्यांचा तोलही जात होता. स्नायु मधले कोआर्डिनेशन नाहीसे झाले होते. पाय उचलुन तो टबात ठेवतांना त्यांच्या मेंदुच्या अगदी आतल्या भागातशरीर पडण्यापासुन वाचवण्यासाठी  हाता पायाच्या स्नायुंची जी मागेपुढे हालचाल होते त्याकरता मेंदुत होणा-या त्या प्रवाहांचीही जाणीव आपल्याला होते आते आहे असे त्याना भासले. त्यांच्या शरीराला असलेल्या प्रचंड धोक्याची त्याना कल्पना नव्हती. भिंतीचा आधार घेऊन त्यानी शावर सुरू केला. टबात पडणा-या पाण्याचा आवाजही त्याना एखाद्या अजस्त्र धबधब्या इतका मोठा वाटला.पण तो आवाज एकाच वेळी सुखकारक आणि त्रासदायकही वाटला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि आपल्या शारिरीक हालचालीतील समतोल गेला आहे, लय बिघडलेली आहे. आणि त्यातच भर म्हणुन आता श्रवणयंत्रणेवरील त्यांचा ताबा ही सुटला आहे. मेंदुच्या संरचनेच्या त्यांच्या ज्ञानाने त्याना माहीत होते कि शारिरीक हालचालीतील समतोल, लय, श्रवण आणि लयबध्द श्र्वासोच्छवास यांच्या संवेदना लहान मेंदू मधल्यापान्सनावाने ओळखल्या जाणा-या भागातुन होत असतात. त्या क्षणी प्रथम त्यांच्या लक्षात आले कि आपल्या मज्जासंस्थेमध्ये बिघाड झालेला आहे.

आता त्यांच्या डाव्या मेंदुतील रक्तस्त्राव हळु हळु सगळीकडे पसरायला लागला होता.आपल्याला नेमके काय होते आहे याचा विचार करण्याचा त्यानी प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि डोक्यात सारख्या चाललेल्या विचारात आणि भोवतालच्या गोष्टींच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देणारा तो चिवचिवाट रीमोटने टीव्हीचा आवाज बंद व्हावा तसा बंद झालेला आहे. रस्त्यावरील वर्दळीच्या आवाजांच्या संवेदनाही  क्षीण झाल्या होत्या.रक्तस्त्रावामुळे आपला रक्तदाबही कमी होत असणार असे त्यांच्या जाणवले कारण आपल्या हालचालीत सुध्दा आता संथपणा आला आहे हे त्याना जाणवले. डोक्यातील चिवचिवाट जरी नाहीसा झाला असला तरी त्यांच्या जाणीवा मात्र अजुन जागॄत होत्या. पण विचार करूनही त्यांच्या प्रश्र्नांची उत्तरे त्याना मिळत नव्हती. या उलट संध्याकाळ जशी पसरत जाते तशी नीरव शांतता सगळीकडे पसरते आहे असे त्यांना भासु लागले. आपण एखाद्या आनंददार्इ आणि चिरंतर अशा शांततेच्या गोधडीत लपेटले गेलो आहोत असे त्याना भासले. आपण किती भाग्यवान् आहोत कि मेंदु मधल्याअमिग्डालानावाच्या भागामध्ये जेथे भीतिची भावना नोंदवली जाते, त्याच्या प्रभावाखाली  प्रचंड भीतीपोटी आपण अजिबात गोंधळुन आणि गडबडुन गेलो नाही. डाव्या मेंदुतील त्यांची भाषेची ज्ञानकेंदे आता शांत झाल्यामुळे त्यांच्या मागील स्मॄतीही नाहिशा झाल्या होत्या. उच्च संवेदना आणि नेहेमीच्या त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या स्मॄती नाहिशा झाल्यामुळे आपण सर्व विश्र्वाशीच एकरूप झाल्याचा भास त्याना झाला. शारिरीक अस्तिवाच्या त्यांच्या जाणीवाही आतापर्यन्त नष्ट झालेल्या होत्या.त्यांचे शरीर शावरच्या भिंतीवर रेललेले होते. पण त्यांच्या शरीरच्या अवयवांच्या जाणिवाही नष्ट झालेल्या होत्या. आपले शरीर काठे. सुरू होते आणि कोठे संपते हे त्यांना समजत नव्हते. आपले शरीर घट्ट नसून आपण पाण्यासारखे पातळ आहोत असेच त्याना वाटत होते.आपण आपल्या आसमंतात असलेल्या इतर गोष्टीं पेक्षा  वेगळे कोणी आहोत ही त्यांची भावनाच नाहिशी झालेली होती.मध्येच शावरच्या अंगावर पडणा-या थेंबानी अचानक त्याना आपल्या अस्तित्वाची क्षणभर जाणीव झाली. आणि आपल्याला यातुन बाहेर पडायला हवे असे वाटले.

पुढे बाथटबातुन त्या बाहेर आल्या. कसेबसे जोर करून, वेदना सहन करीत, फार कष्टानी आपल्या मेंदुला त्रास देऊन त्यानी बाहेरच्या जगाशी संपर्क केला. सुदैवाने वेळीच त्यांना मदतही मिळाली आणि .परेशन मधुन त्या सुखरूप बाहेर पडल्या आणि आता परत नेहेमीचे संशोधनाचे कामही त्या करीत आहेत.

थोडक्यात आपल्या जीवनातील वास्तव बदलायचे असेल तर निर्णय घेऊन कृती केली तर आपले जीवन आपण बदलु शकतो. आपला वास्तवानुभव हा व्हर्चुअल रियालिटी प्रमाणेच आहे हे लक्षात घेऊन आपले वागणे आणि निर्णय नियमितपणे तपासत राहील्यास जीवन सुस* होण्यास त्याची निश्र्चित मदत होर्इल.

No comments:

Post a comment