Tuesday 7 January 2014

द सेव्हन्थ सिक्रेट

डॉ. हॅरीसन अ‍ॅशक्रॉफ्ट यांचा दफनविधी होऊन आठवडा उलटला. त्यांची मुलगी एमिली अ‍ॅशक्रॉफ्ट अपूर्ण राहिलेलं हिटलरचं चरित्र पूर्ण करणार ही बातमी जगभर प्रसृत झाली. बातमी तशी मोठी नव्हती. पण तिनं सगळीकडे लोकांचं लक्ष वेधलं.

लेनिनग्रादमधल्या ‘हर्मिटेज’ या सुप्रसिद्ध नि भव्य कलासंग्रहालयातल्या आपल्या प्रशस्त ऑफिसखोलीत बसून निकोलस किरवोव सकाळची न्याहरी घेत होता आणि एकीकडे ‘प्रावदा’ या वृत्तपत्राची पानं चाळत होता. हर्मिटेज कलासंग्रहालयाचा नवा व्यवस्थापक म्हणून त्याची अलीकडेच नेमणूक झाली होती. वृत्तपत्र वाचता वाचता एका बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं.

पश्चिम बर्लिनमध्ये दारू प्यायलेल्या एका अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं आपल्या ट्रकखाली एका पादचाNयास चिरडलं. दारू प्यायल्यानं आपल्या वाहनावरला त्याचा ताबा सुटल्यामुळे हा भयानक अपघात घडला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे सर हॅरीसन अ‍ॅशक्रॉफ्ट हे त्याच्या ट्रकखाली सापडून जागच्या जागी ठार झाले.
कुपुâरस्टेनडॅम परिसरात हा अपघात झाला. डॉ. हॅरीसन अ‍ॅशक्रॉफ्ट हे थोर ब्रिटिश इतिहासकार होते आणि ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ या विषयावर त्यांचं विशेष प्रभुत्व आणि गाढा अभ्यास होता. आपली इतिहासकार कन्या कुमारी एमिली अ‍ॅशक्रॉफ्ट हिच्या सहाय्यानं हिटलरवरला एक प्रदीर्घ चरित्रगं्रथ डॉ. अ‍ॅशक्रॉफ्ट यांनी जवळजवळ संपवत आणला होता. हा अपूर्ण राहिलेला चरित्रगं्रथ कुमारी अ‍ॅशक्रॉफ्ट आता पूर्ण करणार आहेत अशी बातमी आहे. निकोलस किरवोवनं आपली न्याहारी संपवली. नुकत्याच वाचलेल्या त्या बातमीबद्दल त्याला विशेष असं स्वारस्य वाटलं नाही. हे डॉ. हॅरीसन अ‍ॅशक्रॉफ्ट कोण होते ते त्याला ठाऊक नव्हतं. फक्त हा माणूस हिटलरबद्दल संशोधन आणि लेखन करत होता इतवंâच त्याला माहीत होतं. बातमीपेक्षा त्या बातमीमधल्या हिटलरच्या नामोल्लेखानं त्याचं लक्ष चटकन् वेधलं गेलं होतं.

अ‍ॅडॉल्फ हिटलर! या पॅâसिस्ट नरराक्षसाबद्दल किरवोवला नेहमीच कुतूहल वाटून राहिलं होतं. आपलं शालेय जीवन, त्यानंतरचं दुसरं महायुद्ध... तेव्हापासून तो आत्तापर्यंत किरवोवचं हे कुतूहल कायम होतं. किरवोव हा स्वत: एक कलातज्ज्ञ होता आणि त्यामुळेच एका गोष्टीबद्दल त्याला नेहमीच सखेदाश्चर्य वाटत असे की,
हिटलरसारखा एक माथेफिरू नाझी नेता एके काळी एक चित्रकार होता! आर्टिस्ट होता! त्यानं अनेक तैलचित्रं रंगवलेली होती. त्याला वास्तुशिल्पकलेबद्दल प्रेम होतं आणि संगीताचीही आवड होती! लक्षावधी लोकांच्या रक्तानं रशियाची माती ज्यानं भिजवली होती असा हा खुनी एक आर्टिस्ट होता! किती विचित्र विरोधाभास होता हा! आणि हिटलरच्या विकृत मनोवृत्तीची मीमांसा करण्यासाठी त्याच्या कलेचे नमुने गोळा करण्यास किरवोवनं सुरुवात केली होती. हा छंदच जडला होता त्याला. 

हिटलरच्या कलेचे नमुने शोधून काढणं आणि ते जमवणं!

पुष्कळ माणसं जशी पोस्टाची तिकिटं जमवतात, नाणी जमवतात, कुणी दुर्मिळ पुस्तवंâ जमवतात, त्याप्रमाणे किरवोवला हिटलरची ड्रॉइंग्ज आणि पेंटिंग्ज यांचा संग्रह करण्याचा छंद लागला, आणि हिटलरच्या पंधरा कलाकृतींचा ठावठिकाणा किरवोवनं शोधून काढला. या पंधरा चित्रांपैकी आठ चित्रं ‘लाल सेनेच्या’ दफ्तरी पडून होती. तीन पूर्व बर्लिनमध्ये आहेत असं त्याला कळलं आणि चार व्हिएन्नामध्ये असल्याचा शोध त्याला लागला. या सर्व पेंटिंग्ज्ची छायाचित्रं किरवोवनं मागवून घेतली. त्यांचा अभ्यास केला आणि अखेरीस सहा महिन्यांपूर्वी हर्मिटेज आर्ट म्युझियमचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली तेव्हा काळाच्या पडद्याआड विसरली गेलेली ती सगळीच्या सगळी पेंटिंग्ज् त्यानं संग्रहालयाकरता उसनी म्हणून मिळवली. ही सगळी पेंटिंग्ज् त्यानं आपल्या खासगी ऑफिस खोलीमधल्या कपाटांमध्ये नीट जपून ठेवली होती. मात्र ती पेंटिंग्ज् आपण कशासाठी मिळवली आहेत हे त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं! भविष्यात कलासंग्रहालयाबद्दल माहिती देणारी एखादी पुस्तिका प्रसिद्ध करायची झाल्यास कदाचित त्यांचा उपयोग त्याला होणार होता. एखाद्या प्रदर्शनात पण ती मांडता येणार होती. काहीही असो, पण ती जमा करण्यामागचा त्याचा हेतू अद्याप अनिश्चित होता. तूर्तास त्याला फक्त एकाच गोष्टीचं महत्त्व होतं, ते हे की हिटलरनं तयार केलेली पंधरा पेंटिंग्ज् त्यानं मिळवली होती आणि त्याच्या अन्य कलाकृतींचा शोध तो एखाद्या संग्राहकाच्या चिकाटीनं घेत होता. अन् याच संदर्भात आजचा दिवस त्याच्यासाठी कदाचित फार महत्त्वाचा ठरणार होता! दैवानं साथ दिली तर पूर्वी कधीही न पाहिलेलं हिटलरनं रंगवलेलं सोळावं पेंटिंग पाहण्याची सुसंधी निकोलस किरवोवला आज मिळणार होती! 

सुमारे एक आठवड्यापूर्वी किरवोवला कोपेनहेगनहून आलेलं एक पत्र मिळालं होतं. इंग्रजी भाषेत लिहिलेलं ते पत्र जॉर्जियो रिक्की नावाच्या एका माणसानं पाठवलं होतं. हा माणूस इटालियन-अमेरिकन होता, आणि सान् प्रâान्सिस्कोमध्ये त्याची अपार्टमेंट होती. त्यानं आपल्या पत्रात लिहिलं होतं. 

No comments:

Post a Comment