Tuesday, 5 August 2014

केवळ मैत्रीसाठी...

प्रसंगी अखंडित खात जावे!

``जेव्हा पाहाल तेव्हा इथली उपाहारगृहं खचाखच भरलेली असतात! तसेच लोकही तळलेल्या व इतर तेलकट पदार्थांवर यथेच्छ ताव मारताना दिसतात!'' 

मलेशियात माझी नेमणूक झाल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. ती मी माझा मलेशियन शीख मित्र सुखदेव िंसग याच्याशी एकदा गप्पा मारत असताना त्याला बोलून दाखवली.

``उमेश, `खाणे' हा मलेशियन लोकांचा राष्ट्रीय छंद आहे!'' हसत हसत सुखदेव म्हणाला.

मलेशियात जेवणाचे वैविध्य कसे, याचा उलगडा व्हायला वेळ लागला नाही. तेथील जवळ जवळ साठ टक्के लोक मलय वंशाचे मुसलमान, तीस टक्के मूळचे चिनी वंशाचे व उर्वरित भारतीय वंशाचे. त्या भारतीयांचे पूर्वज ब्रिटिशांच्या काळात स्थलांतरित झालेले. त्यावेळी प्रामुख्याने रबराच्या झाडांच्या लागवडी व ऊसमळे
याठिकाणी काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तिकडे नेलेले. त्यांच्या पुढच्या पिढीतले बरेचसे लोक शिवूâन सवरून चांगल्या नोकNया िंकवा व्यवसाय करीत. ते मलेशियन नागरिक असले तरी त्यांनी भारतीय संस्कृती जतन करून ठेवली आहे. 

तीन प्रमुख वंशांच्या लोकांच्या गरजा पुरविण्यासाठी मलय, चिनी व भारतीय उपाहारगृहे मोठ्या प्रमाणावर उघडली गेली. शिवाय प्रवाशांना आर्किषत करण्यासाठी थाई, ाqव्हएतनामी, जपानी, इंडोनेशियन, कोरियन, युरोपियन व अरबी उपाहारगृहांचीही त्यात भर पडलेली. त्यापैकी काही २४ तास उघडी असतात. त्यातल्या त्यात मलय वंशाच्या लोकांना खाण्याचा मोठा शौक. सकाळी नाश्त्यासाठी `नासी लेमाक आयाम' म्हणजे भात व तेलातली चिकन करी, तोंडी लावायला तळलेले छोटे सुके मासे व तळलेले शेंगदाणे हे अतिशय लोकप्रिय. मलेशियातच चिकन डोसा, बीफ डोसा, फिशकरी डोसा असे पदार्थ पाहायला मिळाले. अलीकडचीच गोष्ट. मी कार्यालयात एक रिपोर्ट तयार करण्यात मग्न होतो.

इतक्यात आमच्या कार्यालयाची व्यवस्थापिका अ‍ॅन गोमेझ माझ्या खोलीत आली व म्हणाली, ``उमेश, आम्ही दवाखान्यात दलेनाच्या नवNयाला पाहायला निघालोय. यायचंय तुला?''

दलेना ही आमच्या कार्यालयात साहाय्यिका होती. ती छोटीशी, २५-२६ वर्षांची, नाजूक व गोरी; तर तिचा नवरा याह्या ताडासारखा उंच. ``काय झालंय त्याला?'' मी अ‍ॅनाला विचारले. ``खूप ताप आलाय म्हणे!''

``चल, मीही येतो तुमच्याबरोबर.'' आम्ही ५-६ जण पंताय हॉाqस्पटलमध्ये पोहोचलो. दलेना सिंचत मुद्रेने बसलेली. आम्ही याह्याला पाहून स्वागतकक्षात दलेना बरोबर बोलत बसलो.

``नेमवंâ काय झालं आहे डॉक्टरांच्या मते?'' मी तिला विचारले. ``ड्युरियनचा प्रताप!'' दलेना म्हणाली.
``म्हणजे काय?'' मला काहीच उलगडा होईना. 

``परवा गावाहून एक मित्र ड्युरियन घेऊन आला. याह्याने त्यांचा फडशा पाडला. ड्युरियनमध्ये उष्णता खूप. त्याची प्रतिक्रिया होऊन त्याचा ताप १०४ वर गेला. मी घाबरून गेले व सरळ इकडे आणलं.'' दलेना म्हणाली.

ड्युरियन हे उग्र वासाचे, फणसाच्या जातीचे फळ मी बाजारात पाहिले होते. पण एखादे फळ खाऊन दवाखान्यात दाखल व्हायची पाळी यावी हे मला नवीनच होते. नंतर मला कळले की त्यात एल.डी.एल. कोलेस्टेरॉलही खूप मोठ्या प्रमाणात असते व हे सर्वज्ञात असले तरी ते खायचा मोह लोक आवरू शकत नाहीत!

एकदा मला पूर्व मलेशियाच्या बोर्नीओ बेटावरील सारावाक प्रांतात बतांग-आय या छोट्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग आला. ते ठिकाण सारावाकची राजधानी कुिंचग येथून अडीचशे किलोमीटर अंतरावर होते. ते एका प्रचंड धरणाच्या काठावर वसलेले. तेथे जाण्याचा जवळजवळ संपूर्ण रस्ता घनदाट जंगलातून होता. माझ्या सोबत मलेशियन रेड व्रेâसेंट सोसायटीचे (रेड क्रॉस सारखीच, पण चिन्ह वेगळे) कुिंचग कार्यालयातील जॉन लाम व यो लिआँग हे दोन चिनी वंशाचे अधिकारी व माझ्याबरोबर कुआलालंपूर येथील त्या सोसायटीच्या मुख्य कार्यालयातून आलेले निवृत्त कर्नल हसन होते. आम्ही सर्वजण एका जीपने तिकडे जायला निघालो.
वाटेमध्ये जंगली ड्युरियन विकणारी आदिवासी मुले दिसली. त्यांच्याकडे पाहत जॉनने मला विचारले, ``उमेश, तू ड्युरियन खातोस ना?'' 

``नाही जॉन, मी अजून त्याची चव चाखलेली नाही.'' मी म्हणालो. 

``चल, आपण ड्युरियन घेऊया. एकदा चाखून तरी पाहा! कदाचित आवडलं तर कुआलालंपूर इथेही तुला मिळतील.'' जॉन म्हणाला. त्याचे मन न मोडण्यासाठी मी प्रसंगी अखंडित खात जावे! म्हणालो, ``ठीक आहे, पाहूया खाऊन.''

त्या मुलांकडून जॉनने चांगले पाच-सहा ड्युरियन विकत घेतले. जंगली ड्युरियन खूपच चविष्ट असतात असेही तो म्हणाला. ड्युरियन पाहून कर्नल हसन खूप खुष झाले होते. आम्ही गेस्ट हाउसवर पोहोचल्यावर कधी एकदा ड्युरियन खातो असे त्यांना झाले होते. जॉनने जाड काटेरी साल कापून आतील पिवळसर लुसलुशीत फणसासारखा एक गरा मला खायला दिला. तो खूप गोड होता पण त्याचा वास फार उग्र वाटला. तिकडे कर्नल हसननी जवळ जवळ अर्धा किलो ड्युरियन गरे खाल्ले. त्या जंगलात जवळपास वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे मला त्यांची काळजी वाटली. पण सुदैवाने त्यांना काही त्रास झाला नाही. मी मात्र फक्त एकाच गNयावर थांबलो.

बतांग-आय येथील कार्यशाळेत जेवणाच्या वेळी आम्ही एकत्रच असू. बुपेâ पद्धतीचे आयोजन असायचे. त्यावेळी लक्षात आले की कर्नल हसन खाण्याचे भोत्तेâ आहेत! त्यांच्या प्लेटमध्ये पदार्थांची रेलचेल झालेली असायची. तेथून तिसNया दिवशी आम्ही पुन्हा कुिंचगला जायला निघालो. वाटेत एका खेड्याजवळ खूप लोक
रांगेमध्ये उभे असलेले दिसले. मी तिकडे कुतूहलाने पाहत होतो. तेव्हा कर्नल हसत म्हणाले, ``ओपन हाउस दिसतेय!''

``ते काय असतं?'' मला `ओपन हाउस' हा प्रकार माहीत नव्हता.

``ओपन हाउस म्हणजे कोणीही जेवायला जावं. काहीतरी निमित्ताने भोजन समारंभ आयोजित करायचा व तो सर्वांसाठी खुला ठेवायचा.'' जवळजवळ गावजेवणासारखेच. मी विचार केला की किती मोठ्या प्रमाणावर अशा प्रसंगी जेवण करावे लागत असावे. 

``रमझान ईद झाल्यानंतर मलेशियात जवळजवळ महिनाभर ओपन हाउस चालतात.'' कर्नल हसन उत्साहाने म्हणाले. ``म्हणजे एक महिनाभर फािंस्टग (उपास) व नंतरचा एक महिना फििंस्टग (मेजवान्या)!'' मी हसत हसत म्हणालो.

``आमच्याकडे ईदच्या दिवशी पंतप्रधान ओपन हाउस आयोजित करतात व प्रत्येक अतिथीशी हस्तांदोलन करून ईदच्या शुभेच्छाही देतात. तुम्ही सुद्धा त्याला जाऊ शकता.'' कर्नल हसननी मला सांगितले. ``त्यासाठी फक्त अडीच-तीन तास रांगेत उभे राहायची तयारी हवी!'' आमचे संभाषण ऐकत असलेले लिआँग म्हणाले.
आम्ही कुिंचगला पोहोचलो. जॉनने लिआँगना आधी त्यांच्या घरी सोडले. माझे व कर्नल हसन यांचे विमान रात्री साडेआठला सुटणार होते. आता सहा वाजत आले होते.

जॉन म्हणाला, ``चला, विमानतळाजवळ आपण जेवायला जाऊ. नंतर मी तुम्हा दोघांना विमानतळावर सोडेन.'' 

आम्ही एका चिनी उपाहारगृहात जेवायला गेलो. तिघेही व्यवाqस्थत जेवलो. सकाळचे जेवण लवकरच झाले होते. त्यामुळे तशी बNयापैकी भूक लागलेली. जेवण झाल्यावर जॉन आम्हाला सात वाजता विमानतळावर सोडून गेला. विमानतळावर समजले की आमचे विमान साडेआठऐवजी रात्री दहाला सुटणार आहे. मी घरी फोन करून उशिरा पोहोचत असल्याचे नीलिमास सांगितले. 

विमान वंâपनीने विमानास विलंब झाल्याबद्दल आम्हास जेवणाची कुपन्स दिली. विमानतळावरील उपाहारगृहात आमची जेवणाची सोय करण्यात आली होती. पण आमचे जेवण झाल्यामुळे त्यांचा आम्हा दोघांना काही उपयोग होणार नाही असा मी विचार केला. पण साडेआठच्या सुमारास कर्नल हसन म्हणाले, ``चला काय जेवण देतात पाहूया!''

ते ऐवूâन मला आश्चर्य वाटले. त्यांना फक्त सोबत व्हावी या उद्देशाने मी त्यांच्या बरोबर उपाहारगृहात गेलो. त्यांनी दीड एक तासांपूर्वीच यथेच्छ भोजन केले होते तरी देखील पुन्हा भात, बीफ करी व काही भाज्या वाढून घेतल्या. ``तुम्ही नाही घेत काही?'' माझ्याकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. ``नाही. तुम्ही घ्या खाऊन. मी बसेन तुमच्याशी गप्पा मारत.'' मी म्हणालो. रात्री दहा वाजता विमान सुटले. कर्नल हसन व मी शेजारी शेजारी बसलो होतो. सकाळचा प्रवास व विमान सुटण्यास झालेला विलंब यामुळे मला बसल्या बसल्या डुलक्या येत होत्या. कदाचित मला झोपही लागली असावी. रात्री पावणे अकराच्या सुमारास कर्नलनी मला हलवून जागे केले.

``उठा, जेवण द्यायला सुरुवात केली आहे!'' कर्नल म्हणाले.

``मला नको. मी जरा आराम करतो.''

हवाई सुंदरीने देऊ केलेला जेवणाचा ट्रे कर्नलनी घेतला व पुन्हा खायला सुरुवात केली. मला त्यांच्या पोटाची कमाल वाटली. मी पुन्हा झोपी गेलो. अध्र्या तासाने मला जाग आली. पाहतो तर शेजारी कर्नल नव्हते. मी इकडे-तिकडे पाहिले तर ते टॉयलेटसमोर आतील व्यक्ती बाहेर यायची वाट पाहत उभे असलेले दिसले. विमान रात्री पावणेबाराच्या सुमारास कुआलालंपूरला पोहोचले. आम्ही सामान घेऊन टॅक्सीच्या रांगेत उभे होतो. कर्नलनी मोबाईलवरून आपल्या घरी फोन लावला असावा.

``हां, फातिमा, मी आत्ताच पोहोचलो. टॅक्सी मिळेल एवढ्यात. तरी घरी यायला पाऊण तास लागेल. त्या बेताने जेवण गरम करायला घे. मी पोहोचलो, की लगेचच आपण जेवायला बसू...!''

No comments:

Post a Comment