प्लीज ऐक
मी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तू मला सल्ला देऊ लागतोस, तेव्हा तू मी सांगितलेलं केलेलं नसतंस.
मी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तू मला सांगू लागतोस की, मला असं का वाटता कामा नये, तेव्हा तू
माझ्या भावना पायदळी तुडवत असतोस. मी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तुला वाटतं की, माझी समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तेव्हा तू मला अपयशी ठरवलेलं असतंस, ऐकायला विचित्र वाटेल पण...
ऐक! मी तुला फक्त इतवंâच म्हणते की, तू ऐक. काहीही बोलू वा करू नकोस... फक्त माझं ऐक.
सल्ला अगदी स्वस्त असतो; एकाच वृत्तपत्रात, डीअर अॅबी व बिली ग्रॅहॅम अशा दोघांचाही मिळेल, वीस सेंट्समध्ये. आणि मी स्वत:चं स्वत:ला सावरू शकतेच; मी असहाय नाहीये. कदाचित धैर्यगलित आणि हेलपाटती असेन पण असहाय नाहीये.
जे मी स्वत:साठी करू शकते विंâवा करण्याची गरज आहे, तेच तू जेव्हा माझ्यासाठी करतोस तेव्हा तू माझ्या भयात आणि अपुरेपणात भरच घालत असतोस.
पण जेव्हा तू साधंसंच वास्तव समजून घेशील की, मला जे वाटतंय ते मला वाटतंय, मग ते किती का र्वâशून्य असेना त्यावेळी मी या तर्वâशून्य ‘वाटण्याच्या’ मागं नक्की काय आहे, हे तुला पटवून द्यायचा प्रयत्न थांबवू शकेन.
आणि हे जेव्हा स्वच्छ– स्पष्ट होईल तेव्हा उत्तरं आपोआप समोर येतील मग मला सल्ल्याची गरज नसेल.
तर्वâशून्य भावनांच्या मागं काय आहे हे आपल्याला समजतं तेव्हा त्या भावनांनाही अर्थ येतो.
कदाचित त्यामुळंच कधीकधी, काही लोकांच्या प्रार्थना कामी येत असावी... कारण देव नि:शब्द असतो, तो सल्ला देत नाही की, काही ठरवण्याचा प्रयत्न करीत नाही.
देव फक्त ऐकतो आणि तुमचं तुम्हाला सोडवू देतो. म्हणून, प्लीज ऐक, मी काय म्हणते ते फक्त ऐक.
आणि तुला बोलायचं असेल तर मिनिटभर थांब... मग तुझी पाळी आली की, मी तुझं ऐकीन.
-----
स्टेसिया गिल्मर
No comments:
Post a Comment