Thursday 7 August 2014

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

शनिवारी सकाळी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरसमोर बसता आणि एक अशी ई-मेल येऊन पडलेली असते... असं रोज-रोज घडत नसतं.

From : Ahd_businessman@gmail.com
Sent : 12/28/2005 11.40 p.m.
To : info@chetanbhagat.com

Subject : A final note

प्रिय चेतन,

ही ई-मेल म्हणजे माझं आत्महत्येपूर्वीचं अखेरचं पत्र आणि चुकांची कबुली असं दोन्हीही आहे. मी लोकांना निराश केलं आहे. मला जगायला काही कारणच नाहीये. तुम्ही मला ओळखत नाही. मी अहमदाबादमधला
एक सामान्य मुलगा आहे. मी तुमची पुस्तवंâ वाचतो. का कोण जाणे, पण तुमची पुस्तवंâ वाचल्यानंतर तुम्हाला लिहावं असं वाटलं. मी काय करतोय... मी प्रत्येक वाक्याच्या अखेरीस एक एक झोपेची गोळी घेतोय... ते मी कुणालाही सांगू शकत नाही – म्हणून मनात आलं, की हे तुम्हाला सांगावं.

मी कॉफीचा कप खाली ठेवून ओळी मोजल्या. एव्हाना पाच पूर्णविराम येऊन गेले होते मी तीन चुका केल्या आहेत; मला त्या तपशिलात शिरायचं नाही. माझी आत्महत्या हा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय नाही. माझ्या आजूबाजूच्या बNयाच लोकांना मी चांगला बिझनेसमन म्हणून परिचित आहे. मी चांगला बिझनेसमन आहे, कारण माझ्यापाशी भावनेबिवनेला फारसा थारा नसतो. मला सणक आली आणि मी हा निर्णय घेतला अशातला भाग नाही. मी तीन वर्षं वाट पाहिली. मी दररोज ईशचा मूक चेहरा पाहत होतो. पण काल त्यानं माझा प्रस्ताव धुडकावल्यानंतर माझ्यापाशी कुठला पर्यायच उरला नाही. 

मला अजिबात खेद नाही. विद्याशी आणखी एकदा बोलावं असं मनात येतंय... पण आत्ता ते योग्य होणार नाही. तुम्हाला ही सगळी तसदी दिल्याबद्दल क्षमस्व! पण मला हे कुणालातरी सांगावं असं वाटलं. लेखक म्हणून तुम्हाला सुधारणेला वाव आहे. तुम्ही छान पुस्तवंâ लिहीत राहा. हॅव अ नाईस वीकेन्ड.

रिगार्ड्स
बिझनेसमन

१७, १८, १९. अहमदाबादमधल्या एका तरुण ‘सामान्य’ मुलानं मला मेल पाठवता पाठवता झोपेच्या १९ गोळ्या गट्टम केल्या होत्या आणि तरीही त्याचीमी वीकेन्ड मजेत साजरा करावा अशी अपेक्षा होती. कॉफीचा घोटमाझ्या घशाखाली उतरेना. मी अक्षरश: शहारलो होतो.

‘‘एक तर तू उशिरा उठ आणि मग उठल्या उठल्या पहिल्यांदा कॉम्प्युटरसमोर मांडी ठोवूâन बस. आपल्याला घरदार, बायकापोरं आहेत हे तरी लक्षात आहे का तुझ्या?’’ अनुशा म्हणाली. या वाक्यातल्या अधिकारयुक्त स्वरावरून लक्षात आलं नसेल तर सांगतो, अनुशा माझी बायको आहे. मी तिच्यासोबत फर्निचर खरेदीला जायचं कबूल केलं होतं. ...दहा आठवड्यांपूर्वी! तिनं माझा कॉफीचा मग उचलून ठेवला आणि माझ्या खुर्चीची पाठ हलवत ती म्हणाली, ‘‘आपल्याला डायनिंग चेअर्स घ्यायच्या आहेत. ए.... काय झालं? तू काळजीत दिसतोयस?’’ तिनं विचारलं. ‘‘बिझनेसमन?’’ तिनं मेल वाचल्याबरोबर प्रश्न केला. तीसुद्धा चांगलीच
हादरलेली दिसत होती.

‘‘आणि ही मेल अहमदाबादहून आली आहे.’’ मी म्हणालो, ‘‘एवढंच काय ते आपल्याला ठाऊक आहे.’’

‘‘हे खरं असेल असं वाटतंय?’’ तिनं विचारलं. तिचा आवाज कापत होता.
‘‘ही ‘स्पॅम’ नाही.’’ मी म्हणालो, ‘‘ती मला उद्देशून आहे.’’

माझी बायको स्टूल ओढून त्यावर बसली. मला वाटलं आम्हाला आणखी काही खुच्र्यांची खरंच गरज होती.
‘‘विचार कर.’’ ती म्हणाली, ‘‘आपण हे कुणालातरी कळवायलाच हवं. त्याच्या आईवडिलांना तरी.’’
‘‘पण कसं? मला तर ही मेल कुठून आली हेसुद्धा माहीत नाहीये.’’ मी म्हणालो. ‘‘आणि अहमदाबादमध्ये आपल्या ओळखीचं कोण आहे?’’ 

‘‘आपण अहमदाबादमध्येच भेटलो होतो, आठवतंय?’’ अनुशा म्हणाली. माझ्या मनात आलं, किती अर्थशून्य विधान आहे हे! होय, बNयाच वर्षांपूर्वी आम्ही घ्घ्श्-A मध्ये एका वर्गात होतो. ‘‘मग?’’ ‘‘इन्स्टिट्यूटमध्ये फोन कर. प्रोपेâसर बसंतना विंâवा आणखी कुणालातरी.’’ ती नाकानं चाहूल घेत आत गेली. ‘‘आई ग, डाळ जळली वाटतं.’’ बायको आपल्यापेक्षा हुशार असण्याचे फायदे असतात. मला ‘जासूसी’ कधीच जमत नाही.

मग मी इंटरनेटवर इन्स्टिट्यूटचे नंबर शोधून फोन लावला. ऑपरेटरनी मला प्रो. बसंत यांच्या निवासस्थानी फोन जोडून दिला. मी वेळ पाहिली, सिंगापूरमध्ये सकाळचे दहा म्हणजे भारतात सकाळचे साडेसात वाजले असणार. सकाळी सकाळी प्रोपेâसर महोदयांच्या तोंडाला लागणं ही वैतागवाणी गोष्ट असते. ‘‘हॅलो?’’ फोनवर एक झोपाळू स्वर आला. प्रोपेâसर असणार. ‘‘प्रोपेâसर बसंत, हाय. मी चेतन भगत बोलतोय. तुमचा जुना
विद्यार्थी, आठवतंय?’’

‘‘कोण?’’ त्यांच्या स्वरात जराही औत्सुक्य नव्हतं.

प्रथमग्रासे....

मग मी त्यांना आठवण करून दिली... ते आम्हाला कोणता विषय शिकवायचे, आम्ही त्यांना वॅâम्पसमधील सर्वांत स्नेहशील प्रोपेâसर म्हणून निवडलं होतं... पण या खुशामतीचा फारसा काही फायदा झाला नाही.
‘‘हां हां, तो चेतन भगत होय.’’ ते म्हणाले. जणू काही त्यांना लाखो चेतन भगत माहीत असावेत.

‘‘तू आता लेखक झाला आहेस, होय ना?’’
‘‘होय सर,’’ मी म्हणालो, ‘‘तोच मी.’’
‘‘तर तू पुस्तवंâ का लिहितोयस?’’
‘‘अवघड प्रश्न आहे, सर.’’ मी वेळ मारून नेत म्हणालो.
‘‘बरं, आता सोपा प्रश्न. तू शनिवारी सकाळी इतक्या लवकर कशाला फोन केला आहेस?’’
मी त्यांना फोन करण्याचं कारण सांगितलं आणि ती ई-मेल त्यांना ‘फॉरवर्ड’ केली.
‘‘नाव नाही. अं?’’ ते मेल वाचतावाचता म्हणाले.
‘‘कदाचित तो अहमदाबादमधल्या एखाद्या दवाखान्यात असेल. कदाचित
नुकतंच त्याला दवाखान्यात दाखल केलं असेल. कदाचित तो गेलाही असेल विंâवा तो घरीच असेल आणि हा सगळा थट्टेचा प्रकार असेल.’’ मी म्हणालो. मी फारच बडबडत होतो. मला मदतीचा हात हवा होता – त्या मुलासाठी आणि माझ्यासाठीही. प्रोपेâसरनी फार चांगला प्रश्न विचारला होता. मी पुस्तवंâ कशासाठी लिहितो – या असल्या भानगडीत अडकण्यासाठी? ‘‘आपण दवाखान्यात जाऊन पाहू शकतो.’’ प्रोपेâसर म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. पण या नावाचा नक्की उपयोग होईल. अरे, थांब, या मुलाचं जी-मेल अकाऊंट आहे, कदाचित तो ऑर्वुâटवर सापडेल.’’ 

‘‘काय... ऑर... काय?’’ आपल्यापेक्षा हुशार लोकांशी बोलताना जीवन नेहमी कठीणच वाटतं.

‘‘चेतन, तू अगदीच ‘आऊट ऑफ टच’ आहेस. ऑर्वुâट ही नेटवर्विंâग साईट आहे. जी-मेल वापरणारे तिथं ‘साईन-अप’ करतात. तो जर तिथला सदस्य असेल आणि आपलं नशीब असेल तर आपल्याला त्याचा प्रोफाईल पाहता येईल.’’ 

मला त्यांच्या की-बोर्डच्या कीजचा आवाज ऐवूâ येत होता. मीही माझ्या पीसीसमोर बसलो. मी ऑर्वुâट साईटवर नुकता कुठं पोहोचलो तितक्यात प्रो. बसंत चीत्कारले, ‘‘आहा, अहमदाबाद बिझनेसमन. इथं संक्षिप्त परिचय आहे. नाव फक्त जी. पटेल असं दिलंय. बाकी इंटरेस्टचे विषय दिले आहेत. क्रिकेट, बिझनेस,
गणित आणि मित्र. हा मुलगा ऑर्वुâट फारसं वापरत नसावा.’’ 

‘‘प्रोपेâसर बसंत, हे काय सांगताय तुम्ही? आज सकाळी उठल्याउठल्या मला आत्महत्येपूर्वीचं पत्र आलंय. तेसुद्धा फक्त मला लिहिलंय आणि तुम्ही मला त्याचे छंद सांगताय. तुम्ही मला मदत करणार आहात की....’’
क्षणभर स्तब्धता पसरली.

मग ते म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. आम्ही झोपेच्या गोळ्यांचा डोस जादा झाल्यामुळं दवाखान्यात नुकत्याच दाखल झालेल्या जी. पटेल नावाच्या तरुण रुग्णाचा शोध घेतो. आम्हाला काही शोध लागला तर तुला फोन करतो. ओके?’’

‘‘यस, सर.’’ मी म्हणालो. बNयाच वेळानं मी नीट श्वास घेतला.
‘‘आणि अनुशा कशी आहे? तुम्ही दोघं ‘डेट्स’साठी माझे क्लास बुडवायचात आणि आता मला विसरलात.’’
‘‘ती मजेत आहे. सर.’’
‘‘गुड. ती तुझ्यापेक्षा हुशार आहे असं मला नेहमी वाटायचं. एनी वे, आपण तुझ्या या मुलाला शोधून काढूया.’’ असं म्हणून प्रोपेâसरनी फोन ठेवला. मला र्फिनचर खरेदीला जायचं होतं. शिवाय ऑफिस प्रेझेंटेशनचं कामही
हातावेगळं करायचं होतं. माझ्या बॉसचा – मायकेलचा – बॉस न्यूयॉर्वâहून येणार होता. त्याच्यावर छाप पाडण्यासाठी मायकेलनं मला ग्रुपचं प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं होतं. त्यासाठी पन्नास चाटर््स करायचे होते. आदल्याच आठवड्यात सलग तीन रात्री मी एक-एक वाजेपर्यंत जागून काम केलं होतं, तरी अजून कुठं ते अध्र्यावर होतं.

‘‘मी एक सुचवते, ते वाईट अर्थानं घेऊ नकोस. पण अंघोळ करायचा विचार कर.’’ माझी बायको म्हणाली.
मी तिच्याकडं पाहिलं. 

‘‘फक्त एक पर्याय सुचवतेय.’’ ती म्हणाली.
ती कधीकधी अतिजागरूकपणे वागत असते. मी प्रतिवार केला नाही. ‘‘हो, हो, करतो.’’ असं म्हणून मी पुन्हा कॉम्प्युटर सुरू केला. माझ्या डोक्यात विचारांचा गदारोळ माजला होता. आपण स्वत:च काही दवाखान्यांत फोन करावा का? प्रोपेâसर बसंतना पुन्हा डुलकी लागली असली तर? त्यांना या मोहिमेसाठी विद्याथ्र्यांना गोळा करणं जमलंच नाही तर? जी. पटेलचा मृत्यू झाला असला तर? आणि मी या सगळ्यात इतका
का गुंतत चाललोय? मी नाखुशीनं अंघोळ केली. ऑफिस प्रेझेंटेशन उघडून बसलो, पण एक
शब्दही टाईप करता येईल तर शपथ! 

मी न्याहरी नको म्हणून सांगितलं, अर्थात काही क्षणांतच मला त्याचा पश्चात्तापही झाला... कारण भूक आणि चिंता हातात हात घालून गुण्यागोंविदानं एकत्र नांदू शकत नाहीत.

दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी माझा फोन वाजला. ‘‘सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे गोविंद पटेल. पंचवीस वर्षांचा आहे. दुसNया वर्षातल्या माझ्या एका विद्याथ्र्यानं त्याला शोधून काढलं.’’ 
‘‘आणि?’’
‘‘आणि तो जिवंत आहे, पण बोलत नाहीये. त्याच्या घरच्यांशीसुद्धा नाही. तो अजून धक्क्यातून सावरलेला नसणार.’’ ‘‘डॉक्टर काय म्हणतायत?’’ मी विचारलं. ‘‘काही नाही. तो सरकारी दवाखाना आहे. तुझी काय अपेक्षा आहे? एनी वे, ते त्याचं पोट धुऊन काढतील आणि त्याला घरी पाठवतील. आता जास्ता fचंता करू नकोस. मी माझ्या विद्याथ्र्याला संध्याकाळी पुन्हा तिकडं जाऊन यायला सांगेन.’’ 

‘‘पण तो कोण आहे? त्याच्याबाबतीत काय घडलंय?’’
‘‘ते सगळं मला माहीत नाही. हे बघ, जास्त गुंतू नकोस. भारत हा खूप मोठा देश आहे. अशा गोष्टी सतत घडत असतात. तू जितक्या जास्त खोदून चौकश्या करशील तितकी तुला पोलिसांकडून त्रास होण्याची शक्यता वाढेल.’’

मग मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फोन लावला. तिथल्या ऑपरेटरला या ‘केस’बद्दल काहीच माहिती नव्हती. आणि तिथं वॉर्डमध्ये फोन ‘ट्रान्स्फर’ करण्याची सुविधाही नव्हती.

तो मुलगा जिवंत आहे हे कळल्यावर अनुशानंही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर तिनं त्या दिवसाचा बेत जाहीर केला – डायनिंग चेअर हंट. या मोहिमेची सुरुवात अलेक्झांड्रा रोडवरील ‘आयकिया’पासून होणार होती.
आम्ही दुपारी तीनच्या सुमारास ‘आयकिया’त पोहोचलो आणि जागेची बचत करणारे डायनिंग सेट्स पाहू लागलो. एक डायनिंग टेबल पाहिलं, त्याची चौघडी करून कॉफी टेबलही बनवता येत होतं. ...अगदी छान वाटलं. 
‘‘त्या पंचविशीतल्या बिझनेसमनच्या बाबतीत काय घडलं असेल ते मला जाणून घ्यायचं आहे.’’ मी हळू आवाजात म्हणालो. ‘‘ते तू शोधून काढशीलच. आधी त्याला बरं होऊ दे. तरुण पोरांच्या बाबतीत जी वेडपट कारणं असतात, त्यातलंच एखादं कारण असणार... प्रेमभंग, माक्र्स कमी विंâवा अमली पदार्थ.’’
मी गप्प राहिलो. 

‘‘कमॉन, त्यानं तुला ई-मेल केलीय. तुझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुझा आयडी आहे. तुला यात इतवंâ गुंतायची काही गरज नाहीये. आपण सहा घेऊ या की आठ?’’ ती ओक-वुड सेटकडं वळली होती. ‘‘आपल्याकडं खूप पाहुणे आलेत असं क्वचितच घडतं.’’ असं म्हणून मी माझा निषेध नोंदवला. आम्हाला सहा खुच्र्या पुरेशा होत्या. 
‘‘आणखी दोन खुच्र्यांच्या वापराची शक्यता दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.’’ मी म्हणालो.
‘‘तुम्ही पुरुष काही कामाचे नसता.’’ तिनं परतपेâड केली आणि सहा खुच्र्या निवडल्या. माझं मन त्या ‘बिझनेसमन’भोवती घोटाळत होतं. होय, सगळेच बरोबर सांगतायत. मी यात गुंतता कामा नये. पण... पण या जगातल्या इतक्या सगळ्या माणसांमध्ये या मुलानं त्याचे अखेरचे शब्द फक्त मलाच पाठवले होते. मग मी कसं नाही गुंतायचं.... 

आम्ही ‘आयकिया’शेजारच्या ‘पूâड कोर्ट’मध्ये जेवायला गेलो. ‘‘मला जावं लागेल.’’ मी लेमन राईस चिवडत बायकोला म्हणालो. ‘‘कुठं? ऑफिसमध्ये. ओके. आता तू मोकळा आहेस. माझी खरेदी आटोपलीय.’’ बायको म्हणाली. ‘‘नाही, मला अहमदाबादला जायचंय. मला गोिंवद पटेलला भेटायचंय.’’ मी तिच्या नजरेला नजर न देता म्हणालो. माझं वागणं बहुतेक वेडपटासारखं होत असावं. ‘‘वेड लागलंय का तुला?’’ मला वाटतं, भारतीय बायकांनी आपल्या नवNयांना खाडकन फटकारण्याची प्रथा माझ्याच पिढीत सुरू झालीय. ‘‘माझं मन सारखं तिथंच घोटाळतंय.’’ मी म्हणालो. ‘‘तुझ्या प्रेझेंटेशनचं काय? मायकेल तुला ठार मारेल.’’ ‘‘मला माहीत आहे. त्यानं त्याच्या बॉसवर छाप पाडल्याखेरीज त्याला बढती मिळणार नाही.’’ माझ्या बायकोनं माझ्याकडं पाहिलं. माझा चेहराच काय ते बोलत होता. त्या मुलाला भेटल्याखेरीज मी माणसात येणार नाही हे तिनं ओळखलं होतं.

‘‘वेल, आज संध्याकाळी सहा वाजता एकमात्र थेट विमान आहे. तू तिकीट मिळतंय का बघ.’’ तिनं सिंगापूर एअरलाईन्सचा नंबर लावून माझ्याकडे दिला. मी परिचारिकेनं दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला. तिथल्या गूढ शांततेत व काळ्याकुट्ट अंधारात माझ्या पावलांचा आवाज जास्तच मोठा भासत होता. निरनिराळ्या प्रकारची दहा उपकरणं पिक-पिक करत होती आणि ठरावीक वेळानं थ्ED चे दिवे लुकलुकत होते. त्या उपकरणांपासून निघालेल्या नळ्या ज्या माणसाच्या देहाशी येऊन लुप्त होत होत्या, त्या माणसाला पाहायला मी हजारो मैल पार करून इथं आलो होतो. त्या माणसाचं नाव होतं – गोविंद पटेल. माझ्या सर्वप्रथम लक्षात आले ते त्याचे कुरळे केस. त्याचा वर्ण सावळा होता. भुवया दाट व जाड होत्या. त्याचे पातळसे ओठ औषधांमुळे कोरडे पडले होते.
‘‘हाय, चेतन भगत... तू ज्याला लिहिलं होतंस तो लेखक.’’ मी म्हणालो, पण त्यानं मला ओळखलं होतं की नाही कोण जाणे! ‘‘ओ... पण तुम्ही... मला कसं काय शोधलंत?’’ तो कष्टानं शब्द उच्चारत होता. ‘‘मला वाटतं ते विधिलिखित असावं.’’ मी म्हणालो. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्या शेजारी बसलो. तितक्यात त्याची आई खोलीत आली. तिला झोपेची इतकी प्रचंड गरज आहे असं दिसत होतं, की तिनंच झोपेची गोळी घेतली तर बरं असं वाटत होतं. मी तिला ‘नमस्ते’ केलं. त्यानंतर ती चहा आणायला बाहेर गेली.
मग मी त्या मुलाकडं वळलो. त्या क्षणी माझ्या मनात दोन अत्यंत निकडीच्या भावना होत्या – एक, त्याच्याकडून काय झालं ते जाणून घेणं आणि दुसरी, त्याच्या मुस्कटात लावणं.

‘‘माझ्याकडं असं पाहू नका.’’ तो बिछान्यात जरासा सरकत म्हणाला. ‘‘तुम्हाला राग आला असेल. माफ करा, मी तुम्हाला मेल करायला नको होती.’’ ‘‘मेलचं जाऊ दे. तू जे केलं आहेस ते करायला नको होतंस.’’ त्यानं उसासा सोडला. त्यानंतर त्यानं माझ्याकडं एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि मग नजर बाजूला वळवत तो म्हणाला, ‘‘मला अजिबात खेद नाही.’’ ‘‘गप्प बस. यात वीरश्रीयुक्त काहीही नाही. भेकड माणसं अशी गपागप
गोळ्या गिळतात.’’ ‘‘तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हेच केलं असतं.’’ ‘‘का? काय झालं तुला?’’
‘‘त्यानं काहीही फरक पडत नाही.’’ काही वेळ आम्ही गप्प राहिलो. तितक्यात त्याची आई चहा घेऊन आली. तेवढ्यात परिचारिकाही खोलीत आली. तिनं त्याच्या आईला घरी जायला सांगितलं, पण त्याची आई तिथून हलायला तयार नव्हती. अखेर, डॉक्टरांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री साडेअकरा वाजता त्याची आई तिथून बाहेर पडली. मीही डॉक्टरना तिथून लगेचच बाहेर पडण्याचं कबूल केलं. आता खोलीत आम्ही दोघंच होतो. ‘‘तर मग... आता मला तुझी कहाणी सांग.’’ मी म्हणालो. ‘‘का? तुम्ही काय करणार आहात? जे काही घडलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही.’’ तो वैतागलेपणानं म्हणाला. ‘‘आपण दुसNयाचं बोलणं ऐकतो ते काही भूतकाळ बदलण्यासाठी नाही. कधीकधी काय घडलं ते जाणून घेणंही महत्त्वाचं असतं.’’ ‘‘मी बिझनेसमन आहे. माझ्या नजरेतून म्हणाल तर लोक जे काही करतात ते फक्त स्वहितासाठी. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? आणि मी तुम्हाला काही सांगण्यात माझा वेळ का पुâकट दवडावा?’’ मृदू-मुलायम त्वचेच्या चेहNयाआडची ती करकरीत धार मी पाहतच राहिलो. ‘‘कारण, मला ते इतरांना सांगावंसं वाटेल.’’ मी म्हणालो. तोच माझा लाभांश होता.

‘‘आणि इतरांना काय गरज पडलीय? माझी कहाणी काही आयआयटी आणि कॉल सेंटर्समधल्यासारखी नव्या पॅâशनची विंâवा सेक्सी नाही. त्यानं अंगावरची गोधडी दूर केली. हिटर व आमचं संभाषण खोलीत ऊब
पसरवत होतं.
‘‘मला वाटतं... स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करणाNया एका तरुणाची कहाणी ते नक्की जाणून घेतील. हे कृत्य बरोबर नाहीच.’’ ‘‘कुणी काळं कुत्रंसुद्धा ढुंवूâन बघणार नाही.’ मी प्रयत्न केला, पण संयम राखणं कठीण होत होतं. त्याला मुस्कटात लावण्याचा विचार मनात पुन्हा डोवंâ वर काढत होता.

‘‘हे बघ,’’ मी दवाखान्यात जितक्या मोठ्यानं बोलणं शक्य होतं तितकी आवाजाची पट्टी चढवत म्हणालो, ‘‘तू तुझी अखेरची मेल मला पाठवलीस. म्हणजे कुठंतरी एका विशिष्ट स्तरावर तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास. तुझी मेल मिळाल्यापासून काही तासांत मी तुला शोधून काढलं आणि विमान पकडून थेट इथं धावत आलोय. तरी तू ‘मला काय पर्वा आहे’ असं विचारतोस? आणि आत्ताचा तुझा हा उद्दाम उर्मटपणा तुझ्या बिझनेसचाच भाग म्हणायचा का? तू माझ्याशी मित्राच्या नात्यानं बोलू शकत नाहीस? तुला ‘मित्र’ म्हणजे काय, ते तरी माहीत आहे का?’’

माझा चढलेला आवाज ऐवूâन परिचारिका खोलीत डोकावली. आम्ही गप्प झालो. रात्रीचे बारा वाजले होते.
तो सुन्नपणे बसला होता. आज दिवसभर सगळेजण त्याच्याशी छानच वाग होते. मी उठलो आणि तिथून निघालो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला माहीत आहे.’’ अखेर त्याच्या तोंडून शब्द आले. मी त्याच्या शेजारी बसलो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला नक्कीच माहीत आहे, कारण मला दोन मित्र होते. जगातले सर्वाेत्तम मित्र.’’ 

No comments:

Post a Comment