Friday, 15 August 2014

भारत ( खरंच) माझा देश आहे? - मेघना शहा

भारत ( खरंच) माझा देश आहे?

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. हल्ली हि आपली प्रतिज्ञा आपण शाळेतच ठेऊन बाहेर पडतो की काय असे वाटते. कारण आपण आपले घर, आपली माणसे यापलीकडे ़फारसे पाहतच नाहीत. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, रस्ते, वाहने का कधी आपल्याला आपली वाटत नाहीत? अर्थात याला अपवाद देखील नक्कीच असतील नाही असे नाही, पण हे प्रमाण नक्कीच कमी आहे. 

असाच मला आलेला एक अनुभव. एकदा बसमधून मी आणि आमच्या संकुलातील काकी प्रवास करीत होतो. काकी खिडकीजवळ बसल्या होत्या. त्यांनी दोघींसाठी चॉकलेट काढले. चॉकलेट खाऊन झाल्यावर मी नेहमीप्रमाणे त्यांची चांदी (ैraज्ज्ी)पर्समध्ये ठेवले. ते पाहून त्या म्हणाल्या 'अरे बापरे, पर्यावरणवाली शेजारी असल्यामुळे मला देखील चांदी पर्समध्ये ठेवावी लागेल'. मी त्यांना म्हणाले 'कुणासाठी तरी नको, तर मनापसून करा' गोष्ट साधी आहे पण आपली मानसिकता दर्शवणारी आहे. गंमत म्हणजे काकीच थोड्या वेळापूर्वी मला आपल्याकडे कशी अस्वच्छता असते हे तावातावाने सांगत होत्या आणि आपल्या देशाची
तुलना परदेशाशी करत होत्या. कारण त्यांची मुलगी लंडनला राहत होती. खरंच, अशी तुलना होऊ शकते का?....

असाच दुसरा अनुभव एका छोट्या मुलीचा आहे. शेजारी राहणाNया मैत्रिणीची N.R.घ् भाची पहिल्यांदाच लंडनहून भारतात येत होती. वय साधारण साडेचार पाच वर्ष. मैत्रिणीने सांगितले विमानतळापासूनच तीची कटकट सुरु झाली होती. आमचं लंडन असं आहे आणि तुमचा भारत असा आहे. रस्त्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, नियम न पाळणे याने ती इतकी वैतागली होती की शेवटी तिने सांगितले, '' आमच्या लंडनला येऊन बघा किती छान आहे आमचे लंडन!'' 

मैत्रीण मला म्हणाली 'खरं तर ती खुपच छोटी आहे,पण तिने सांगितलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नव्हते.
या आणि अश्या कितीतरी सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटते की याची साधी दखल देखील आपण घेत नाहीत. इतर देशात ़िफरायला गेल्यावर आपण तेथील नियम पाळतो, मग आपल्या देशात का नाही?

यासाठी प्रथम देश 'आपला' वाटला पाहिजे. मी एकट्याने करुन करुन काय मोठा फरक पडणार आहे? असा विचार करुन चालणार नाही. विंâवा नियम तोडण्याची सुरुवात तरी आपल्यापासून करु नये. कारण चांगल्या गोष्टींचे अनुकरण आपण सहज करत नाहीत पण वाईट गोष्टी मात्र सहज आपल्या अंगवळणी पडतात. जसे सार्वजनिक ठिकाणी कचरा हा कचरापेटीच्या बाहेरच दिसतो. कारण कुणीतरी एकाने सुरुवात केलेली असते आणि बाकीचे त्याचेच अनुकरण करतात. नंतर कुणाला कचरा कचरापेटीत जरी टाकावा असे वाटले तरी त्या
कचरापेटीपर्यंत पोहोचणे अशक्य अशक्य होते.

अजून एक उदाहरण देता येईल ते वाहतूकीचे नियम न पाळण्याचे. कितीतरी वेळा आपण पाहतो कि लाल सिग्नल असतानासुध्दा गाड्या सिग्नल तोडून पुढे जातात. एक प्रसंग आठवतो. 

एकदा लाल सिग्नल असल्यामुळे गाड्या थांबल्या होत्या. हिरवा सिग्नल होण्यास अजून १५ सेवंâद बाकी होते. तेवढ्यात काही गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. एक काका झेब्राक्रॉसिंगवरुन रस्ता क्रॉस करत होते. ते अध्र्या रस्त्यात असतानाच गाड्या सुरु झाल्या ते एवढे  चिडले कि रस्त्यावर थांबूनच त्यांच्या जवळ येऊन थांबलेल्या बसच्या चालकाशी भांडू लागले. त्यांचा संताप अगदी खरा होता. पण तो पहायला, ऐकायला, समजून घ्यायला वेळ होता कुणाला?

यामुळे होते काय कि ज्यांना सिग्नल पाळायचा असेल त्यांना देखील जबरदस्तीने सिग्नल तोडावा लागतो विंâवा मागील गाड्यांचा कर्वâश्य आवाज तरी सहन करावा लागतो. गाडीतून कचरा बाहेर पेâकणे हे देखील नेहमी आढळणारे दृश्य. मग ती गाडी आपली असो विंâवा रेल्वेची असो. वरील घटना प्रतिनिधिक स्वरुपाच्या आहे. या सारखे अनेक अनुभव आपण जवळपास रोजच घेत असतो.

सामाजिक जाणीव तसेच पर्यावरण रक्षणाचा विचार करताना वरील मुद्दे देधील लक्षात घेणे आवश्यक आहे. या सगळ्यांसाठी प्रथम हा देश माझा आहे ही जाणीव होणे महत्वाचे आहे. 

मेघना शहा
ठाणे

2 comments:

  1. Sundar asech lihit raha mhanje aamhala kahi changle shikta yeil

    ReplyDelete
  2. Gosht kiti saadhi aani saral ahe....tari anekanna kalat nahi...khup sopya paddhatine maandlet tumhi points.

    ReplyDelete