Friday, 1 August 2014

आगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'

गवताचा गंध

माझे वडील कोण होते; हे महत्त्वाचं नाही, मला ते कोण म्हणून आठवतात, हे महत्त्वाचं !
– अ‍ॅनी सेक्स्टन
प्ला
नुकत्याच कापलेल्या हिरव्यागार पाचूसारख्या गवतावर पहुडणं, हा किती शांत-निवांत अनुभव होता! ओल्या गवताच्या गंधानं अ‍ॅम्बरला भूतकाळात बरंच मागं नेलं... ती चार वर्षांची होती, तेव्हा ती गवतावर पसरून मऊशार निळ्या आभाळाकडं टक लावून पाहायची. ती आणि तिचे डॅड ढगांचे प्राणी करत असत.

ढग हत्तीसारखे दिसतात, असं तिचे डॅड नेहमी म्हणत असत. रातकिड्यांची किरकिर कानी पडत असे... उन्हाळ्याचा स्वर. उकाड्यानं अंगाची लाही-लाही होत असली तरी मागच्या अंगणातलं थंडगार गवत अ‍ॅम्बर व तिच्या डॅडना ताजंतवानं करत असे.

बालपणातले उन्हाळ्याचे दिवस आठवताना अ‍ॅम्बरला खरबुजं, बर्फाच्या कांड्या, प्लॉस्टिक पूल्स, तुषारांची कारंजी, निळंशार आभाळ, स्वच्छ नितळ पाणी आणि हिरवं-हिरवं गवत आठवतंच.

अ‍ॅम्बर आठवणींच्या प्रदेशातून बाहेर आली आणि तिनं पुढच्या दाराचं कुलूप काढलं. कितीतरी वेळ ती त्यांच्या घराचं मागचं अंगण आणि वडिलांसमवेत घालवलेले उन्हाळ्याचे दिवस, याबद्दल विचार करत होती. अ‍ॅम्बरचे वडील २४ ऑगस्ट १९९० रोजी निवर्तले होते. त्या वेळी ती फक्त पाच वर्षांची होती. त्यांना त्या वर्षीच्या उन्हाळ्यात कर्वâरोगाचं निदान झालं होतं; पण ही गोष्ट त्यांनी अ‍ॅम्बरला कळू दिली नव्हती. त्यांचे अखेरचे काही आठवडे उरले होते. त्या काळातल्या त्यांच्या सहवासावर त्यांना दु:खाचा झाकोळ नको होता. अलीकडं तिला त्यांची फार-फार आठवण होत होती, गेल्याच मंगळवारी ते पंचेचाळीस वर्षांचे झाले असते. ते गेले तेव्हा ती खूप लहान होती, तरीसुद्धा तिला त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. त्यांचं खळखळून हसणं, तांबुस रंग, त्यांचं दिलासादायक हास्य... त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षणन्क्षण तिला अतिशय प्रिय असायचा. ती डॅडची छकुली होती.

अ‍ॅम्बरनं तिच्या आईच्या डेस्कवर साहित्य आदळलं आणि इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केली. वीस मिनिटांनी तिनं आळोखे-पिळोखे देत आजूबाजूला पाहिलं – तिला पोqन्सलला टोक करायचं गिरमीट हवं होतं. तिनं जुन्या ओकच्या डेस्कच्या प्रत्येक डॉवरमध्ये शोधलं. एका ड्रॉवरमध्ये तिला इतर वह्यांच्या गठ्ठ्यात एक जीर्ण निळी वही सापडली. त्या वहीच्या चामडी कव्हरला स्पर्श करताना तिच्या हात थरथरला. तिनं दीर्घ श्वास घेतला आणि वही उघडून काळ्या किरट्या अक्षरातील मजवूâर वाचू लागली.

जुलै २६, १९९०

मी अजूनही माझ्या इवल्याशा परीपुढं ही बातमी फोडलेली नाही. जेव्हा-जेव्हा मी तिच्या गोड डोळ्यांत पाहतो, तेव्हा ही गोष्ट सहजतेनं सांगण्यासाठी मला शब्दच मिळत नाही. मला तिची सर्वांत जास्त आठवण होईल. मला तिला मोठं होताना पाहता आलं तर... आम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. मी परमेश्वराजवळ प्रार्थना
करतो की, तिला कायम सुदृढ आणि सुंदर ठेव. मी या जगात नसेन तेव्हा मी तिच्यावर लक्ष ठेवीनच. आमच्या अंगणात गवतावर खेळतानाचे मौजेचे क्षण मला फार-फार आठवतील. ती माझ्यासोबत खेळायला स्वर्गात येईल, त्या दिवसाची मी वाट पाहात असेन.

अ‍ॅम्बरनं वही खाली ठेवली. तिला पुढं वाचायची आवश्यकता नव्हती. ती मूकपणे अश्रू ढाळत होती... थोडं दु:खानं तर थोडं आनंदानं; पण त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे, त्या वहीतून वाळलेल्या गवताची चार इवली पाती तिच्या हातात पडली होती.

– अ‍ॅडेलैड इसॅक

No comments:

Post a Comment