उत्तुंग --- श्रीकृष्ण म्हणजे भारतीय मिथक कथातलं सर्वात अद्भुत मिथक. या मिथकाभोवतीचं वलय आजवर अनेक अद्भुत अविष्कारातून मांडण्यात आलं आहे. मात्र कृष्णाच्या ईश्वरीय उत्तुंगतेपेक्षा त्याची मानवीय उत्तुंगता अधोरेखित करण्याचा, त्याच्या समतोल व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे. कृष्णाला लोकनायकाच्या भुमिकेत सादर करणं, हे या कादंबरीचं खास वैशिष्ट्य. कृष्णजीवनातील अनेक घटनाक्रमातून त्याचा मानवतावादी ईश्वरी प्रवास ही कादंबरी मांडते.
Buy Now|खरेदी करा
गोवा... मला दिसलेला ---गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि `इट,ड्रिंक अँड बी मेरी’ छाप उथळ प्रचारकी जाहिरातींमुळे गोव्याच्या खऱ्या अंतरंगाकडे पर्यटकांचे लक्ष जात नाही. गोव्याचे बाह्यशरीर दिसते. पण अंतरंग दिसत नाही. दिव्यावरची काजळी काढावी तसा गोव्याबद्दलचा हा अध्यास दूर केल्यासच खरा गोवा दृष्टिगोचर होईल. म्हणूनच गोव्याचे मूळ स्व-रूप, मूळ संस्कृती, गोव्याची अभिजात ओळख हलक्या-फुलक्या शब्दांत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. गोव्यातील अनेक अज्ञात बाबी समोर आणत हे पुस्तक एका नव्या गोव्याचे दर्शन घडवते.
Buy Now|खरेदी करा
No comments:
Post a Comment