मायुमीने आपल्या छोट्या ऑफिसचा दरवाजा उघडला आणि एक उंच युरोपियन बाहेर उभा असलेला पाहून तिच्या हातातून पर्स जवळजवळ निसटलीच. अजूनपर्यंत मायुमीच्या संस्थेने कोणत्याही परकीय लोकांबरोबर व्यवहार केलेला नव्हता आणि त्यामुळे त्याला काय हवं असावं, असा विचार तिच्या मनात आला.
अचानक तिच्या लक्षात आलं की ते ऑफिस तसं एकाकी आणि अगदी वर होतं. ती अगदी एकटी आणि ह्या छोट्या जागेत अगदी असहाय होती. दरवाज्याच्या पलीकडे कोण आहे ह्याची तिने, दरवाजा इतक्या विश्वासाने उघडण्याआधी खात्री करून घ्यायला हवी होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला दरवाज्याला पीप होल लावण्यासंबंधी सुचवलं होतं, परंतु तिला अशा तNहेने पैशाची उधळपट्टी करायची नव्हती.
नीट पाहिल्यावर मायुमीच्या लक्षात आलं की दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या अनोळखी माणसाला छानशी आखूड, पण दाट दाढी होती आणि तो दिसायलाही चांगला होता. तिच्या मनात एक विचित्र विचार आला, की समजा, तिच्यावर हल्ला व्हायचा असलाच, तर मग कुरूप माणसापेक्षा दिसायला चांगल्या माणसाकडून
झालेला बरा. तिची विश्वविद्यालयीन मैत्रीण अकिका फोनवर हसत तिला हेच म्हणाली होती, कारण त्या वेळी त्यांचं टोकियोमध्ये होणाNया वाढत्या अतिप्रसंगाबद्दल संभाषण चाललं होतं.
पॉल ग्रिफिनला त्या लहानशा जपानी मुलीच्या चेहNयावर दिसणारी काळजी लक्षात आली. ज्या ठिकाणी सुटकेचा अरुंद मार्ग आहे अशा इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या ऑफिसच्या जागेत एकट्या स्त्रीला त्याची शरीरयष्टी किती भिववणारी वाटेल हे त्याच्या लक्षात आलं.
आपलं सर्वांत आश्वासनदर्शक असं ाqस्मत चेहNयावर आणत त्याने वावूâन अभिवादन केलं, ‘‘माझं चुकलं, मी आधी फोन करायला हवा होता. परंतु खाजगी डिटेक्टिव्हबाबत कसं असतं हे तुम्ही जाणताच. आम्हाला न सांगता जायची एवढी सवय असते! ग्रिफिन प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर, न्यूयॉर्वâ ह्या कंपनीतील मी पॉल
ग्रिफिन आणि हे माझं कार्ड.’’
तिनं त्याचं व्यावसायिक कार्ड नीट पाहिलं आणि तिच्या चेहNयावर हास्य उमटलं. माणूस जे व्यावसायिक कार्ड दाखवतो त्यावरून माणसाच्या विश्वसनीयतेचं मूल्यमापन होतं ह्या जपानी व्यवसायातील चालीरीतींची त्याला आठवण झाली. अस्थानी विश्वास, त्या वेळी त्याला वाटलं होतं. माणूस त्याला पाहिजे तेवढी व्यावसायिक कार्डं छापून घेईल आणि त्यावर तो कोणीही असल्याचं दाखवेल, हे त्यांना माहीत नव्हतं का? अर्थात तो एखाद्या न्यूयॉर्वâमध्ये राहणाNया माणसासारखा विचार करत होता. कारण असे फसवे, दुष्ट विचार जपानी लोकांच्या मनात येतच नाहीत! ते वैयक्तिक सचोटीवर भर देत होते हे आश्चर्यजनक होतं. ह्यामुळे एखाद्याला फसवल्यामुळे तुम्हालाच वाईट वाटायला लागायचं! अशा तNहेचा मानसिक दबाव
आणणं हीच बहुधा त्या मागची कल्पना होती.
‘‘मी मायुमी ओनोडारा, ह्या संस्थेची मालकीण. तुम्हाला भेटून आनंद झाला.’’ तिचं इंग्लिश अचूक होतं, पण ती शब्दांवर जरा जास्त जोर देऊन उच्चार करत होती. ‘‘कृपया आत या आणि तुम्हाला पाहिजे तिथं बसा.’’
‘‘हे अगदी छोटं ऑफिस आहे.’’ ती काहीशा खजील स्वरात सांगू लागली आणि तिने खांदे उडवले, ‘‘परंतु हे टोकियो आहे.’’
जणू काही त्यामुळे सर्वाचाच खुलासा झाला होता.
उत्तम व्यावसायिक हसू तोंडावर आणत तिने विचारले, ‘‘मी तुमच्यासाठी काय करू शकते?’’
मासिकांची चळत बाजूला करत पॉलने तिथं असलेली एकमेव खुर्ची रिकामी केली आणि तो बसला. हे करताना त्याने झोपलेल्या तपकिरी रंगाच्या मांजराला हुसकावलं होतं.
‘‘सॉरी, ही मिकी आहे. मी प्रत्येक दिवशी कामावर येताना तिला बरोबर आणते.’’ मायुमीने सांगितलं. तिनं त्या गुरगुरणाNया मांजराला उचललं आणि खिडकीच्या पट्टीवर ठेवलं. तिथं बसून ते चिडखोरपणे, रागीट डोळ्यांनी पॉलकडे पाहत होतं. ‘‘निव्वळ सोबत म्हणून. कारण हे उघड आहे की ती माझी वैयक्तिक मदतनीस वगैरे नाही.’’ पॉल अगदी मनापासून हसला. सरतेशेवटी विनोदबुद्धी असलेली एकतरी जपानी मुलगी त्याला सापडली होती! एकदा नात्सुकोला भेटायला मैत्रिणी आल्या होत्या आणि त्याने चक्क मोठ्यामोठ्याने विनोद ऐकवले होते. त्यामुळे त्याच्या हातून योग्य वागणुकीची नाजूक संहिता नकळत मोडली गेली होती. कारण त्या बायकांचे हात चटकन तोंडाकडे गेले होते! नात्सुकोला हे सर्व भयानक वाटले होते. निदान मायुमी तरी अशी नव्हती आणि ते दोघं एकत्र चांगलं काम करू शकतील असं पॉलच्या मनात आलं.
तिच्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारचा अस्ताव्यस्तपणा होता त्यावरून तिच्याकडे पुरेसा तNहेवाईकपणाही होता आणि पॉलला ज्यांना थोडीफार अस्वच्छता चालेल अशा स्त्रियांबरोबर काम करायला आवडायचं. तो मोठ्याने म्हणाला, ‘‘माझं मांजरांबरोबर तसं बNयापैकी जमतं,’’ आणि हे सांगताना मिकीने ओरबाडल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर उमटलेलं रक्त तो दृष्टिआड करायचा प्रयत्न करत होता. ते आता चुरचुरायला लागलं होतं. त्या खिडकीच्या पट्टीवर बसलेल्या आणि टक लावून पाहणाNया गोळ्याला तो मनातल्या
मनात शिव्या देत होता. त्याने आपल्या बॅगेत हात घालून निळी फाईल बाहेर काढली.
‘‘युनायटेड स्टेट्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एका जपानी व्यावसायिकाच्या पूर्वज घराण्याच्या मुळाचा शोध घेण्याकरता मी इथं आलोय. ह्या प्रकल्पाचा जपानमधील कामाचा भाग म्हणून मी इथं ज्यांच्याबरोबर काम करू शकेन अशी व्यक्ती म्हणून तुमची शिफारस केली गेली होती. तुमचे वडील त्याच विश्वविद्यालयात सहाध्यायी होते हेही एक आणखी कारण.’’
No comments:
Post a Comment