Thursday, 17 July 2014

द घोस्ट इन लव्ह

जर्मन लँडीस नावाच्या स्त्रीच्या प्रेमात ते भूत पडलेले होते. जर भुताला हृदय असते, तर ते वेगळ्या प्रकारचे आकर्षक नाव ऐकूनच त्याचे हृदय धडधडणे सुरू झाले असते. एका तासाच्या आतच ती स्त्री तिथे पोहोचणार होती. त्यामुळे सगळे तयार ठेवण्यासाठी भुताची घाईगर्दी सुरू होती. ते भूत उत्तम स्वयंपाक करू शकत होते. कधीकधी तर फारच छान! त्याने जर त्याकडे जास्त लक्ष दिले असते, तर ते फारच उच्च दर्जाचे शेफ झाले असते.

स्वयंपाकघराच्या एका कोपNयात ठेवलेल्या त्याच्या मोठ्या बेडवरून एक कुत्रे भुताचा जेवण बनवण्याचा खटाटोप मोठ्या उत्सुकतेने बघत होते. हे एक मिश्र जातीचे काळ्या, पिवळ्या रंगाचे कुत्रे होते. या मिश्र जातीच्या कुत्र्यासाठीच केवळ जर्मन लँडीस आज तिथे येणार होती. तिने तिच्या एका आवडत्या कवितेवरून त्या कुत्र्याचे नाव ‘पायलट’ ठेवले होते.

अचानक काही लक्षात आल्यामुळे भुताने काम थांबवले आणि कुत्र्याच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याला चिडून विचारले, ‘‘काय?’’ पायलटने नकारार्थी मान हलविली. ‘‘काही नाही. मी फक्त तुला काम
करताना बघत होतो.’’

‘‘खोटारडा, इतवंâच नाही, मला माहिती आहे, माझं जे काही काम सुरू आहे, तो तुला मूर्खपणा वाटतोय.’’

कुत्र्याने शरमेने मान वळवली व ते जोरजोरात त्याच्या मागच्या पंजाचा चावा घेऊ लागले.

‘‘ते बंद कर आणि माझ्याकडं बघ. तू मला वेडी समजतोस, हो ना?’’ पायलट काहीच बोलला नाही आणि त्याने पंजाचा चावा घेणे सुरूच ठेवले. ‘‘खरं ना?’’

‘‘हो, मला वाटतं तू वेडीच आहेस. पण मला वाटतं, हे खूप छान आहे गोड आहे. तू तिच्याकरता काय करत आहेस, ते तिनं बघावं, असं मात्र मला वाटतंय.’’

भुताने खांदे उडवत सुस्कारा सोडला, ‘‘जेवण बनवायला घेतलं की मलाच शांत वाटतं. मन त्याच्यात गुंतून पडल्यामुळं चिडचिड होत नाही.’’ 

‘‘मी समजू शकतो.’’

‘‘नाही, तुला काय कळणार? तू तर फक्त एक कुत्रा आहेस.’’

कुत्र्याने डोळे मोठे केले. ‘मूर्ख’.

‘‘चार पायाचं जनावर.’’

भूत आणि कुत्र्याचे सलोख्याचे संबंध होते. आईस-लँडीक विंâवा फिनिश ह्या भाषा बोलणारे जसे थोडेच जण असतात तसे ‘‘श्वान’’ भाषा सुद्धा फारच थोडे बोलतात. फक्त कुत्री व मृत व्यक्ती ती भाषा समजू शकतात. जर पायलटला कधी बोलण्याची इच्छा झाली, तर एकतर त्याला रस्त्यावर भेटेल त्या कुत्र्याशी बोलावे लागायचे. दिवसातून तीन वेळा त्याला फिरायला घेऊन जायचे तेव्हा त्याची अशा कोणा कुत्र्याबरोबर गाठ पडायची विंâवा मग कुत्रे ह्या भुताबरोबर संवाद साधायचे. त्यांच्यातल्या वादविवादामुळे भुताला  यलटबद्दल खूपच माहिती झाली होती. या पृथ्वीतलावर माणसांच्या भुतांची संख्यासुद्धा बरीच कमी होती. त्यामुळे भुतालासुद्धा कुत्र्याच्या सहवासात आनंद लाभत असे.

पायलटने विचारले, ‘‘मी सारखं विचारायचं म्हणतोय, तुला नाव कुठून मिळालं?’’

भुताने कुत्र्याच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आणि जेवण बनवणे सुरूच ठेवले. त्याला काही पदार्थ हवा असेल तर ते डोळे बंद करायचे आणि हात पसरायचे. क्षणभरानंतर तो पदार्थ त्याच्या हातावर विराजमान झालेला असायचा.

एक गर्द हिरव्या रंगाचे लिंबू, लाल तिखट, मिरे; श्रीलंकेतील एक दुर्मिळ प्रकारचे केशर, पायलट भान हरपून त्या जादूकडे बघत होता. इतक्या वेळा बघूनही त्याला वाटणारे आश्चर्य कमी झाले नव्हते.

‘‘समजा तू हत्तीची कल्पना केलीस तर? तो पण तुझ्या हातावर येईल का?’’ भूत आता खूप भराभरा कांदे कापत होते. ते हसत म्हणाले, ‘‘तितका मोठा माझा हात असता तर नक्कीच.’’

‘‘हत्तीची फक्त कल्पना केल्याबरोबर तो तुझ्या हातात येणार?’’

‘‘छे. ते खूपच गुंतागुंतीचं आहे. एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिला वस्तूंची खरी रचना कशी काय आहे ते शिकवलं जातं. म्हणजे त्या वस्तू कशा दिसतात विंâवा जाणवतात, इतवंâच फक्त नाही; तर त्या वस्तू म्हणजे मूलत: काय आहेत, त्यांची रचना कशी असते वगैरेही सांगितलं जातं. एकदा तुम्हाला ती समज आली,
की मग वस्तू बनवणं सोपं असतं.’’

पायलटने यावर विचार केला आणि म्हणाला, ‘‘मग, तू तिला पण निर्माण का करत नाहीस? म्हणजे तिच्याबद्दल विचार करून तुझी इतकी चिडचिड होणार नाही. तू तयार केलेली तिची आवृत्ती थेट इथं असेल.’’

No comments:

Post a Comment