देवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही. BUY NOW | खरेदी करा.
No comments:
Post a Comment