पॅटनचे गंडस्थळ फोडणारा छावा
कसूरक्षेत्री धावत आले पाकिस्तानी रणगाडे
हटवित, रेटित भारत-फौजा चाल चालती उन्मादे.
अंगावर क्षण घेउन शत्रू भारत घेई माघार
प्रतिकारास्तव व्यूह बांधला करुनि मनाचा निर्धार.
रणगाड्यांच्या धुंद टेकड्या डागत येता तोफांना
निकरावरती येउन लढण्या आज्ञा झाल्या फौजांना.
उठली राने, उठली झाडे येत भारती रणगाडे
चार बाजुंनी हल्ले चढता पुरता मध्ये अरि कोंडे.
हातघाइची होय लढाई खच प्रेतांचा पदोपदी
तरी न हटती फौजा अपुल्या, पायांखाली रक्त-नदी.
खवळल्या शत्रु-सैन्याला
नच उरले काही भान
रणगाडे धावत येती
अन् घेति अचानक प्राण.
धुर अस्मानाला जाई
त्या उडता अरिच्या तोफा
अन् पुढेच येती गाडे
सैन्याचा घेउन ताफा.
परि हटला भारत नाही
तो तिथेच ठाकुन राही
निकराच्या हल्ल्यासाठी
सारली शेवटी बाही.
तो अब्दुल हमीद मोठा
धीराचा हवालदार
मोच्र्यावर खंबिर ठाके
दे टोले वारंवार.
सैनिका धीर देऊनी
हल्ल्यावर चढवी हल्ले
ना जुमानिता त्यांनाही
ते धावत आले किल्ले.
सावरून हँडग्रेनेड
मग सरला हळूच पुढती
दणक्यात पाडला गाडा
तेलाची फोडुन टाकी.
ते धूड तिथे ढासळता
वेगाने दुसरा आला
अवधान राखुनी तेव्हा
अब्दूल बाजुला सरला.
मग अचुक नेम साधूनी
पेâकला बाँब त्यावरही
तोडली साखळी-चव्रेâ
रक्तात भिजे पण बाही.
ते दुसरे धूडहि तेथे
पडताच धावले तिसरे
तो जखमी वीरहि तेव्हा
भिजलेली बाही सारे.
कौशल्ये घेउन गोळा
बळ एकवटूनी हाती
त्या पॅटन सैतानाच्या
खच्चून मारला माथी.
त्या भयाण दणक्यासरशी
हो स्फोट आतल्या आत
अन् अल्लासदनी गेले
जे सैनिक होते त्यात.
घ्यावया श्वासही आता
मोकळा वेळ ना त्याला
तो चौथा राक्षस मोठा
धावून अचानक आला.
सावधान होउन तोच
हातात घेतला बाँब
परि प्राणघातकी गोळ्या
चिंधडून गेल्या अंग.
तरि पॅटन तीन गजांना
चारूनी भारत-माती
अब्दूल ‘परम-वीर’ तो
तनु ठेवी धारातीर्थी.
No comments:
Post a Comment